साडी हा प्रत्येक महिलेचा तसा तर आवडता विषय आहे. कार्यक्रमांना वेगवेगळ्या साड्या परिधान करून जाण्यासाठी प्रत्येक महिलेकडे असतात. कॅज्युअलपासून ते अगदी ऑफिसपर्यंत कोणत्याही दिवशी साडी ही आपलीशी वाटते. साडी नेसण्यासाठी काही महत्त्वाचा दिवस असायला हवा असंही नाही. तसं तर साडीमध्ये अनेक प्रिंट्स आणि स्टाईल्स दिसून येतात. पण तुम्हाला तुमचा साडी लुक पूर्ण बदलायचा असेल तर तुम्ही कॉटन साडीचाही उपयोग करू शकता. कॉटनच्या साड्या या नेसायला हलक्या आणि सांभाळायलाही अत्यंत चांगल्या असतात. पार्टी असो वा तुम्ही नियमित साडी नेसत असाल तर तुम्ही कॉटनच्या साडीचा नक्कीच आपल्या आयुष्यात समावेश करून घेऊ शकता. पण यावर नक्की कोणत्या प्रकारची अॅक्सेसरीज वापरावी हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कॉटन साडी नेसून कोणत्या कार्यक्रमाला जाणार आहात, यानुसार ही अॅक्सेसरी घालायला हवी. जाणून घ्या या लेखातून.
घाला चोकर (Use Chokar)
तसं तर कॉटन साडीवर कॅज्युअल घातले जाते. पण तुम्ही कोणत्याही गेट टुगेदरला सकाळच्या अथवा दुपारच्या वेळी जामार असलात आणि कॉटन साडी नेसणार असाल तर तुम्ही जरा हेव्ही अॅक्सेसरीज (Accessories) घालाव्यात. तसंच तुम्ही तुमच्या कॉटन साडीचा कोणता रंग आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्यावर चोकर घातल्यास अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल. चोकरसह तुम्ही मॅचिंग कानातले घाला आणि तुमच्या साडीची अप्रतिम स्टाईल करा.
वापरा स्टेटमेंट इअररिंग्ज (Use Statement Earrings)
तुम्हाला कॉटन साडीवर जर अगदी कमीत कमी दागिने घालायचे असतील आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि उठावदार दिसून यायचं असेल तर तुम्ही स्टेटमेंट इअररिंग्जचा आधार घ्या. तसंच तुमच्या ब्लाऊजचे डिझाईन नक्की काय आहे याचा नीट विचार करा आणि त्यानुसार तुम्ही डँगल्स कानातल्यापासून ते अगदी चांदबालीपर्यंत या साडीवर स्टाईल करू शकता. तुम्ही मोठे कानातले घातले तर इतर कोणत्याही एक्सेसरीजची तुम्हाला गरज भासणार नाही.
स्टडची करा स्टाईल (Stud Style)
कॉटनच्या साड्या या ऑफिस लुकसाठी अप्रतिम मानल्या जातात. वास्तविक ऑफिसमध्ये कॉटन साडी नेसून जायचं असेल तर तुम्हाला काय एक्सेसरीज वापरायच्या याबाबत अधिक सतर्क राहायला हवे. ऑफिसमध्ये कॉटन साडीमधील स्टेटमेंट लुक निर्माण करण्यासाठी तुम्ही स्टडचा वापर करू शकता. तुम्ही लहान आकाराचेच स्टड घालायला हवेत असं अजिबात नाही. मात्र तुमच्या चेहऱ्याला योग्य दिसतील या आकाराचे स्टड तुम्ही परिधान करा. खरं तर ओव्हरसाईज्ड स्टड तुम्हाला अधिक वेगळा लुक मिळवून देतात.
ऑक्सिडाईज्ड दागिने घाला (Wear Oxidized Jewellery)
कॉटनच्या साडीसह ऑक्सिडाईज्ड दागिने हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसते. विशेषतः जर कॉटनची साडी काळी वा पांढरी असेल तर त्यासह ऑक्सिडाईज्ड नेकपिस आणि बांगड्या, तसंच कानातले अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. तुमचा बांधा या साडी आणि ऑक्सिडाईज्ड दागिन्यांमध्ये उठावदार दिसून येतो. तुम्ही हा लुक कोहल आईज मेकअप करून अधिक चांगल्या स्टाईलने पूर्ण करू शकता. यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये अधिक सुंदर दिसाल हे नक्की.
बेल्टने करा स्टाईल (Use Belt Style)
काही महिलांना एक्सेसरीज म्हणजे केवळ कानातले आणि दागिने असंच वाटतं. पण कॉटनच्या साडीवर तुम्ही बेल्टची फॅशन करून कॉटनच्या साडीला एक वेगळा ट्विस्ट देऊ शकता आणि हे सध्या ट्रेंडमध्येही आहे. साडीसह लेदर बेल्ट तुम्ही स्टाईल करा. तुमच्या साडीच्या रंगानुसार तुम्ही बेल्ट निवडा. हे तुम्हाला पार्टीलुकसाठी अधिक सुंदर दिसू शकते.
तुम्ही यापैकी कोणत्या एक्सेसरीज कॉटन साडीवर स्टाईल करणार हे आम्हाला टॅग करून नक्की सांगा. तुमची ही स्टाईल तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक