त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण चेहरा, मान आणि हात यांच्याकडे जास्त लक्ष देतो. त्वचेची वेळच्या वेळी स्वच्छता राखल्यामुळे ती त्वचा मऊ आणि मुलायम होते मात्र बऱ्याचदा पायांच्या स्वच्छता आणि काळजीकडे थोडसं दुर्लक्ष केलं जातं. महिन्यातून एकदा अथवा दोनदा फक्त पेडिक्युअर केल्याने पाय स्वच्छ होत नाहीत. सतत पायांवर साचलेला धुळ आणि मातीमुळे पाय फुटू लागतात, पायांना भेगा पडतात आणि पायांचे सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागते. यासाठी घरीदेखील सतत पायाची काळजी घ्यायला हवी. पायांची निगा राखण्यासाठी तुम्ही घरी काही फूट मास्क तयार करू शकता. यासाठीच जाणून घ्या हे होममेड फूट मास्क कसे तयार करावे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो.
पायाची निगा राखण्यासाठी घरगुती फूट मास्क
हे फूट मास्क तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता कारण यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला तुमच्या घरात सहज मिळू शकतं.
ओट्सचा फूट मास्क
ओट्स फक्त चेहऱ्याचीच नाही तर पायांची निगा राखण्यासाठी उपयोगी आहे. ओट्समुळे पायांच्या भेगा कमी होतात आणि पाय मऊ दिसू लागतात. यासाठी फूड प्रोसेस अथवा मिक्सरमध्ये ओट्स आणि ब्राऊन शूगर वाटून घ्या. त्यात मध, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळा. दोन्ही पावलांवर हे मिश्रण लावा आणि पाच मिनिटे मसाज करापायाला फूट कव्हर अथवा पॉली बॅगने झाकून ठेवा. वीस ते तीस मिनिटांनी कोमट पाण्याने पाय धुवून टाका.
shutterstock
कोरफडाचा फूट मास्क
कोरफड त्वचेसाठी उत्तम तर असतंच शिवाय त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. अॅलर्जी टाळण्यासाठी तुम्ही पायावर कोरफडाचा मास्क नक्कीच लावू शकता.यासाठी कोरफडाच्या पानांचा गर काढून घ्या त्यात थोडं नारळाचे तेल मिसळा आणि मिक्सरमध्ये चांगले एकजीव करा. हा मास्क पायांवर लावा आणि पायाला मसाज करा. वीस मिनिटांनी पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा.
काकडीचा फूट मास्क
काकडी त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. पायाला काकाडीचा फूटमास्क लावल्याने पाय स्वच्छ तर होतातच शिवाय पायांचे केमिकलमुळे नुकसानही होत नाही. कारण काकडी नैसर्गिक मॉईस्चराईझर आहे. यासाठी काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळा तुम्ही यात बदामाचे तेलही टाकू शकता. सर्व साहित्य एकत्र करा आणि पायांवर हा मास्क लावा. वीस ते तीस मिनिटांनी पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा.
shutterstock
कोको बटर
कोको बटर त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासोबत त्वचा स्वच्छदेखील करते. म्हणूनच कोको बटरचा वापर बॉडी स्क्रबमध्ये केला जातो.यासाठी एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल आणि थोडं कोको बटर घ्या. या मिश्रणात चांगला फायदा होण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सुल्स फोडून मिसळू शकता. सर्व मिश्रण एकजीव करा आणि पायांना मालिश करा. कोमट पाण्याने पाय वीस मिनिटांनी स्वच्छ करा.
आम्ही शेअर केलेले हे फूट मास्क तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. शिवाय या फूटमास्कसोबत आमचे इतर ब्युटी प्रॉडक्टही अवश्य ट्राय करा
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे
अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी
दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब