ADVERTISEMENT
home / Recipes
Jawala Recipes In Marathi

सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi)

कोकणाचे मुख्य अन्न म्हणजे ‘भात आणि मासे’ शाळेतल्या पुस्तकात हे सगळ्यांनीच वाचलं आहे. पण ताज्या मासळीसोबतच कोकण आणि कोकणकिनाऱ्यापासून लांब असलेल्या ठिकाणी सुके मासे खाण्याची पद्धत आहे. बांगडा, सुरमई, रावस, जवळा, कर्दी, बोंबील असे काही मासे जास्त असतील तर ते उन्हाळा कडकडीत वाळवले जातात. सुकवलेले मासे एअर टाईट डब्यात भरुन ते वर्षानुवर्ष टिकवले जातात. ज्यावेळी ओले किंवा ताजे मासे मिळत नाहीत अशावेळी सुके मासे हे सगळीकडे आवर्जून खाल्ले जातात. कोकणात ओले मासे हे नेहमीच मिळत असले तरी देखील सुक्या माशांसाठी नक्कीच एक दिवस राखून ठेवलेला असतो. प्रवासात किंवा कोठेही बाहेर जाताना जर मासे खायचे असतील तर असे सुकट नेहमीच केले जाते. सुक्या माशांमधील ‘सुका जवळा’ हा प्रकार देखील अनेकांना आवडणारा असा आहे. सुक्या जवळ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी (jawala recipes in marathi) बनवल्या जातात. सुक्या जवळा रेसिपीचे वेगवेवगळे प्रकारच आज आपण पाहणार आहोत. या रेसिपी फारच सोप्या असून तुम्ही त्या माशांच्या वाराला कधीही करु शकता. 

जवळा मसाला (Javla Masala Recipe In Marathi)

सुका जवळा मसाला

Instagram

ADVERTISEMENT

जवळाचा उपयोग करुन  केली जाणारी ही रेसिपी अनेकांच्या घरात केली जाते. हा थोडासा ओलसर असा जवळाचा प्रकार आले. जवळा मसाला हा तुम्हाला मस्त भाकरी आणि कांद्यासोबत खाता येतो. 

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, हळद, तिखटाच्या प्रमाणानुसार मालवणी मसाला, ½ चमचा गरम मसाला, 5-6 कोकमं, मीठ, तेल ,पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती: 

  • प्रथम जवळा स्वच्छ करुन घ्या. तो हलकासा तव्यावर भाजून पाण्यातून काढा. त्यामुळे तो छान ओलसर होतो.
  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, ठेचलेलं आलं-लसूण घालून चांगले परतून घ्या. 
  • कांदा चांगला लाल झाला की, त्यात हळद, मालवणी मसाला घाला. थोडेसे परतून त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला. मंद आचेवर  टोमॅटो चांगला शिजू द्या. ही कृती  पटकन होण्यासाठी कढईचे झाकण लावून घ्या. 
  • टोमॅटो चांगला शिजला की, त्यात जवळा घाला. मीठ घालताना थोडे जपून घाला कारण सुक्या माशांमध्ये आधीच मीठ असते ते थोडेसे खारट असतात. त्यामुळे मीठ घालताना थोडे जपून 
  • आता सगळे मिश्रण एकजीव करुन वरुन पाण्याचा हबका द्या. गरम मसाला घालून पुन्हा एकदा जवळा मसाला शिजत ठेवा.
  • जवळा चांगला गदगदू लागला की सगळ्यात शेवटी त्यामध्ये कोकम घाला. कोकम हे आंबट चवीसाठी घातले जाते. त्यामुळे तेही थोडे जपूनच टाकलेले बरे! नाहीतर पदार्थ फारच आंबट होईल. 
  • आता हे सँडवीच मस्त भाकरीसोबत सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

जवळा चटणी (Javla Chutney)

जवळा चटणी

Instagram

प्रवासासाठी बाहेर जायचे असेल किंवा एखाद्या पिकनिकसाठी जायचे असेल अशावेळी जवळ्याचा हा सुका प्रकार तुम्हाला करता येईल. जवळा मसालाप्रमाणेच याची रेसिपी असली तरी देखील यामध्ये टोमॅटो घातला जात नाही.टोमॅटोमुळे एखादा पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.

साहित्य: 1 वाटी जवळा, 1 मोठा कांदा, 1 मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, तेल थोडे जास्त,मीठचवीनुसार, कोकम

कृती: 

ADVERTISEMENT
  • जवळा तव्यावर छान भाजून घ्या. तो बाजूला काढून ठेवा.
  • एका कढईत रोजच्यापेक्षा थोडे जास्त तेल घ्या. तेल गरम झाले की, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या. कांदा हा चांगला लाल व्हायला हवा. कांद्याचा रंग बदलला की, त्यामध्ये सगळे सुके मसाले घालून छान परतून घ्या.
  • मसाले छान भाजले गेले की, त्यामध्ये भाजलेला जवळा घाला. जर गरज वाटली तर थोडा पाण्याचा हबका द्या.
  • आच मंद करुन जवळा त्या चटणीमध्ये चांगला एकरुप होऊ द्या. अशा पद्धतीने केलेली चटणी जास्त काळ टिकते. त्याला तेल सुटले की, दोन चार कोकम घालून झाकण मारुन ठेवा.
  • ही चटणी जेवढी मुरेल तितकी प्रवासात छान लागते.

जवळा भजी (Jawala Bhaji Recipe In Marathi)

जवळा भजी

Instagram

तळणीचे पदार्थ तुम्हाला खायला आवडत असतील तर जवळा भजी हा प्रकार तुम्ही करुनच पाहायला हवा. जवळा भजी ही नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक मस्त स्टाटर्सचा प्रकार आहे जो अधिक चांगला लागतो. याला सुका जवळा वडे असे देखील म्हणतात. हे एक उत्तम नॉनव्हेज स्टाटर्स पैकी एक आहे

ADVERTISEMENT

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, ½ वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार चिंचेची पेस्ट, 1 छोटा चमचा ओवा, लाल तिखट, हळद, आलं-लसूण- मिरची पेस्ट आवश्यकतेनुसार भाजणीचे पीठ,पाणी, तेल तळण्यासाठी

कृती:

  • एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये जवळा भिजत ठेवा. तो साधारण 5 मिनिटं भिजत ठेवा. जवळा पाण्यातून निथळून काढा. जवळा पिळून काढल्यास फारच उत्तम
  • आता एका मोठ्या भांड्यात जवळा घेऊन त्यात कोथिंबीर, कांदा आणि सगळे सुके मसाले घाला. आलं-लसूण – मिरची पेस्ट घालून एकजीव करुन घ्या.
  • मीठ आणि कांदा घातल्यानंतर या मिश्रणाला थोडे पाणी सुटेल. त्यामुळे सगळ्यात शेवटी म्हणजे ज्यावेळी तेल गरम करायला ठेवाल त्यावेळी यामध्ये भाजणीचे पीठ घाला. भजी पडेल इतके हे मिश्रण घट्ट व्हायला हवे.
  • आता मस्त गरम गरम तेलात ही भजी तळून घ्या. मस्त केचअप किंवा पुदीना चटणीसोबत स्टाटर्स म्हणून सर्व्ह करा.

जवळा आमटी (Jawala Gravy Recipe In Marathi)

जवळा आमटी

Instagram

ADVERTISEMENT

अनेकांच्या घरी सुकटीची आमटी करण्याची पद्धत आहे. त्याला कालवण असेही म्हणतात. भातावर मस्त गरम गरम कालवण घेऊन ताव मारता येतो. जाणून घेऊया या जवळा आमटी किंवा कालवणाची सोपी रेसिपी

साहित्य: 1 वाटी सुका जवळा गरम पाण्यात भिजवून पिळून घेतलेला, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, कोकम,धणे जीरे पूड, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 वांग, 4-6 शेवग्याच्या शेंगाचे तुकडे, ½ टोमॅटो, 1 बटाटा, कोथिंबीर, आमसुलं

कृती:

  • एका खोलगट भांड्यात तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि कांदा घालून चांगला परतून घ्या.
    कांदा चांगला परतून झाला की, त्यामध्ये हळद, धणे-जीरे पूड,लाल तिखट किंवा तुमचा रोजचा मसाला घालून परतून घ्या.
  • त्यात चिरलेल्या भाज्या आणि गरम पाण्यात भिजवून पिळवून काढलेला जवळा घाला.
  • मसाल्यामध्ये चांगले परतून घ्या. त्यात चांगले दोन ग्लास पाणी घालून ते चांगले शिजू द्या. अगदी मंद आचेवर या सगळ्या भाज्या शिजू द्या. उकळी आली की, त्यामध्ये मीठ घालून आमसुलं घाला आणि भाज्या चांगल्या शिजू द्या.
  • तेल सुटेपर्यंत तुम्ही हे कालवण चांगले शिजवून घ्या. तुमचे जवळा कालवण तयार!

आग्री पद्धतीचे जवळा सुकट (Agri Style Jawala Sukat)

जवळा सुकट

ADVERTISEMENT

Instagram

माशांचे कालवण हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. कोकणात, गोव्यात, देशावर हे बनवण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे. आग्री पद्धतीचे जेवणही फार वेगळ्या पद्धतीने केले जाते. आग्री पद्धतीत नेमका काय फरक असतो ते जाणून घेऊया.

साहित्य: 1 वाटी गोलम किंवा जवळा (जवळ्याला गोलम असे म्हणतात), 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, 10-12 बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या, आगरी मसाला, हळद, आमसुल, कोथिंबीर, पाणी, तेल, मीठ आवश्यकतेनुसार

कृती:

  • एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या घालून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद, आगरी मसाला घालून छान परतून घ्या.
  • कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो आणि गोलम अर्थात जवळा घालून त्यात मीठ, कोकम घालून त्यात थोडे पाणी घालून झाकण बंद करुन ठेवा. मसाला जवळ्यामध्ये चांगला मुरु द्या.
  • कोथिंबीर पेरुन ही मस्त डिश तुम्ही भाकरीसोबत सर्व्ह करा.

ADVERTISEMENT

सुकटीचे आंबट (Suakticha Aambat)

सुकटीचे आंबट

Instagram

सुकटीचे आबंट हा प्रकार देखील अनेक ठिकाणी खाल्ला जातो. विशेषत: आग्री किंवा कोकणातल्या काही भागात सुकटीचे आबंट केले जाते. जाणून घेऊया हे करण्याची योग्य पद्धत

साहित्य: 1 वाटी जवळा, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कैरी,हळद, तिखट, गरम मसाला,तेल, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी

कृती:

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट छान भाजून घ्या. त्यामध्ये टोमॅटो घाला. सगळे सुके मसाले घालून घ्या. ते छान परतून घ्या.
  • त्यामध्ये जवळा घालून कैरी घाला. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून थपथपीत असे सुकटीचे आंबट करुन घ्या.

जवळा आणि वांग ग्रेव्ही (Jawala And Vangi Gravy)

जवळा आणि वांग ग्रेव्ही

Instagram

जवळा हा वांग्यासोबत अधिक चांगला लागतो. अनेक ठिकाणी जवळा वांग्यामध्ये स्टफ करुन खाल्ला जातो. जवळा आणि वांगी ही पारंपरिक अशी डिश आहे जी तुम्ही नक्कीच कधीतरी करुन पाहायला हवी. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तुम्ही याचा समावेश करु शकता. कारण ही पारंपरिक डिश आहे.

ADVERTISEMENT

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 बारीक चिरलेला कांदा, ½ वाटी पातीचा कांदा, 1  वांग, आग्री कोळी मसाला, हळद, तिखट, मीठ, कोकम तेल, आलं-लसूण पेस्ट

 कृती:

  • सुका जवळा एका भांड्यात भिजवून ठेवा. तो चांगला भिजला की, पिळून घ्या.
  • एका कढईत किंवा भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. त्यामध्ये पातीचा कांदा, आग्री कोळी मसाला घालून परतून घ्या. कांदा थोडा परतून झाला की, त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि आलं घाला.
  • सगळे एकजीव झाल्यावर त्यामध्ये जवळा घाला परतून मग पुन्हा त्यामध्ये वांग घाला. वांग चांगलं शिजेपर्यंत तुम्ही ते ठेवा. त्यामध्ये तुम्ही कोकम घाला आणि तुमची डिश मस्त भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

 

जवळा पुलाव किंवा राईस (Jawala Pulao)

जवळा पुलाव किंवा राईस

Instagram

ADVERTISEMENT

जवळा पुलाव किंवा जवळा राईस हा अनेकांकडे बनवला जातो. ज्यांना झटपट पूर्ण जेवण आणि त्यात मासेही हवे असतात अशा लोकांकडे हा पदार्थ अगदी हमखास बनवला जातो.

साहित्य: उरलेला शिळा भात, 1 वाटी जवळा, आलं-लसूण पेस्ट, तेल, कांदा,मीठ

कृती:  

  • शिळ्या भातापासून बनवलेला हा प्रकार खूप चांगला लागतो. एका भांड्यात तेल गरम करुन कांदा-आलं-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. 
  • त्यामध्ये लाल तिखट, हळद घालून तयार भात घाला. मीठ घालून हा भात चांगला परतून घ्या. 
  • जवळा पुलाव तयार हा तुम्ही मस्त प्रवासात कधीही खाऊ शकता.

सुका जवळा (Dry Jawala)

सुका जवळा

ADVERTISEMENT

Instagram

सुका जवळा असे जरी या रेसिपीला म्हटले तरी देखील सुका जवळ्याची ही एक वेगळ्या प्रकारची चटणी आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. ही चटणी अगदी झटपट आणि पटकन करता येते.

साहित्य: 1 वाटी बारीक सुका जवळा, ½ चिरलेला कांदा, तिखटानुसार चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ

कृती:

  • एका पॅनमध्ये जवळा चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • जवळा एका भांड्यात काढून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकजीव करा.
  • ही आबंट- तिखट चटणी चपाती आणि कांद्यासोबत मस्त लागते.

जवळ्याचं किसमूर (Jawlyach Kismura)

जवळ्याचं किसमूर

ADVERTISEMENT

Instagram

जवळ्याचे किसमूर ही रेसिपी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते. जवळ्याची ही एक प्रकारची कोरडी चटणी असून तुम्ही ती अगदी कधीही करु शकता. याच्यासाठी फार साहित्यही लागत नाही आणि यासाठी फार वेळही लागत नाही.

साहित्य: 1 वाटी सुका जवळा, 1 वाटी कांदा, दोन चमचे तेल, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे ओलं खोबरं, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची चटणी

कृती:

ADVERTISEMENT
  • पॅन गरम करुन त्यामध्ये सुका जवळा भाजून घ्या. तो छान कुरकुरीत व्हायला हवा.  जवळा एका भांड्यात काढून घ्या. आता त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये कांदा अगदी छान परतून घ्या.
  • त्यामध्ये खोबरं घालून भाजून घ्या. त्यात हळद, लाल तिखट घाला. हे मिश्रण छान एकजीव झाले की, त्यामध्ये मीठ घालून चिंचेची चटणी घाला. एकजीव करुन मग त्यात जवळा घाला आणि कोथिंबीर घालून हे किसमूर मस्त चटणीप्रमाणे किंवा आवडल्यास भाजीप्रमाणेच खा.

असा स्वच्छ करा जवळा (How To Clean Jawala In Marathi )

जवळ्याचं किसमूर

Instagram

ओले मासे आणि सुके मासे साफ करण्यामध्ये खूप फरक आहे. ओले मासे हे साफ करणं फार कठीण असतं. पण सुक्या माशांच्या बाबतीत असे होत नाही. जवळा हा तर एकदम स्वच्छ आणि पांढरा फडफडीत असा मासा. तो ओला असतानाही फार कटकट नसते. आणि सुकल्यावरही नाही. पण तरीही हे जास्त काळ टिकवायचे असेल तर असा करा स्वच्छ 

ADVERTISEMENT
  1. सुका जवळा हा इतका कोरडा होतो की, त्याचा अगदी चटकन भुगा होतो. त्यामुळे हा भुगा आधी स्वच्छ करण्यासाठी जवळा चाळणीतून चाळून घ्या. त्यामुळे त्यातील मातीही निघून जाते.
  2. जवळा सुकवताना त्यामध्ये अनेकदा लहान लहान इतर मासेही येतात. त्यामुळे जवळा बाहेरुन आल्यावर चांगला स्वच्छ करुन घ्या. 
  3. जवळा जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल तर तो एअर टाईट डब्यामध्ये भरुन ठेवा. त्यामुळे तो अधि काळ टिकतो.

आता जवळ्याच्या या रेसिपीज नक्की ट्राय करुन पाहा तुम्हाला नक्की आवडतील. सुकटीच्या आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माहीत आहेत त्यादेखील आम्हाला कळवा.

जाणून घ्या कुळीथ (हुलगे)चे अफलातून फायदे आणि रेसिपीज (Benefits of Kulith Dal In Marathi)

22 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT