आपल्या सौंदर्याच्या बाबतीत महिला आणि पुरुष दोघेही नेहमीच सतर्क असतात. पण आपला स्किन टाईप नक्की कोणता आहे याबाबत मात्र बऱ्याच जणांना व्यवस्थित माहिती नसते. त्यामुळे आपल्या त्वचेवर नक्की कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे याचीही कल्पना येत नाही. कोणत्याही प्रकारच्या स्किन केअर ट्रीटमेंट अथवा घरगुती उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या त्वचेचे क्लिन्झिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या त्वचेचा टाईप कोणताही असो पण त्वचा स्वच्छ आणि साफ होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी नियमित क्लिंन्झिंगचीदेखील आवश्यकता आहे. तुम्ही याकडे जितकं दुर्लक्ष कराल तितकी तुमची त्वचा अधिक खराब होईल. पण हे करण्यासाठी सतत पार्लरला जायची आणि खर्च करावा लागणार का? असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्याची काहीही गरज नाही. आपण आपल्या घरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून अर्थात घरगुती क्लिंन्झरचा वापर करून आपली त्वचा अधिक चमकदार नक्कीच करू शकतो. या लेखातून आम्ही तुम्हाला घरगुती क्लिंन्झर म्हणून कोणत्या वस्तूंचा वापर करायचा आणि त्वचा अधिक चमकदार कशी बनवायची याची माहिती देणार आहोत. तुम्हाला हे उपाय नक्कीच सोपे वाटतील आणि त्याशिवाय हे घरगुती क्लिंन्झर खर्चिकदेखील नाहीत.
1. नैसर्गिक क्लिंन्झर आहे दही
Shutterstock
तेलकट त्वचेपासून ते अगदी कॉम्बिनेशन त्वचेपर्यंत सगळ्यांसाठी दही हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही नैसर्गिक क्लिंन्झर म्हणून दह्याचा वापर करू शकता. दोन चमचे दही घेऊन तुम्ही रोज आपल्या चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या त्वचेला स्वच्छ करण्याचं काम दही करतं. त्याचप्रमाणे रोजच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठीही दह्याचा उपयोग होतो. दह्यामधील चांगले बॅक्टेरिया हे आपल्या त्वचेवरील धूळ आणि माती काढून त्वचा अधिक उजळ करण्याठी आणि स्वछ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
2. टॉमेटोही ठरतो फायदेशीर
Shutterstock
जेव्हा गोष्ट त्वचेच्या काळजीची असते तेव्हा नैसर्गिक क्लिंन्झर म्हणून टॉमेटोदेखील उपयुक्त ठरतो. टॉमेटो हा त्वचेवर स्क्रबप्रमाणे काम करतो. यासाठी अर्धा टॉमेटो घेऊन तुम्ही तुमच्या त्वचेवर चांगल्या तऱ्हेने स्क्रब करा. यापेक्षा सोपा उपाय अर्थात सोपं क्लिंन्झर आपल्याला कुठेच मिळणार नाही. टॉमेटोमधील गुणधर्माने केवळ तुमची त्वचा स्वच्छ होत नाही तर आपले पोअर्स ओपन होऊन त्वचेला अधिक मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी आणि अधिक टाईट करण्यासाठीही टॉमेटोची मदत मिळते आणि फायदा होतो.
3. मुलतानी मातीचाही उपयोग होतो नैसर्गिकरित्या
Shutterstock
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही नक्कीच मुलतानी मातीचा उपयोग करायला हवा. त्यासाठी तुम्ही मुलतानी मातीची पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावर ही माती सुकली की थंड पाण्याने चेहरा धुवा. हा त्वचा क्लिंन्झिंग करण्याचा सोपा उपाय आहे. शिवाय हे अतिशय नैसर्गिक क्लिंन्झर आहे, जे त्वचा जास्त वेळ स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्यास उपयोगी ठरतं. त्वचेची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा वापर हा अनादी काळापासून करण्यात आला आहे आणि आजही आयुर्वेदामध्ये याचं महत्त्व सांगण्यात येतं. तुम्हाला हवं तर तुम्ही मुलतानी मातीमध्ये एक चिमूटभर कापूर पावडर मिक्स करा. पाणी मिक्स करा आणि ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावून मसाज करा. यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळतो आणि क्लिन राहतो.
त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण
4. पपईदेखील आहे नैसर्गिक क्लिंन्झर
Shutterstock
तुमची त्वचा कॉम्बिनेशन त्वचा असेल तर तुम्ही पपईचा वापर नैसर्गिक क्लिंन्झर म्हणून करू शकता. यासाठी पपई मॅश करा. त्यात थोडं ओटमील आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करून घ्या. चेहरा आणि मानेवर ही पेस्ट लावा. थोडा वेळ तसंच ठेवून धुवा. याचा अतिशय चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. हे केवळ तुमची त्वचा साफच करत नाही तर चेहऱ्यावरील टॅन, डाग घालवण्यासाठीही याचा उपयोग होतो. पपईमध्ये पॉवरफुल क्लिंन्झिंग अंजाईम असतात ज्याचा त्वचा योग्यरित्या क्लिन करण्यासाठी उपयोग होतो.
5. स्ट्रॉबेरीचा करा वापर
Shutturstock
तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीचा चांगला वापर करून घेता येतो. स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिक एंजाइम असतात जे चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे नैसर्गिक क्लिंंन्झिंग म्हणून याचा चांगला वापर करून घेता येतो. स्ट्रॉबेरी केवळ खाण्यासाठीच चविष्ट असते असं नाही तर चेहऱ्याची सुंदरता जपण्यासाठीही याचा चांगला वापर करून घेता येतो. 3-4 स्ट्रॉबेरी मॅश करून घ्या आणि आपल्या त्वचेवर घासा. हे चेहऱ्यावर 5 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे केवळ चेहरा मऊ करत नाही तर त्वचा अधिक उजळवण्यासाठीही मदत करते. याशिवाय यातून त्वचेला विटामिन सी देखील मिळतं.
चेहऱ्यावर चमक (Glow) आणण्यासाठी ट्राय करा 10 आयुर्वेदिक स्किन केअर नियम
6. लिंबू अथवा संत्र्याची साल करते कमाल
Shutterstock
तुमची त्वचा कोरडी आहे आणि तुम्ही तुमच्या पोअर्समधील धूळ आणि माती काढून टाकण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हे उत्तम मिश्रण आहे. 10 चममचे बदामाचं तेल, त्यात 10 चमचे ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस हे मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. याचा वापर करताना एक छोटा चमचा हे मिश्रण केलेलं तेल घ्या. त्यामध्ये संत्र्यांचं साल टाका. संत्र्याच्या सालीने हे तेल घेऊन आरामात चेहऱ्यावर घासा. डोळ्यांच्या आजूबाजूलाहीदेखील लावा. असं केल्यामुळे चेहऱ्यावरील माती निघून जाईल आणि हळूहळू डेड स्किनदेखील निघून जाईल.
आजच्या काळातंही तुम्हाला सौंदर्य मिळवून देतात या ‘पुरातन’ गोष्टी
7. बेसनदेखील आहे नैसर्गिक क्लिंन्झर
Shutterstock
अनादी काळापासून बेसन आपल्या त्वचेसाठी अप्रतिम उपाय ठरतं. बेसन दह्याबरोबर मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावून मसाज करा. हे तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी चांगलं ठरतं. तुम्ही बेसन दुधाबरोबर मिक्स करून पेस्ट बनवून त्याचा मसाज केला तर कोरड्या त्वचेसाठी हे उत्तम ठरतं. तसंच कोरड्या त्वचेचा दर्जा सुधारण्यासाठी याचा अधिक चांगला उपयोग होतो.
आम्ही तुम्हाला घरगुती क्लिंन्झिंगचे 7 प्रकार सांगितले आहेत. तुमच्या त्वचेसाठी तुम्हाला नक्की कशाचा वापर करायचा आहे ते तुम्ही ठरवा. पण योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंन्झिंग म्हणून वापर करू शकता.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
Read More From Combination Skin
त्वचेवर जादू करते आर्गन ऑईल, जाणून घ्या फायदा
Dipali Naphade
2 चमचे मीठाची कमाल, मिळेल चमकदार त्वचा
Dipali Naphade
फेसवॉशमधील कोणता घटक तुमच्या त्वचेसाठी आहे फायदेशीर
Leenal Gawade