प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या केसांची मजबूती खूपच चांगली असावी आणि आपले केस हे पातळसर न राहता घनदाट असावेत. आपले केस नेहमी मुलायम, घनदाट, काळे राहावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आणि अगदी पार्लरमध्ये जाऊन केसांची काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अनेक महिला करत असतात. घरगुती उपायांपासून ते अगदी कोणी जे काही सांगेल ते सर्व करण्यासाठी तयार असतो. पण काही उपाय इतके पक्के असतात की, हे केल्यानंतर तुम्हाला घनदाट केस हे नक्की लाभतील. केसांची योग्य वाढ आणि घनदाट केस हवे असतील तर या लेखातून आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटपेक्षा तुम्ही तुमच्या नियमित शँपूमध्ये केवळ दोन गोष्टी समाविष्ट केल्या तर तुम्हाला तुमचे केस उत्तम राखता येतील. कोरफड जेल आणि गुलाबपाणी या दोन गोष्टींचा वापर करून तुम्हीसुद्धा अप्रतिम केस मिळवू शकता. तसंच तुमच्या केसांची हमखास वाढ होऊ शकते. यामुळे केसगळती कमीदेखील होते. याचा नक्की कसा उपयोग करायचा ते या लेखातून आपण जाणून घेऊ. तसेच याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूया.
कोरफडचे केसांसाठी फायदे
Shutterstock
कोरफडमध्ये आढळणारे पोषक तत्व हे केसांमध्ये मुलायमपणा राखण्यास मदत करते. तसंच केसांना लागणारे आवश्यक पोषण प्रदान करण्याचे कामही करते. त्यामुळे केस लवकर वाढतात. तसंच कोरफड जेल हे स्काल्पमधील रक्तप्रवाह वाढवून केसांना मजबूती देण्याचे काम करते. अशाप्रकारे कोरफड केसांचा विकास करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. कोरफड जेल हे कोंडा आणि स्काल्पमधील येणारी खाज दूर करण्यासाठीही उपयोगी ठरते. तसंच अँटीडँड्रफ गुण यामध्ये असल्याने याच्या वापराने कोंड्याची समस्या पटकन सुटते. याच गुणामुळे याचा वापर शँपू अथवा कंडिशनरमध्ये मुख्य घटक म्हणून करण्यात येतो. इतकंच नाही कोरफड जेल तुम्ही शँपूमध्ये मिक्स करून लावल्याने केसांना पोषक तत्व मिळतात. कोरफड जेलमध्ये मुख्य स्वरूपात विटामिन बी1, बी2, बी6 आणि बी12 असतात जे केसांचा विकास अधिक करण्यास मदत करतात.
गुलाबपाण्याचे केसांसाठी होणारे फायदे
Shutterstock
केसांसाठी गुलाबपाणीदेखील कोरफड जेलप्रमाणेच लाभदायक आहे. गुलाबपाण्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. तसंच यामध्ये अँटिफंगल प्रभावही असतो. हे सर्व फंगल संक्रमणाचा प्रभाव कमी करून कोंडा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. गुलाबपाणी एका शोधानुसार, कोंडा नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. गुलाबपाण्याचा वापर केसांवर केल्याने केस लांबसडक, घनदाट आणि चमकदार राखण्यास मदत मिळते. तुम्ही तुमच्या शँपूमध्ये गुलाबपाणी मिक्स करून थोडा वेळ मसाज करा. केसांची गळती यामुळे कमी होण्यास मदत मिळते.
कसे बनवावे आणि वापरावे
- एक चमचा गुलाबपाणी आणि दोन चमचे कोरफड जेल घ्या
- या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या नेहमीच्या शँपूमध्ये मिक्स करून घ्या
- केस पाण्याने भिजवा आणि केसांना हा शँपू लावा आणि व्यवस्थित मसाज करा
- 2-3 मिनिट्स मसाज करा आणि मग केस कोमट पाण्याने धुवा
- ज्या ज्या वेळी तुम्ही केसांना शँपू कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हा प्रयोग करा
- एक महिना तुम्ही याचा वापर केलात तर तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल
हा उपाय नैसर्गिक असून केसांची चमक वाढविण्यासाठी आणि केसगळती कमी करण्यासाठी, तसंच केसांचा विकास होण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्हीदेखील याचा वापर करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक