केसांसाठी वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट या कायम येत असतात. केरेटीन ट्रिटमेंट, स्पा ट्रिटमेंट या त्यामधील काही अशा ट्रिटमेंट आहेत ज्यांना खूप मागणी असते. केस सुंदर दिसण्यासाठी या ट्रिटमेंट आतापर्यंत अनेकांनी केल्या असतील. वेगवेगळ्या पद्धतीच्या या ट्रिटमेंटस वेगवेगळ्या कारणांसाठी केल्या जातात. केसगळती, कोंडा, केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी या ट्रिटमेंटस केल्या जातात. पण आता एक नवी ट्रिटमेंट सगळ्या सलोनमध्ये दिसू लागली आहे ती म्हणजे व्हिटॅमिन ट्रिटमेंट. आता ही ट्रिटमेंट नेमकी काय आणि ती कशासाठी केली जाते असा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी यामध्ये आपण व्हिटॅमिन ट्रिटमेंट म्हणजे काय ती कशी करतात ते जाणून घेऊया.
शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस
व्हिटॅमिन ट्रिटमेंट म्हणजे काय?
ज्या पद्धतीने स्पा ट्रिटमेंटमध्ये स्पा क्रीमचा समावेश केला जातो. अगदी त्याच पद्धतीने व्हिटॅमिन ट्रिटमेंटसाठी केसांच्या आवश्यकतेनुसार व्हिटॅमिन्सचा उपयोग केला जातो. एखाद्या कॅप्सुलप्रमाणे या असतात.यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे लिक्विड सोल्युशन असते.हे लिक्विड सोल्युशन तुमच्या केसांना रिपेअर करण्याचे काम करते. केसांच्या समस्यांनुसार त्याची निवड केली जाते. केसांसाठी केली जाणारी ही ट्रिटमेंट स्पाच्या तुलनेत महाग असली तरी त्याचा फायदा हा जास्त काळासाठी मिळतो. त्यामुळे तुम्हाला ही ट्रिटमेंट करण्यास काहीच हरकत नाही.
केस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग
अशी केली जाते व्हिटॅमिन ट्रिटमेंट
अग्रगण्य ब्रँड प्रॉडक्ट वापरुन ही ट्रिटमेंट केली जाते. आता बजेटही जास्त असल्यामुळे ही ट्रिटमेंट अगदी साग्रसंगीत पद्धतीने केली जाते. ती कशी ते जाणून घेऊया
- सगळ्यात आधी तुमचा केसांचा पोत आणि केसांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. केसांना कोणत्या व्हिटॅमिन्सची गरज आहे ते जाणून घेत त्यानुसार हेअर एक्सपर्ट ट्रिटमेंट करण्याचा सल्ला देतो.
- केसांना सगळ्यात आधी चांगला हेअरवॉश केला जातो. केस केरेटीन बेस शॅम्पूने धुतले जातात. केसांना दोनदा शॅम्पू लावून केस धुतले जातात.
- आता वेळ येते ती म्हणजे केसांना ट्रिटमेंट केली जाते. केसांचे सेक्शन करुन त्यामध्ये हे सोल्युशन लावले जाते. हे सोल्युशन केसांना लावून केसांना मसाज केला जातो.
- केसांमध्ये हे सोल्युशन मुरवण्याचे काम केले जाते. साधारण ही ट्रिटमेंट होण्यासाठी किमान 30 मिनिटं तरी लागतात.
- केसांमध्ये हे सोल्युशन लावून काही काळ ठेवल्यानंतर केसांना पुन्हा एकदा हेअर वॉश केला जातो. त्यानंतर केस सुंदर दिसू लागतात. केसांना एक वेगळीच चमक मिळते.
ही हेअर ट्रिटमेंट करण्यासाठी साधारण 2हजार 500 पासून पुढे सुरु होतात. त्यामुळे तुम्ही या ट्रिटमेंट योग्य विचार करुन आणि काहीतरी खास कार्यक्रमांच्यावेळीच करा. चार ते पाच महिन्यातून एकदा ही ट्रिटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही.