प्रत्येक महिलेला वाटत असतं की, आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसावी. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळातही घरातल्या घरात अनेक पद्धती वापरून महिलांनी आपल्या चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेतली. इतकंच नाही तर आपल्या अनेक अभिनेत्रींनीही या काळात घरगुती अनेक उपाय सांगितले. काही टिप्सही आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या. त्यामुळे पार्लरपेक्षा घरगुती उपाय अधिक कामी येऊ लागले आहेत आणि आता महिलांना त्याचा अनुभवही चांगला येऊ लागला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा (marathi diwali wishes) देण्यासाठी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो अर्थात चमक हवी असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही या लेखातून तुम्हाला देणार आहोत. 10 मिनिट्समध्ये तुम्ही घरच्या घरी फेशिअल करून हा लुक मिळवू शकता. तीन सोप्या स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत आणि हे फेशिअल करून तुम्हाला त्वरीत चेहऱ्यावर चमक मिळेल. सध्या कामाच्या ओझ्यामुळे कुठेही बाहेर जाऊन काही तास फुकट घालवणं शक्य नाही. त्यामुळे घरातील कामं करता करता तुम्ही या स्टेप्स फॉलो करून पटकन चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या पद्धती आणि कशी येईल चेहऱ्यावर त्वरीत चमक.
पहिली स्टेप – एक्स्फोलिएट
Shutterstock
फेशिअल करण्यासाठी सर्वात पहिले त्वचा एक्स्फोलिएट करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले तांदळाचे पीठ आणि त्यात थोडीशी दुधाची मलई मिक्स करा. हे दोन्ही पदार्थ चेहऱ्यावर अप्रतिम काम करतात. त्वचेसाठी हा उत्तम स्क्रब आहे. हे बनविण्यासाठी तुम्ही एक चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात थोडीशी दुधाची मलई मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. चेहऱ्यावर हळूहळू सर्क्युलेशन पद्धतीने चेहऱ्यावर ही पेस्ट चोळा. नंतर काही वेळा चेहरा धुवा.
त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल
दुसरी स्टेप – मसाज
Shutterstock
घरामध्ये फेशिअल करण्याची दुसरी स्टेप म्हणजे मसाज करणे. यासाठी सर्वात पहिले आपला चेहरा धुऊन घ्या आणि मग चेहऱ्यावर फेशिअल क्रिम लावा. हे क्रिम तुम्ही घरात तयार करून घेऊ शकता. दुधाची साय, चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन मिक्स करून घ्या आणि याची पेस्ट बनवा. याची थोडी जाडसर पेस्ट बनवा जेणेकरून चेहऱ्यावर मसाज करणं सोपं होईल. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा आणि मग मसाज करा. ही पेस्ट चेहऱ्याला हायड्रेट ठेवते आणि नैसर्गिक घटक असल्याने चेहऱ्यावर त्वरीत चमक देते. 10 मिनिट्स हलक्या हाताने मसाज केल्यावर तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुवा. हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक असल्याने चेहऱ्यावरील अधिक तेल काढून टाकण्यास आणि चेहऱ्यावरील प्रदूषण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तर दुधाची साय आपले सौंदर्य खुलवण्यास फायदेशीर ठरते कारण हि साय तुमचा चेहरा अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी उत्तम आहे.
त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon And Honey For Skin)
तिसरी स्टेप – फेसपॅक
Shutterstock
फेशिअलची तिसरी स्टेप म्हणजे चेहऱ्यावर फेसपॅक लावणे. फेसपॅक बनविण्यासाठी तुम्ही दुधाची साय घ्या आणि त्यात थोडासा मध आणि चिमूटभर हळद मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्यावर पार्लरप्रमाणे चमक येईल. तसंच हे करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही.
महिन्यातून एकदा फेशियल आहे महिलांसाठी फारच महत्वाचे
केवळ 10 मिनिट्समध्ये तुमच्या चेहऱ्यावर चमक येऊन चेहऱ्याशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते. अर्थात तुम्हाला चेहऱ्यावर जर मुरूमं, पुळ्या, बंद पोअर्स, निस्तेज त्वचा आणि वेळेआधी सुरकुत्या अशा समस्या असतील तरीही तुम्ही वरील स्टेप्सचा वापर करून समस्या कमी करून घेऊ शकता. हे फेशिअल अत्यंत नैसर्गिक घटक वापरून करण्यात आले असल्याने त्याचा त्वचेवर दुष्परिणामही होत नाही. पण तरीही तुम्ही काळजीसाठी चेहऱ्यावर वापरण्याआधी हातावर नक्की एकदा याचे परीक्षण करून घेतलेले चांगले.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक