Recipes

विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपी मराठीतून (Amti Recipe In Marathi)

Leenal Gawade  |  May 20, 2021
Amti Recipe In Marathi

महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागतो. प्रत्येक स्त्रीला आमटीचे वेगवेगळे प्रकार हे करता यायलाच हवेत. आमटी जितक्या चविष्ट असतील तितकेच जेवण हे अधिक जाते. आता आमटी हा शब्द उच्चारल्यानंतर खूप जणांकडे डाळीपासून तयार झालेल्या रोजच्या डाळींनाही आमटी म्हटले जाते. तर अनेक ठिकाणी जी कांदा- खोबरं किंवा इतर वाटपाच्या मदतीने केली जाते त्याला आमटी म्हटले जाते. कोकणपट्टा असू दे किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यासाठीच आम्ही आमटीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या सोप्या रेसिपीज शोधून काढल्या आहेत. चला तर जाणून घेऊया या आमटीच्या रेसिपी मराठीतून.

कटाची आमटी रेसिपी (Katachi Amti Recipe In Marathi)

Instagram

घरी पुरणपोळीचा बेत असेल आणि घरी कटाची आमटी बनणार नाही असे मुळीच होणार नाही. तुपाची धार पुरणपोळीवर सोडून खाण्याचा आनंद जरी असला तरी त्यासोबत चमचमीत, गरमगरम कटाची आमटी असेल तर गोडसोबत तिखट एकदम मस्त खाल्ले जाते. चला तर जाणून घेऊया कटाच्या आमटीची सोपी आणि मस्त रेसिपी

साहित्य:

शिजवलेली चणा डाळ (पुरणपोळीचे पाणी गाळताना उरलेली),  कांदा- खोबऱ्याचे वाटप, आलं-लसूण पेस्ट, कडिपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, तेल

कृती:

डोसा बनवण्याचे निरनिराळे प्रकार (Dosa Recipes In Marathi)

भगर आमटी (Bhagar Amti Recipe In Marathi)

Instagram

उपवासाच्या वेळी केली जाणारी आमची म्हणजे ‘भगर आमटी’ ही आमटी शेंगदाण्यापासून केली जाते. त्यासोबत मस्त वरीचा भात खाल्ला जातो. उपवासाच्या दिवशी पोट भरीसाठी ही आमटी आणि वरीचा भात पुरेसा असतो. जाणून घेऊया याची सोपी रेसिपी

साहित्य:

1 मोठा बटाटा, 1 वाटी खवलेला नारळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, तूप किंवा तेल, जीरं, 1 ते 2 लवंग

कृती:

वाचा – Jaggery Anarsa Recipe In Marathi

बटाट्याची आमटी (Batatyachi Amti Recipe In Marathi)

Instagram

घरात अगदी काहीही नसेल आणि पटकन काहीतरी करायचे असेल अशावेळी बटाट्याच आमटीसारखा दुसरा कोणताही सोपा पर्याय नाही. बटाट्याची आमटी एकदम झटपट होते ही आमटी करायला फारसा वेळही जात नाही.

साहित्य:

2 ते 3 बटाटे, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, लाल तिखट, गरम मसाला, हळद, दाण्याचे कूट,धणे-जीरे पूड, कडिपत्ता, तेल फोडणीसाठी, कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:

कैरीची आमटी (Kairichi Amti Recipe In Marathi)

Instagram

कैरीचा सीझन आला की, अगदी हमखास केली जाणारी रेसिपी म्हणजे कैरीची आमटी. आंबट-गोड-तिखट आणि चवीला चटपटीत लागणारी अशी ही आमटी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी.

साहित्य:

दोन कैरीचा किस, बेसन, गूळ, लाल मिरच्यांचे तुकडे (सुके), मोहरी, जीरं, मेथी दाणा,सैंधव, तेल,कडिपत्ता,हिंग,लाल तिखट

कृती:

शेंगदाणा आमटी (Shengdana Amti Recipe In Marathi)

Instagram

उपवासाला केली जाणारी आणखी एक चविष्ट आमटी म्हणजे शेंगदाणा आमटी. ही आमटी चवीला फारच मस्त लागते. उपवासाच्या दिवशी डाऊन झालेली एनर्जी वाढवण्यास ही आमटी नक्कीच मदत करते.चमचमीत ही आमटी कशी बनवावी हे जाणून घेऊया.

साहित्य: 

1 मोठी वाटी भाजलेले शेंगदाणे, 3-4 मिरच्या, उकडलेले शेंगदाणे, तूप, लिंबाचा रस, मीठ, जीरं

कृती:

टोमॅटो आमटी (Tomato Amti Recipe In Marathi)

Instagram

टोमॅटोचा उपयोग करुनही मस्त टोमॅटोची आमटी करता येऊ शकते. टोमॅटोची आमटी ही देखील झटपट होते. ही आमटी आंबट- गोड-तिखट लागते. ही आमटी एकदम झटपट तयार होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही आमटी करायला काहीच हरकत नाही.

साहित्य:
5 ते 6 टोमॅटो, 1 वाटी ओलं खोबरं, लाल तिखट, हळद, लाल तिखट, मीठ, तेल,कोथिंबीर

कृती:

कोळंबी आवडते? मग बनवा झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)

बाजार आमटी (Bajar Amti Recipe In Marathi)

Instagram

बाजार आमटी हा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे का? पंढरपूरमध्ये ही रेसिपी केली जाते. पंढरपूरमध्ये  बाजार आमटी ही फारच प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया बाजार आमटीची ही सोपी रेसिपी

साहित्य:

मसुर डाळ -2 चमचे  मुगडाळ, 2 चमचे, हरबरा डाळ, 2 चमचे, तुरडाळ, 2 चमचे, उडिद डाळ -2 चमचे, 2 टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल,  कांदे 2, धणे-जीरे पूड,मोहरी- जीरे, कडिपत्ता

कृती: 

मसूरची आमटी (Masoor Amti Recipe In Marathi )

Instagram

रोज रोज तीच डाळ खाऊन खूपच कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी मसूरची आमटी हा एक चांगला पर्याय असू शखतो. व्हेज जेवण असो किंवा नॉन- व्हेज तुम्ही कधीही मसूरची आमटी करु शकता. मसूरची आमटी करणे हे फारच सोपे आहे. तुम्ही दोन वेगळ्या पद्धतीने ही मसूरची आमटी करु शकता.

साहित्य:

मोड आलेले किंवा शिजवलेले अख्खे मसूर, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो किंवा खोबऱ्याचे वाटप, लाल तिखट,आलं-लसूण पेस्ट, मिसळ मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता

कृती: 

मिश्र डाळीची आमटी (Mix Dal Amti Recipe In Marathi)

Instagram

मिश्र डाळींपासूनही तुम्ही मस्त चविष्ट अशी आमटी बनवू शकता. जाणून घेऊया मिश्र डाळीची ही चविष्ट आणि चमचमीत आमटी

साहित्य:

तुमच्या आवडीची डाळ प्रत्येकी 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कडिपत्ता, कोथिंबीर, तेल, लसूण, कडिपत्ता, हळद, लाल तिखट,मोहरी, जीरं, हिंग

कृती:

आमटी डाळ (Dal Amti Recipe In Marathi)

Instagram

आमटी म्हणजे एकदम साध्याच्याच डाळीचा प्रकार आहे. ही डाळ एक प्रकारची फोडणीचीच डाळ असते. तुम्हालाही ही आमटी बनवायची असेल तर जाणून घ्या याची कृती

साहित्य:

शिजवलेली तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, गूळ, मोहरी, जीरं, हिंग, तेल, मीठ,हळद, लाल तिखट

कृती:

ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)

चिंच गुळाची आमटी (Chinch Gulachi Amti Recipe In Marathi)

Instagram

महाराष्ट्रीयन पद्धतीत येणाऱ्या डाळीचा एक प्रकार म्हणजे चिंच- गुळाची आमटी. ही आमटी खूप जणांच्या आवडीची असते. मस्त भात आणि ही आमटी खूप जणांच्या आवडीची देखील असेल. जाणून घेऊया या आमटीची सोपी कृती

साहित्य: 

तुरडाळीचे वरण (उकडून घोटलेली तूरडाळ), चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, मीठ, तिखट, हळद, हिंग, मोहरी, तेल, कोथिंबीर, कडिपत्ता, मीठ

कृती: 

आता या काही आमटी घरीच तयार करा आणि जेवणाचा आनंद घ्या. 

Read More From Recipes