अगदी काही दिवसातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये बदल हवा असेल आणि चमकदार त्वचा हवी असेल तर आज आम्ही तुमच्यासोबत 15 दिवसांचा एक सोपा स्किनकेअर रुटीन शेअर करणार आहोत. हे स्किकेअर रुटीन करण्यासाठी तुम्हाला काहीही बाहेरुन आणण्याची गरज नाही. किंवा काहीही वेगळे करण्याचे गरज नाही. तुम्ही रोज करत असलेल्या स्किनकेअरच कधी आणि योग्य करावी ते तुम्हाला सांगणार आहोत.चला करुया सुरुवात
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल
क्लिनझिंग (Cleansing)
त्वचेसाठी क्लिनझिंग ही फार महत्वाची असते. जर तुम्ही क्लिनझिंगला फार कमी महत्व दिले असेल तर पुढील 15 दिवसात तुम्हाला या गोष्टीला महत्व द्यायचे आहे. तुमची त्वचा अगदी कोणत्याही प्रकारातली असली तरी देखील तुम्हाला तुमच्या आवडीचे आणि त्वचेला सूट होईल असे क्लिनझर निवडून दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ करा. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करा.
उदा. तुम्ही फोमबेस्ड क्लिनझर वापरत असाल तरीही त्याचा वापर दिवसातून दोनदा करा. अनेकदा चेहरा तेलकट असेल तर अशा लोकांना सतत चेहरा धुवायची सवय असते. पण असे न करता तुम्ही चेहरा इतरवेळी पाण्याने धुवा पण चेहरा दोनच वेळा क्लिनझरने धुवा.
स्क्रबिंग (scrubing)
कोणत्याही त्वचेसाठी स्क्रबिंग हे फार महत्वाचे असते. चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग केले जाते. पण चेहऱ्यासाठी स्क्रबचा उपयोग किती करायला हवा हे ही माहीत हवे. कोणतीही त्वचा असली तरी देखील तुम्ही आठवड्यातून केवळ दोनवेळाच चेहऱ्यासाठी स्क्रब वापरायला हवे. चेहऱ्यासाठी स्क्रबची निवड करताना त्यातील स्क्रबचे कणही मायक्रो असू द्या.
उदा. स्क्रबचा उपयोग करताना तुम्ही त्याचा चेहऱ्यावर खूप वापर करणे टाळा. चेहऱ्यावर जास्तीत जास्त एक मिनिटांपेक्षा जास्त वापर करु नका.
झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा
चेहऱ्यावर घ्या वाफ (Steam On Face)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घेणेही कोणत्याही त्वचेसाठी चांगले असते. पंधरा दिवसातून तुम्ही फक्त दोनच वेळा चेहऱ्यावर वाफ घ्या. वाफ घेण्यामुळे त्वचेवरील छिद्र खुली होतात. त्यात साचलेली घाण काढण्यास मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ते फुटून त्यातून घाण निघून जाते. त्यामुळे तुम्ही वाफ घ्या. वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावरील पोअर्स बंद करायला विसरु नका. त्यामुळे तुम्ही चेहऱ्याला बर्फ लावायला विसरु नका.
फेस पॅक (Face Pack)
चेहऱ्याला आराम देण्यासाठी फेसपॅकही चांगला पर्याय आहे. किचनमध्ये असलेल्या फळांपासून तुम्ही आरामात कोणताही फेसपॅक बनवू शकता. अंडी, बेसन, केळं या कशाचाही वापर करुन तुम्ही फेस पॅक बनवू शकता. चेहऱ्यावर फेसपॅक लावून तुम्ही 10 मिनिटे ठेवा. चेहरा स्वच्छ करुन घ्या आणि त्यावर चांगले मॉश्चरायझर लावा.
पोट ठेवा साफ (Clean stomach)
उत्तम त्वचेसाठी पोट स्वच्छ राहणेही गरजेचे असते. पुढील 15 दिवस तुम्ही पोट स्वच्छ ठेवा. जास्तीत जास्त फळांचा समावेश करा. जर तुम्ही फायबर असलेले पदार्थ खाल्ले तर तुमचा कोटा स्वच्छ होण्यास मदत मिळतो. पोट साफ होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही उत्तम काढा, गरम पाणी प्या. म्हणजे तुमचे पोट स्वच्छ होईल.
आता 15 दिवसात चांगली त्वचा हवी असेल तर हमखास तुम्ही हे करा.
चांगल्या मॉश्चरायझरच्या शोधात असाल तर तुम्ही माय ग्लॅमच्या प्रोडक्टची करा निवड