भविष्य

2021 मध्ये लग्न करायचा असेल विचार तर यावर्षी आहेत 50 मुहूर्त

Dipali Naphade  |  Jan 18, 2021
2021 मध्ये लग्न करायचा असेल विचार तर यावर्षी आहेत 50 मुहूर्त

या वर्षाच्या अगदी सुरूवातीपासूनच सगळीकडे सनई चौघड्यांचे आवाज घुमू लागले आहेत. अगदी सामान्यच नाही तर सेलिब्रिटीही यावर्षी अगदी वर्षाच्या सुरूवातीपासूनच लग्न करत आहे. तुम्हालाही 2021 मध्ये लग्नगाठ बांधायची असेल तर तब्बल 50 मुहूर्त यावर्षी आहेत. लगीनघाई असेल तर या मुहूर्तांपैकी एक तुम्हीही निवडू शकता. यावर्षी असे नेमके कोणकोणते मुहूर्त आहेत हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. यावर्षी कुंभ मेळा असल्याने वसंत पंचमीला असणारा मुहूर्त मात्र नाही. बऱ्याचदा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर लग्न करण्यात येतात. पण यावर्षी वसंत पंचमीचा मुहूर्त मात्र नाही. पौष महिन्यात लग्न होत नाहीत. पण 19 जानेवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत गुरू तारा अस्त असल्यामुळे या महिन्यात मुहूर्त नाही. 19 जानेवारीला काही ठिकाणी काढीव मुहूर्त आहेत. पण 22 एप्रिलनंतर ते 15 जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे मुहूर्तांच्या शोधात असेल तर लगेच मुहूर्त काढून घ्या आणि मुहूर्ताचं ठरल्यावर लग्नात मराठी उखाणे कोणते घ्यायचे तेही नक्की ठरवा.

एप्रिलमधील विवाहाचे मुहूर्त

एप्रिलमध्ये तितकंसं गरम होत नाही. गरम होत असेल तर हल्ली एसी  हॉलशिवाय लग्नही होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर एप्रिल महिन्यात लग्न करायचं असेल तर या महिन्यात आठ दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत. तुम्ही यापैकी तुम्हाला हवं त्या दिवशी लग्न ठरवू शकता  आणि तयारी करू शकता. कारण अजून  किमान तीन महिने तरी आहेत. त्यामुळे तुमच्या हातात बरेच दिवस आहेत. जेणेकरून तुम्ही लग्नाची इत्यंभूत तयारी करू शकता. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 22, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 एप्रिल

यामध्ये 24, 25 या तारखांना शनिवार आणि रविवार आहेत. ज्यांना मधल्या दिवशी  लग्न करायचं नसेल त्यांच्यासाठीही या तारखा उपलब्ध आहेत. 

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

मे महिन्यातील विवाहाचे मुहूर्त

यावर्षी सर्वात जास्त मुहूर्ताचे दिवस आहेत ते मे महिन्यात. अगदी  महिन्याच्या सुरूवातीपासून ते महिन्याच्या शेवटापर्यंत विवाहासाठी उत्तम  आणि शुभ दिवस आहेत. मे महिन्यात सुट्टी घेता येते आणि घरातील लहान मुलांच्या शाळांचाही त्रास नसतो. त्यामुळे उन्हाळा असला तरीही  मे महिन्यात लग्न करण्याला अनेक घरांमध्ये प्राधान्य दिले जाते. यावर्षी मे महिन्यात खूपच मुहूर्त आहेत. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 1, 2, 7, 8, 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 आणि 30 मे

एकूण सोळा मुहूर्त मे महिन्यामध्ये आहेत. तर यामध्ये साधारण चारही शनिवार आणि रविवार लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या जोडप्यांना मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणताही  मुहूर्त तुमच्या भटजींंना विचारून काढून घेऊ शकता.

जून महिन्यातील विवाहाचे मुहूर्त

जून महिन्यात खरं तर खूपच गरम होत असते. पण पाऊस येण्याची आशाही असते. त्यामुळे असा उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मध्यात लग्न करावे असंही काही जणांना वाटत असते. त्यांच्यासाठी जून महिन्यातील काही शुभ मुहूर्त आहेत. यावर्षी साधारण आठ तारखांना शुभ मुहूर्त आहे. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 3, 4, 5, 16, 20, 22, 23 आणि  24 जून 

तुम्हाला हवं तर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठीही या तारखा बुक करू शकता. पण सुरूवातीच्या काळात ज्यांच्या लग्नाची तारीख ठरली असेल त्यांनी असा प्लॅन करा. अन्यथा पावसाचा आपल्याकडे भरवसा नसतो याची तुम्हाला कल्पना आहेच. 

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

जुलै महिन्यातील विवाहाचे मुहूर्त

यावर्षी पावसाळा साधारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण या महिन्यातदेखील लग्नाचे 5 मुहूर्त आहेत. पण जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांमध्ये एकही लग्नाचा मुहूर्त नाही. त्यामुळे ज्यांना वर्षाच्या मध्यात लग्न करायचे असेल त्यांच्यासाठी हे मुहूर्त उपयोगी ठरू शकतात. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 1, 2, 7, 13 आणि 15 जुलै 

जुलै महिन्यात पावसामुळे थोडा  गारवा यायलाही सुरूवात झालेली असते. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात लग्न करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हे पाच मुहूर्त आहेत. 

नोव्हेंबर महिन्यातील विवाहाचे मुहूर्त

नोव्हेंबरमध्ये 14 नोव्हेंबरला देवशयनी एकादशी असल्याने या दिवसापासून विवाहाच्या मुहूर्तांना पुन्हा सुरूवात होईल. यावेळी साधारण हलका हलका गारवाही हवेत यायला लागलेला  असतो.  त्यामुळे तुम्हाला जर या महिन्यात लग्न करायचे असेल तर तुमच्यासाठी काही खास शुभ मुहूर्त आहेत. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 15, 16, 20, 21, 28, 29 आणि  30 नोव्हेंबर

या महिन्यात लग्न केल्यास, तुम्हाला हवा तितका वेळ मिळतो आणि तुम्हाला हवी तशी खरेदीही करता येते. तुम्हाला आतापासूनच तयारीलाही लागता येईल. 

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

डिसेंबर महिन्यातील विवाहाचे मुहूर्त

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी सहा शुभ मुहूर्त आहेत. बऱ्याच जणांची इच्छा असते की विंटर वेडिंग अथवा वर्षाच्या शेवटी लग्न करायचे आहे. तर तुमच्यासाठी हे मुहूर्त आहेत. तुम्ही यापैकी तारखेची निवड करून आतापासूनच तयारीला लागू शकता. 

लग्नाचा शुभ मुहूर्त – 1, 2, 6, 7, 11 आणि 13 डिसेंबर

वर्षाच्या शेवटी तुमची लग्न करण्याची इच्छा असल्यास, हा मुहूर्त  तुम्ही साधू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From भविष्य