Recipes

अगदी दोन मिनिटात घरच्या घरी करा मस्त ‘मगकेक’

Leenal Gawade  |  Dec 18, 2019
अगदी दोन मिनिटात घरच्या घरी करा मस्त ‘मगकेक’

केक आवडतो खूप जणांना पण तो करणं म्हणजे अनेकांना मन: स्ताप वाटतो. कारण त्याचे साहित्य इतके असते आणि त्यासाठी लागणारी मेहनत इतकी असते की, केक बनवणे अनेक जण टाळतात. पण यावेळी तुम्ही असा केक करुन पाहा जो तुम्ही मायक्रोव्हेवमध्ये दोन मिनिटात आणि कुकरमध्ये केवळ सात मिनिटात बनवू शकता. ही रेसिपी करणं फारचं सोपं आहे. त्यामुळे यंदा जर केक बनवण्याच्या विचारात असाल तर तुम्ही आधी असा मग केक बनवून पाहा.

घरच्या घरी तयार करा चिंचेच्या पाचक गोळ्या

साहित्य:  मैदा, कंडेन्स्ड मिल्क, बटर किंवा तेल, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध,व्हेनिला इसेन्स/ बटर व्हॅनिला, अंड, चोकोचिप्स, कॉफी, डार्क चॉकलेट, न्युटेला, कोको पावडर

आता वरील साहित्य हे आम्ही तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगितले आहे. आता या साहित्यातून तुम्ही वेगवेगळे केक कसे बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

चॉकलेट मगकेक

Instagram

कृती: एका मग किंवा कपमध्ये तीन चमचे मोठा मैदा घ्या. त्यात तुम्ही अर्धा चमचा कोको पावडर, लहान चमचा बेकिंग पावडर आणि अगदी चिमुटभर बेकिंग सोडा घाला. ( बेकिंग सोडा जास्त झाला तर तुमची सगळी रेसिपी कडू होऊ शकते.)  सगळे कोरडे मिश्रण एकजीव करा. त्यात अजिबात हवा राहता कामा नये. आता त्यात एक चमचा वितळलेलं बटर घाला.दोन चमचे कंडेन्स्ड मिल्क आणि दोन चमचे दूध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यामधील गुठळ्या मोडून घ्या. त्यात आवडीनुसार चोकोचिप घालून मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही हा मग मायक्रोव्हेवमध्ये ठेवून द्या. दोन मिनिटांमध्ये हा केक छान फुलून येतो. आणि छान आतपर्यंत शिजतो. तुम्ही हा केक मगमध्येच सर्व्ह करु शकता. यावर तुम्ही छान चोकोचिप टाका आणि गरमागरम कॉफीसोबत तुम्ही हा केक खा. 

हिवाळ्यात मक्याचं पीठ वापरून केलेली पोळी आणि पदार्थ खाण्याचे फायदे

न्युटेला कप केक

Instagram

कृती : न्युटेला कपकेक बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी कपमध्ये एक चमचा वितळलेलं बटर, दोन चमचा कंडेन्स्ड मिल्क आणि दोन चमचे दूध घाला. मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यात दोन चमचे मैदा आणि एक चमचा कोको पावडर घाला. एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि एक चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करा.त्यात सगळ्यात शेवटी न्युटेला घालून मिश्रण एकजीव करुन हे मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. जर तुम्ही कुकरमध्ये केक बनवणार असाल तर तुम्हाला केक वाफवून सुद्धा घेता येईल.

कॉफी केक

Instagram

कृती:  2 चमचा बटर , एक चमचा कंडेन्स्ड मिल्क आणि एक चमचा दूध एकत्र करुन घ्या.  दोन चमचे कॉफीचे सोल्युशन एका भांड्यात घ्या ( तुम्ही एका भांड्याच्या बुडाशी पाणी घेऊन त्यात दोन चमचे कॉफी पावडर घाला. हे मिश्रण तुम्हाला तुमच्या केकसाठी वापरायचे आहे.) त्यात दोन चमचे मैदा, एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि किंचितसा बेकिंग सोडा घेऊन  मिश्रण एकजीव करुन घ्या. तुमचा मग मायक्रोव्हेवमध्ये ठेऊन दोन मिनिटे शिजवा. तुमचा केक तयार 

मग आता तुम्ही घरच्या घरी अंड्याशिवाय असा मग केक नक्कीच बनवून पाहा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल.

#POPxoLucky2020: आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास राशींचंं कलेक्शन (Zodiac Collection)!2020 अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलं आहे. वर्षाचा शेवट होत आला की आपण वाट पाहतो ती नवीन वर्षाची आणि त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं असतं ते म्हणजे आपलं हे वर्ष नक्की कसं जाणार. पण आता तुम्हाला जास्त वाट पाहावी नाही लागणार कारण POPxo app तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत.

देखील वाचा – 

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश

Read More From Recipes