आयुष्य

आधुनिक काळात लग्नात द्या योग्य वचनं, तुम्हालाही आवडेल हा बदल

Dipali Naphade  |  Mar 29, 2021
आधुनिक काळात लग्नात द्या योग्य वचनं, तुम्हालाही आवडेल हा बदल

लग्न म्हटलं की अनेक गोष्टी असतात. पण त्यातही महत्वाची समजली जातात ती सात जन्मासाठी एकमेकांसाठी घेतलेली वचनं. पण आता खरं तर काळानुसार वचनंही बदलायला हवीत. आधुनिक काळामध्ये तुम्ही लग्नामध्ये एकमेकांना योग्य वचनं द्या आणि ती निभावण्याचा नक्की प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला इथे काही आधुनिक काळाप्रमाणे तयार केलेली वचनं सांगत आहोत. तुम्हालाही हा बदल नक्की आवडेल. तुम्ही जर लग्नबंधनात आता अडकणार असाल तर नक्की तुम्ही या वचनांचा वापर करा. पारंपरिक सात वचनांमध्ये केलेला फेरबदल तुम्हाला आवडतोय का हे वाचून झाल्यावर नक्की आम्हाला सांगा. पूर्वीची वचनं ही पूर्वीच्या काळानुसार तयार करण्यात आली होती. त्यावेळी बहुतांशी महिला या घरात असायच्या. पण आता तसं राहिलेलं नाही. त्यामुळे आता लग्न करताना नक्की कोणते बदल वचनांमध्ये हवेत ते जाणून घेऊया. 

घरातील कामं वाटून घेऊ

Instagram

आता बऱ्याच ठिकाणी मुलगा आणि मुलगी दोघेही ऑफिसमध्ये काम करणारे असतात. त्यामुळे दोघांनाही कामाचा ताण तितकाच असतो. आता एकमेकांना साथ देत जाण्याची गरज आहे. काही वेळा घरात दोघेच असतात. त्यामुळे स्वतःची कामंही स्वतःच करावी लागतात. जेवण बनविण्यापासून ते अगदी घरकामातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी असते. त्यामुळे दोघेही ही जबाबदारी उचलतील आणि घरातील कामं वाटून घेऊन एकमेकांना साथ देतील हे पहिले वचन लग्नात द्यायला हवे आणि ते निभावायला हवे.

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

एकमेकांच्या भावनांचा आदर केला जाईल

लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये जोड्यांचे जग काही वेगळेच असते. प्रेम, काळजी आणि शेअरिंग करणं यामध्येच सगळा वेळ जातो. पण जेव्हा हे दिवस संपतात तेव्हा खरा संसार सुरू होतो. घराची आणि बाहेरची जबाबदारी बऱ्याचदा दोघांनाही चिडचिडे करते. लग्नापूर्वी आपले आई वडील सर्व काही सांभाळत असतात. पण जेव्हा स्वतःचा संसार सुरू होतो तेव्हा काहीच सोपं नसतं. त्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. तसंच एकमेकांच्या भावनांचा आदर केला तरच संसार सुरळीत होऊ शकेल. त्यामुळे एकमेकांचा आदर करू हे दुसरे वचन महत्वाचे आहे. 

एकमेकांच्या मित्रमैत्रिणींचा आदर करू

लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. पण आपल्या मित्रमैत्रिणींसह आपली मैत्री तशीच राहते. लग्नानंतर मित्रमैत्रिणींना भेटायला जाण्यावरून बऱ्याचदा वाद होऊ शकतात. पण जसं आयुष्य नवऱ्याला आहे तसंच ते बायकोलाही जगायला मिळायला हवंं. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या मित्रमैत्रिणींचा आदर राखायला हवा. हे तिसरे वचन आहे. 

लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का

आरोग्याची आणि सेक्स करताना हायजीनची काळजी घेऊ

लग्नाचा पाया हा हेल्दी सेक्स लाईफवर अवलंबून असतो. त्यामुळे आपली सेक्शुअल हेल्थ व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आणि आपले प्रायव्हेट पार्ट्स नीट स्वच्छ करणे ही हायजीन दोघांनीही व्यवस्थित पाळायला हवी. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या जोडीदाराला कोणत्याही तऱ्हेचे इन्फेक्शन होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपणच काळजी घेऊ हे आपल्या जोडीदाराला दोघांनाही पटवून द्यायला हवे. 

एकमेकांवर आपली मर्जी थोपवणार नाही

प्रेमामध्ये अनेक जोड्या एकमेकांना खूष करण्यासाठी बरेचदा समोरच्या जोडीदाराचं ऐकतात. पण कोणतीही गोष्ट तुम्ही आपल्या मर्जीविरुद्ध जाऊन करू नका. आपण कसे कपडे घालावे, कोणाशी कसे वागावे, कसे बोलावे या सगळ्या आपल्या गोष्टींवर जोडीदाराचे बंधन असायला नको. त्यामुळे आपण जसे आहोत तसे स्वीकारून एकमेकांवर कोणतीही मर्जी थोपवणार नाही हे महत्वाचे वचन द्यायला विसरू नका. पण आपल्या जोडीदाराचे मत विचारायला विसरू नका. कोणत्याही बाबतीत त्यांचे मत जाणून घेणेही गरजेचे आहे. 

लग्न करण्याआधी जोडीदाराकडून घ्या गोष्टीची खात्री

हेल्दी लाईफस्टाईल सांभाळण्यासाठी करणार एकमेकांची मदत

आपल्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी खूपच महत्वाच्या झाल्या आहेत. अशावेळी अगदी डाएटपासून ते व्यायामापर्यंत दोघेही एकमेकांची मदत करतील हे वचनही तितकेच योग्य आहेत. एखादा जोडीदार फूडी आणि दुसरा फिटनेसवाला असेल तर नक्कीच या जोडप्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण समोरच्या व्यक्तीला महत्व समजावून दोन्ही गोष्टींचे संतुलन ठेवता आले पाहिजे. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल सांभाळण्यासाठी दोघेही एकमेकांची मदत करतील असे वचन एकमेकांना द्यावं आणि तशी काळजी घ्यावी. 

खर्चाची जबाबदारी दोघांची समान असेल

खर्च हीदेखील संसारात महत्वाची गोष्ट असते. घरातील खर्चापासून ते अगदी गुंतवणूक आणि सेव्हिंग्जपर्यंत दोघांची जबाबदारी समसमान असेल हे दोघांनाही एकमेकांना सांगा. सेव्हिंगची जबाबदारी केवळ नवऱ्याची अथवा पत्नीची नसावी. दोघांनीही नक्की आपण कमावत असणारा पैसा कसा वाचवायचा आणि कुठे घालवायचा हे नीट प्लॅन करून मगच खर्च करावा. त्यामुळे संसाराला योग्य दिशा मिळते. 

तसंच एकमेकांबरोबर वेळ घालवणे, बायकोला तिच्या माहेरी जाऊ देणे, महिन्यातून किमान एकदा तरी फिरायला जाणे या सगळ्या गोष्टी गृहीत आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमचे लग्न योग्य वचनांसह टिकेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आयुष्य