रोज रोज शरीरावरील केसांवर रेझर आणि वॅक्सिंग करुन कंटाळला असाल तर आजचा विषय प्रत्येक महिलांना आवडेल असा आहे. कोणालाही नितळ, स्वच्छ त्वचेवर केस नको असतात. (डोक्यावरील घनदाट केस वगळता). स्लिव्हलेस, बॅकलेस, शॉर्ट असे कोणतेही कपडे घालायचे झाले की, सगळ्यात आधी आपल्याला रेझर घेऊन बसावं लागतं किंवा वॅक्स करायला पार्लर गाठावं लागतं. पैसे वाचवण्यासाठी अनेक जण घरीच वॅक्स करतही असतील. पण दर महिन्याला येणाऱ्या पिरेड्सप्रमाणे त्वचेवरील अनावश्यक केस काढणे हा अनेकांना दर महिन्याचा ठरलेला कार्यक्रम आहे. तुम्हालाही तेच तेच करुन कंटाळा आला आहे? किंवा खिशाला हा खर्च नकोसा झाला असेल तर यासाठीचा कायमचा इलाज असलेल्या लेझर हेअर रिमुव्हिंगचा पर्याय तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. लेझर हेअर रिमुव्हिंगबद्दल तुमच्या मनात शंका असतील तर आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला हेअर रिमुव्हिंग लेझर पद्धतीने करायचे की नाही यावर प्रकाश टाकेल.
लेझर हेअर रिमूव्हल म्हणजे काय? (What Is Laser Hair Removal In Marathi)
आपल्या आजुबाजूच्या अनेक महिलांना केस काढण्याचा हा पर्याय अद्यापही माहीत नाही. लेझर हेअर रिमुव्हिंगद्वारे तुमचे केस पूर्णपणे आणि कायमचे काढून टाकले जातात. असे करताना नको असलेल्या केसांची मुळ कमकुवत केली जातात. त्यामुळे शरीरावरील केसांची वाढ कालांतराने कमी होत जाते. लेझरची एक विशिष्ट मशीन असते. त्या मशीन द्वारे तुमच्या केस असलेल्या भागांना एक लाईट दिली जाते. त्या लाईट्च्या मदतीनेच तुमच्या केसांच्या मुळांवर परिणाम होत असतो. लेझर हेअर रिमुव्हिंग किती सेशन करायचे हे तुमच्या केसांची वाढ पाहून डॉक्टर सांगतात.
लेझर हेअर रिमूव्हलकरण्याचे फायदे (Laser Hair Removal Benefits In Marathi)
अगदी कधीही आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला तुमच्या आवडीचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही लेझर हेअर रिमूव्हल करायला हवे. चेहर्याचे केस कसे काढायचे ते आपल्याला माहित असले पाहिजे. लेझर हेअर रिमूव्हलचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊया.
केस काढण्याची कटकट नाही (No More Waxing)
एकदा हेअर रिमु्व्हल केल्यानंतर तुम्हाला कधीही वॅक्सिंग करावे लागत नाही. लेझर हेअर रिमूव्हलसाठी तुमच्या शरीरावरील केसांच्या वाढीला अनुसरुन सेशन्स सांगितले जातात. जर तुमच्या केसांची वाढ फार जास्त नसेल तर अगदी दोन-चार सेशनमध्येच तुम्हाला हा फरक जाणवू लागतो. तुमच्या केसांची वाढ हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे तुम्ही अगदी आयत्यावेळीही तुमच्या हातापायांवर किंवा काखेत नुसता रेझर फिरवू शकता. त्यामुळे अगदी काहीच मिनिटात तुम्हाला हा रिझल्ट मिळेल. वॅक्सिंगचे किमान 1000 रुपयांची तरी या सगळ्यामुळे नक्कीच बचत होते. हे वैक्सिंगनंतर त्वचेच्या जळजळपणापासून वाचवते
नितळ त्वचा (Smooth Skin)
काखेत किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी आपण इतके वेगवेगळे प्रयोग करतो की, त्यामुळे अनेकदा आपली त्वचा काळवंडण्याची शक्यता असते. पण लेझर हेअर रिमूव्हलकेल्यानंतर त्वचेचा पोत अधिक सुधारतो. त्वचा अगदी एक-दोन सेशन्सनंतर अधिक नितळ दिसू लागते. केसांच्या खाली असलेली त्वचा कायमच केसांमुळे झाकोळलेली असते. पण एकदा तुम्ही लेझर हेअर रिमूव्हल केले ही तुमची त्वचा नितळ दिसू लागते.
त्वचा उजळते (Skin Glows)
त्वचा उजळवणे हा लेझर हेअर रिमूव्हलचा आणखी एक फायदा आहे. तुम्ही कधीही अंगावरील केस काढले असतील तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की, तुमच्या त्वचेचा रंग आणि केसांमुळे असलेला त्वचेचा रंग यात फरक आहे. लेझर हेअर रिमूव्हल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनटोनमध्ये सगळ्यात आधी हा फरक जाणवू लागते. अनेकदा अनावश्यक केसांमध्येही धूळ किंवा घाण राहिल्यामुळे अनेक तक्रारी निर्माण होतात. त्वचा नितळ झाली की ती आपोआपच उजळते
मुलायम त्वचा (Soft Skin)
मुलायम त्वचाही आपल्या सगळ्यांनाच हवी असते. शरीरावरील अनावश्यक केस कोणत्याही पद्धतीने काढा. पण असे केस ज्यावेळी पुन्हा येतात. त्यावेळी मात्र तुम्ही शरीराला अजिबात स्पर्श करु शकत नाही इतकी आपली त्वचा कोरडी आणि रफ लागते. पण ज्यावेळी तुम्ही लेझर हेअर रिमूव्हल करता त्यावेळी मात्र केस पुन्हा येताना त्याची वाढ तशी होत नाही. केस कायमच मुलायम आणि पातळ येतात. त्यामुळे त्वचेचा स्पर्श हा कायम मुलायम लागतो
एकसारखी त्वचा (Even Skin Tone)
हल्लीच्या काळात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे सगळ्यांना सर्वाथाने असणारा त्रास म्हणजे टॅनिंगचा. शरीरावरील टॅन पूर्णपणे काढून टाकण्याची अजून कोणतीही क्रीम अस्तित्वात आली नाही. पण लेझर हेअर रिमूव्हल केल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा एकसारखी नक्कीच वाटू लागते. त्वचा अधिक ग्लो करु लागते शिवाय उजळते त्यामुळे तुम्हाला हा फरक अगदी हमखास जाणवून लागतो. तुमची त्वचाही एकसारखी नसेल तर तुम्ही अगदी आरामात लेझर हेअर रिमूव्हल करु शकता.
लेझर हेअर रिमूव्हलचे काही तोटे (Side Effects Of Laser Hair Removal In Marathi)
प्रत्येक नाण्याची दुसरी बाजूही असते. ही दुसरी बाजू तुम्ही जाणून घेणेही गरजेचे आहे. ज्याप्रकारे लेझर हेअर रिमूव्हलचे काही फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे आहेत. हे तोटे फार कमी असले तरी देखील ते जाणून घेणे गरजेचे आहे.
नाजूक त्वचा (Sensitive Skin)
केस काढण्यासाठी ज्या मशीनचा उपयोग केला जातो. त्याची एक फ्रिकवेन्सी असते. ही फ्रिकवेन्सी जर जास्त झाली तर त्यामुळे त्वचा अधिक नाजूक होण्याची शक्यता असते. त्वचेसंदर्भात कोणताही निर्णय घेताना तुम्ही योग्य सल्ला घेतला नसेल तर या समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. त्वचा पातळ झाली की, तुम्हाला अनेक वेगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
रेझरचे रॅशेश (Razor Rashes)
लेझर हेअर रिमूव्हलची प्रक्रिया सुरु करताना रेझरचा उपयोग करुन त्वचेवरील अनावश्यक केस काढले जातात. रेसरचा उपयोग सतत केल्यामुळेही त्वचा नाजूक होते. त्वचेची जळजळ वाढते. पण ही त्वचेची जळजळ काही काळासाठी असते. त्यानंतर त्वचा पूर्ववत होते. पण तरीही काही काळासाठी ही जळजळ जाणवत राहते. पण काही जणांना हा त्रास अजिबात सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आणि हा त्रास कायम लक्षात ठेवावा.
त्वचा दिसते डल (Skin Looks Dull)
लेझर हेअर रिमूव्हलचे फायदे वाचल्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमची त्वचा अगदी दुसऱ्याच दिवशी उजळेल किंवा चांगली दिसेल.पण असे पटकन होत नाही. काही काळासाठी तुमच्या त्वचेवर लेझरमुळे आलेला डलनस राहतो. तुमची त्वचा काही काळासाठी त्वचा काळवंडते. त्यामुळे काही काळासाठी म्हणजे लेझर केल्यानंतर किमान आठवडाभर तरी तुमची त्वचा डल दिसते. पण काळवंडलेली त्वचा पूर्ववत होते. चमकणारा आणि निरोगी त्वचेसाठी आपण रस प्याला पाहिजे.
असे केले जाते लेझर हेअर रिमूव्हल (Laser Hair Removal Procedure In Marathi)
लेझर हेअर रिमूव्हलचे फायदे वाचल्यानंतर तुम्हाला याचे फायदे आणि तोटे लक्षात आलेच असतील. पण ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी पार पडते ते जाणून घेऊया.
- शरीराच्या ज्या भागातील केस तुम्हाला काढायचे आहे त्यानुसार तुम्हाला सल्ला दिला जातो.
- डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रिटमेंट दिली जाते.
- तुम्ही ज्या दिवशी लेझरला येणार असता त्या आधी तुम्हाला केसांची पूर्ण वाढ होऊ द्यायची असते. कारण तुमच्या केसांच्या वाढीनुसार तुम्हाला किती फ्रिक्वन्सीचे लेझर शॉट द्यायचे ते ठरवले जाते.
- तुम्ही संपूर्ण शरीराचे लेझर हेअर रिमूव्हल करायचे ठरवले असेल तर तुम्हाला संपूर्ण कपडे काढून ही प्रक्रिया करुन घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला कोणासमोर कपडे काढून राहायचे आहे हे भान ठेवूनच वावरावे लागेल. जर तुम्हाला एखाद्या असिस्टंमुळे ही ट्रिटमेंट करताना अडचण येत असेल तर तुम्ही अगदी मोकळेपणाने सांगा.
- तुमच्या शरीरावरील सगळे अनावश्यक केस रेझरच्या मदतीने काढले जातात. हे रेझर तुम्हाला तुमचे न्यावे लागते.
बिकिनी लाईनवरील केस काढल्यानंतर त्याला एक विशिष्ट क्रीम लावले जाते. त्यामुळे तुम्हाला या भागाला शॉर्ट देताना फार जाणवत नाही. हे क्रीम अॅक्टिव्ह होण्यासाठी किमान 30 मिनिटं लागतात. - तो पर्यंत तुम्हाला दुसऱ्या भागाचे लेझर केले जाते. त्यासाठी तुमच्या शरीरावर थंडगार जेल लावण्यात येते. त्यामुळे लेझर शॉट फार लागत नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त केस असतात. त्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या चावल्याप्रमाणे थोडे थोडे झटके लागतात. पण ते सहन करण्यासारखे असतात.
- चेहऱ्यावर लेझर करताना अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या जातात. जर तुम्हाला त्वचेसंदर्भात काही त्रास असतील तर तुम्ही आधीच त्याबद्दल सांगा.
- लेझरनंतर अंग चिकट होते. त्यामुळे त्यानंतर आंघोळ ही करावीच लागते. ही ट्रिटमेंट एकदा केल्यानंतर तुम्ही वॅक्स, हेअर रिमूव्हल क्रीम असे काहीच वापरु शकत नाही.
- साधारण महिन्यातून एकदाच तुम्हाला यासाठी यावे लागते. केसांची वाढ कमी झाल्यावर हे कमी केले तरी चालते. याचा उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी तुम्ही किमान 8 तरी सेशन्स घ्या.
लेझर सेशननंतर नक्की काय काळजी घ्यायची? (After Laser Session Care Tips)
shutterstock
- लेझर सेशन झाल्यानंतर त्वरीत सनस्क्रीन न लावता बाहेर पडू नका.
- जितकं कमी तितकं उन्हातून बाहेर जा.
- त्याशिवाय आपलं नॉर्मल cleansing, moisturizing रूटीन तुम्ही करू शकता.
- पण anti-acne, anti-aging सारख्या केमिकल असणाऱ्या उत्पादनांचा वापर लेझर सेशन झाल्यानंतर 24-36 तासांपर्यंत करू नका.
अशा पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला याचा त्रास मुळीच होणार नाही.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s
हो, लेझर हेअर रिमुव्हल ही अत्यंत सुरक्षित अशी ब्युटी ट्रिटमेंट आहे. पण ही ट्रिटमेंट कुठेही करु नका. डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही ही ट्रिटमेंट करणे नहमीच चांगले कारण त्वचेच्या तक्रारीनुसार ते तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात. जर तुमच्या मनात याबद्दल काही भीती असेल तर तुम्हाला डॉक्टर नेहमीच मार्गदर्शन करु शकतात.
जर तुम्ही एखादा शरीराचा भाग करत असाल तर तुम्हाला कमीत कमी यासाठी 30 ते 45 मिनिटं लागतात आणि जर तुम्ही संपूर्ण शरीराचे फुल बॉडी लेझर करणार असाल तर तुम्हाला यासाठी किमान 3 तासांचा कालावधी लागतो. त्यामध्ये तुम्हाला एकाच जागी झोपता येत नाही तर तुम्हाला सतत हालचाल करावी लागते.
तुम्हाला किमान 8 सेशन्स घ्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला याचा खरा परिणाम दिसतो. पण त्यानंतर तुम्ही काही काळानंतर मेन्टनंस सेशन घेऊ शकता. त्यामुळे हा परिणाम अधिक काळासाठी टिकून राहतो.
तुकड्यातुकड्यात लेझर करण्याऐवजी जर तुम्ही एकदाच फुल बॉडी लेझर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य निवड केली आहे. कारण जर तुम्ही फुल बॉडी लेझर केले तर तुम्हाला पुन्हा काहीच करावे लागत नाही. भारतात वेगवेगळ्या डर्मालॉजिस्ट आणि ब्रँडनुसार त्याचे खर्च असतात. यासाठी साधारण 50 ते 60 हजारांचा खर्च येतो..यामध्ये तुम्हाला साधारण 12 सेशन्स मिळतात. आता लेझर हेअर रिमुव्हल करायचे की नाही हे तुम्हाला फायदे आणि तोटे लक्षात घेऊन हे करता येईल.
लेझरमध्ये जास्त प्रमाणात हिट असते त्यामुळे कधीतरी जळजळ जाणवते. पण यामध्ये दुखत नाही. तसंच लेझर सेशनच्या पूर्वी आणि नंतर त्वचा थंड करण्यासाठी कुलिंग जास्त प्रमाणात केलं जातं. त्यामुळे त्वचा सुन्न होते त्यामुळे जास्त त्रास होत नाही. त्यासाठी कुलिंग करून घेणं गरजेचं आहे.