Care

केसांसाठी बेस्ट आहे लव्हेंडर ऑईल, असा करा वापर

Trupti Paradkar  |  Sep 29, 2020
केसांसाठी बेस्ट आहे लव्हेंडर ऑईल, असा करा वापर

 

इसेंशिअल ऑईलमध्ये लव्हेंडर ऑईल हे एक अप्रतिम तेल आहे ज्याचा तुमच्या सौंदर्य वाढवण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. लव्हेंडर ऑईलचा वापर साधारणपणे अॅरोमा थेरपीसाठी करण्यात येतो. कारण या तेलामध्ये अॅंटि सेप्टिक आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. त्वचेसाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि शांत झोप मिळावी यासाठी लव्हेंडर ऑईल आवर्जून वापरले जाते. पण एवढंच नाही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीदेखील लव्हेंडर तेलाचा फायदा होतो. यासाठीच जाणून घ्या याचे फायदे आणि कसा करावा वापर.

लव्हेंडर ऑईलमुळे केसांच्या वाढीला प्रेरणा मिळते –

 

लव्हेंडर ऑईल वापरण्यामुळे तुमचे केस लांब आणि घनदाट होऊ शकतात. कारण  यामुळे तुमच्या केसांच्या वाढीला प्रेरणा मिळत असते. ज्यांना टक्कल पडले आहे अथवा केस मोठ्या प्रमाणावर गळत आहेत त्यांनी लव्हेंडर तेल वापल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. 

लव्हेंडर ऑईलच्या सुंगधामुळे उवा कमी होतात –

 

अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, लव्हेंडर ऑईल मुळे केसांमधील उवा आणि लिखा मरतात. मात्र केसांमधून उवा नष्ट करण्यासाठी फक्त लव्हेंडर ऑईल लावणंच पुरेसं नाही तुम्हाला इतर वैद्यकीय उपचार करायलाच हवेत. तुम्ही उवांना प्रतिबंध करण्यासाठी लव्हेंडर तेलाचा वापर करू शकता.

लव्हेंडर ऑईलमुळे केस घनदाट आणि जाड होतात –

 

जर तुमचे केस पातळ आणि कमी असतील तर लव्हेंडर तेलाचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण नियमित या तेलाचा वापर केल्यास तुम्हाला तुमच्या केसांची घनता आणि मजबूतपणा वाढल्याचे दिसून येईल. 

लव्हेंडर ऑईलमुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात –

 

लव्हेंडर ऑईलमुळे केस फक्त मजबूतच होतात असं नाही तर यामुळे तुमच्या केसांच्या समस्याही कमी होतील. केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी  तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करू शकता. यामुळे केस गळणं कमी होतं, केसांना  फाटे फुटणे आणि कोंडा या समस्याही नाहीशा होतात.

लव्हेंडर ऑईलमुळे केसांचे आरोग्य सुधारते –

 

केस मजबूत आणि घनदाट असण्यासाठी स्काल्प मजबूत असायला हवा. लव्हेंडर ऑईलमुळे तुमच्या  स्काल्पला आराम मिळतो आणि केसांची त्वचा मऊ होते. यातील अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटकांमुळे इनफेक्शन होत नाही आणि केसांचे आरोग्य सुधारते. 

लव्हेंडर ऑईलमुळे शांत झोपत लागते –

 

केसांच्या वाढीसाठी आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी तुम्हाला शांत  आणि निवांत झोप गरजेची असते. लव्हेंडर ऑईलच्या सुंगधामुळे तुमचं डोकं शांत होतं आणि तुम्हाला निवांत झोप लागते. याचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर होतो. ताणतणाव कमी होऊन तुम्हाला फ्रेश वाटू लागते

केसांसाठी कसा करावा लव्हेंडर ऑईलचा वापर –

 

लव्हेंडर ऑईल तुम्ही केसांवर निरनिराळ्या प्रकारे वापरू शकता. मात्र या तेलाने मसाज केल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा  नक्कीच मिळू शकेल. यासाठी कोणत्याही हेअर ऑईलमध्ये काही थेंब लव्हेंडर ऑईल मिसळा आणि त्याने केसांना मसाज करा. तुम्ही यासाठी शुद्ध नारळाचे तेलही वापरू शकता. किंवा नारळाचे तेल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि त्यात लव्हेंडर तेल मिसळा. तेलाने मसाज केल्यावर एक ते दोन तासाने तुमचे केस धुवून टाका. रात्री हे तेल लावल्यास तुम्हाला शांत झोप लागेल. तुम्ही ग्रेप्ससीड ऑईल, जोजोबा ऑईल, एरंडेल तेल, लव्हेंडर तेल एकत्र करून याचा वापर केस धुतल्यानंतर सीरमप्रमाणेही करू शकता. 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’ (Benefits Of Coconut Oil In Marathi)

बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे (Olive Oil Benefits In Marathi)

कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल (Benefits Of Almond Oil In Marathi)

Read More From Care