DIY सौंदर्य

आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अश्वगंधाचे फायदे (Ashwagandha Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Feb 9, 2020
Ashwagandha Benefits In Marathi

अश्वगंधा अशी आयुर्वेदिक औषधी आहे जिची ओळख करून घ्यायची खरं तर गरज नाही. अश्वगंधाचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे जगभरात याचा वापर करण्यात येतो. वैज्ञानिकदेखील अश्वगंधा चे फायदे अधिक स्वरूपात मानतात. यामुळे शारीरिक समस्या, आजार आणि रोगांपासून वाचण्यासाठी याची मदत घेतली जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटि इन्फ्लेमेटरी, अँटिस्ट्रेस आणि अँटिबॅक्टेरियल गुण अधिक प्रमाणात असतात जे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जास्त चांगली करण्यासाठी आणि झोप अधिक चांगली येण्यासाठी मदत  करतात. त्यामुळे अनेक गुणांनी उपयुक्त असलेले अश्वगंधाचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अश्वगंधा हे असं औषध आहे ज्याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर अर्थात वैद्य अधिक चांगले सांगू शकतात. याचा किती प्रमाणात उपयोग करायला हवा हेदेखील महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मात्र याचा उपयोग सहसा करू नये. अश्वगंधाची भरपूर माहिती आपल्याला मिळते. अश्वगंधा मराठी माहिती सहसा शोधली जाते. त्यामुळे आपण याचे नक्की काय काय फायदे आहेत ते या लेखातून पाहूया. पण तत्पूर्वी अश्वगंधा म्हणजे नेमके काय ते आपण जाणून घेऊया. 

अश्वगंधा म्हणजे काय? (Ashwagandha Meaning In Marathi)

अश्वगंधाचे वैज्ञानिक नाव आहे विथानिया सोम्निफेरा (Withania somnifera). बोलीभाषेमध्ये याला अश्वगंधा तसंच इंडियन जिनसेंग आणि इंंडियन विंटर चेरी असंही म्हटलं जातं. अश्वगंधा चे झाड हे साधारण 35-75 सेमी इतकं लांब वाढतं. मुख्यत्वे याची शेती भारतातील सुके क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी अर्थात मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि गुजरात इथे करण्यात येते. याशिवाय चीन आणि नेपाळमध्येही याची शेती जास्त प्रमाणात करण्यात येते. जगभरामध्ये अश्वगंधाची 23 आणि भारतामध्ये साधारण 2 प्रजाती आढळते. अश्वगंधाचा उपयोग हा आपल्या आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी चांगल्या प्रमाणात करण्यात येतो. अश्वगंधा ही वनस्पती असल्याने त्याचा योग्य प्रमाणात उपयोग करावा लागतो. आपण आता त्याचे नक्की काय फायदे होतात ते पाहूया. 

अश्वगंधाचे आरोग्यासाठी फायदे (Health Benefits Of Ashwagandha In Marathi)

अश्वगंधाचे संपूर्ण शरीरासाठी फायदे होतात. याच्या सेवनाने मेंदूची कार्यप्रणाली चांगली होते. स्मरणशक्तीचे उपाय ही आहेत ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन (एनसीबीआय) ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, पुरूषांमध्ये सेक्सची क्षमता आणि प्रजनन क्षमता अधिक चांगली करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी जास्त होतो. तसंच या रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार, याबाबत अधिक तपास अर्थात रिसर्च चालू आहे. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण हे शरीरातील फ्री रेडिकल्स बनवण्यापासून रोख लावतात. यामुळे एजिंग आणि अन्य आजार कमी होण्यास मदत मिळते. नक्की कोणत्या आजारापासून अश्वगंधामुळे सुटका मिळते त्याची आपण माहिती घेऊया.

1. कोलेस्ट्रॉल (Cholesterol)

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते. वर्ल्ड जर्नल ऑफ मेडिकल सायन्सच्या शोधातूनदेखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे. अश्वगंधामध्ये जास्त प्रमाणात हायपोलिपिडेमिक आढळतं, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. 

वाचा – Triphala Churna Benefits In Marathi

2. निद्रानाश कमी करण्यासाठी (To Reduce Insomnia)

कोणत्याही व्यक्तीला निद्रानाशाची समस्या असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचे सेवन करावे. जपानमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल नावाचे यौगिक असते जे झोप चांगली लागण्यासाठी मदत करते. या रिसर्चच्या आधारानुसार निद्रानाश असलेल्या व्यक्तींनी अश्वगंधाचे सेवन केल्यास, त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. पण त्याचे किती प्रमाण घ्यायचे आहे ते मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून विचारून घेणं योग्य ठरेल. अश्वगंधा चे फायदे असेही होतात. 

3. तणाव घालवण्यासाठी (To Relieve Stress)

आजकाल तणाव येण्याची समस्या तर सर्रास दिसून येते. तणावामुळे लवकर म्हातारपणच येत नाही तर त्यामुळे अनेक आजारालाही सामोरं जावं लागत आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तणाव आणि चिंताग्रस्त जीवनाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक औषध अश्वगंधा हा रामबाण इलाज आहे. वास्तविक यामध्ये अँटिस्ट्रेस गुण आढळतात. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड (Sitoindosides) आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स (Acylsterylguucosides) हे दोन्ही कंपाऊंड शरीरामध्ये अँटिस्ट्रेस गुणाचे काम करतात. यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.

4. यौनक्षमता वाढवते (Increases Sexual Potency)

बऱ्याच पुरूषांमध्ये यौन अर्थात सेक्स करण्याची इच्छा कमी असते आणि त्यांच्या वीर्यातही कमतरता असते. या कारणामुळे त्यांना मुलांची प्राप्ती होण्यासाठी त्रास होतो. अशा पुरूषांसाठी अश्वगंधा एक शक्तिवर्धक औषध म्हणून काम करतं. पुरूषांमधील यौनक्षमता वाढवण्यासाठी आणि वीर्य अधिक चांगले बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. 2010 मध्ये एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की, अश्वगंधाचा प्रयोग केल्याने वीर्याच्या गुणवत्तेसह त्याच्या संख्येमध्येही वृद्धी होते.

5. कॅन्सर (Cancer)

अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारापासूनही बचावासाठी उपयोगी ठरते. एनसीबीआयकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक शोधामध्ये सांगण्यात आले आहे की, अश्वगंधामध्ये अँटी ट्यूमर गुण असतात, जे ट्यूमर होऊ न देण्यासाठी कार्यरत आहेत. तसंच अश्वगंधा हे कॅन्सरच्या इलाजादरम्यान करण्यात येणाऱ्या किमोथेरपीच्या नकारात्मक प्रभावाचा परिणाम काढून टाकण्यासाठी मदत करतात. लक्षात  ठेवा की, अश्वगंधा हे कॅन्सर बरं करत नाही तर कॅन्सरचा धोका होऊ नये यासाठी वापरण्यात येते. कोणालाही कॅन्सर असेल तर त्याने वेळीच डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्वगंधाचं सेवन करायला हवं. 

6. मधुमेह (Diabetes)

अश्वगंधाद्वारे मधुमेहापासून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता. यामध्ये असणारे हायपोग्लायमिक गुण ग्लुकोजचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. वास्तविक मधुमेह हा असा आजार आहे जो एकदा झाला की बरा होत नाही पण तुम्ही अश्वगंधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्यास, तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळतो. 

7. थायरॉईड (Thyroid)

गळ्यात असलेल्या फुलपाखराच्या आकाराच्या थायरॉईज ग्रंथी आपल्या हार्मोन्सचा निर्माण करतात. हे हार्मोन्स जेव्हा असंतुलित होतात तेव्हा शरीराचं वजन कमी अथवा जास्त वाढू लागते. तसंच अन्य त्रासाचाही सामना करावा लागतो. या अवस्थेला थायरॉईड असं म्हणतात. थायरॉईडग्रस्त असणाऱ्या रोगींंसाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. नियमित स्वरूपात अश्वगंधा खाल्ल्यास, थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते. तसंच हे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या म्हणजे त्याचं किती प्रमाण पोटात जायला हवं ते तुम्ही त्यांना विचारून घ्या. तसंच थायरॉईडची लक्षणे आणि उपाय ही जाणून घ्या.

8. प्रतिकारशक्ती वाढते (Increases Immunity)

शरीरामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची असते ते प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती कमी असेल तर पटकन आजार जडतात. पण प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार दूर राहतात. प्रतिकारशक्ती अधिक चांगली करण्यासाठी अश्वगंधाचा फायदा होतो. याचं सेवन नियमित केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. अभ्यासातूनदेखील हे सिद्ध झाले आहे. यामध्ये असणारे इम्यूनमॉड्युलेटरी गुण शरीराला आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती बदलण्यास मदत करतात. तसेच आजाराशी लढण्याची शक्तीही देतात. त्यामुळे अश्वगंधा हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. 

9. डोळ्यांचे आजार (Eye Diseases)

आजकालच्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना डोळ्यांचे अनेक विकार झालेले दिसतात. मोतीबिंदूसारखे आजार तर अधिक वाढले आहेत. मोतीबिंदूमुळे अगदी आंधळेपणाही येतो. त्यामुळे हे कमी करायचं असेल तर अश्वगंंधाचा उपयोग करून घेता येतो. अश्वगंधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुण हे मोतीबिंदूपासून लढण्यासाठी मदत करतात. हे अतिशय प्रभावशाली औषध ठरतं. तसंच मोतीबिंदू वाढण्यापासूनही अश्वगंधा थांबवते. त्यामुळे मोतीबिंदू सारखा आजार होऊ नये अथवा झाला असेल तर त्यावर प्रभावशाली औषध म्हणून तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकता. 

10. वजनवाढ (Weight Gain)

आजकाल वजनामध्ये वाढ हा सर्वात मोठा आजारच झाला आहे. आपण कोणत्याही वेळी काहीही खातो आणि मग वजनावर नियंत्रण राहात नाही. प्रत्येकालाच आकर्षक दिसायला आवडतं. त्यासाठी वजन नियंंत्रणात राहणं अत्यंत आवश्यक आहे. अश्वगंधाचं सेवन केल्यास, भूकेवर व्यवस्थित नियंत्रण राहतं आणि जास्त प्रमाणात भूक लागत नाही. बऱ्याचदा तणाव आणि चिंतेमुळेही जास्त भूक लागते. पण तणाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि भूक न लागून पोट व्यवस्थित भरलेले जाणवून वजनावर नियंत्रण ठेवण्यास त्याची मदत होते. पण याशिवाय तुम्हाला नियमित व्यायाम करणंही आवश्यक आहे. 

अश्वगंधाचे त्वचेला होणारे फायदे (Ashwagandha Benefits For Skin In Marathi)

आम्ही तुम्हाला सुरूवातीलाच अश्वगंधाचे त्वचेसाठीही फायदे होतात हे सांगितले आहेत. पण नेमके काय फायदे होतात आणि त्यासाठी अश्वगंधाचा कसा वापर करावा हे आता आम्ही तुम्हाला सांगतो. 

Shutterstock

1. अँटिएजिंग (Anti Aging)

अश्वगंधामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट हे त्वचेसाठी लाभदायक ठरते. अँटिऑक्सिडंट गुण शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढा देऊन वाढत्या वयाची लक्षणं अर्थात सुरकुत्या आणि त्वचा सैल पडत असेल तर त्यापासून वाचवण्याचे काम करते. अश्वगंधामध्ये असलेल्या गुणांमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या कॅन्सरपासूनही बचाव होतो. त्यासाठी त्याची मदत होते. यासाठी आपण अश्वगंधाचा फेसपॅक तयार करून त्याचा वापर करू शकतो. हा फेसपॅक तयार कसा करायचे ते जाणून घ्या. 

साहित्य:

कसे वापरावे: 

2. जखम भरण्यासाठ (To Heal Wounds)

अश्वगंधा हे खरं तर डायरेक्ट स्वरूपात जखम भरण्यासाठी मदत करत नाही पण जखमेमध्ये बॅक्टेरिया होऊ नये यासाठी याची मदत होते. वास्तविक यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण जखमेमध्ये होणारे जीवाणू नष्ट करण्यासाठी आणि इन्फेक्शचा धोका टाळण्यासाठी उपयोगी ठरतात. यामुळे जमख बरी होत नाही पण घाव भरण्यासाठी लागणारा वेळ मात्र कमी होतो. जखमेसाठी याच्या पेस्टचा वापर करता येऊ शकतो. पण त्याआधी डॉक्टरांंचा सल्ला मात्र घेणे आवश्यक आहे. तुम्ही त्यासाठी केवळ अश्वगंधावर अवलंबून नक्कीच राहू शकत नाही. 

साहित्य

कसे वापरावे 

3. त्वचेवर येणारी सूज (Swelling Of Skin)

अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे त्वचेला सूज आली असेल तर याचा उपयोग करता येतो. वास्तविक त्वचेमध्ये इन्फेक्शनसाठी स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाचे बॅक्टेरिया जबाबदार असातत आणि इन्फेक्शन झाल्यामुळे त्वचेवर सूज येते. अशावेळी अश्वगंधामधील आढळणारे विथाफेरीनमधील अँटिबॅक्टेरियल गुण काम करतात. जे इन्फेक्शनसाठी जबाबदार असणाऱ्या या बॅक्टेरियाला नष्ट करून त्वचेवर आली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

साहित्य

कसे वापरावे 

4. कोर्टिसोलच्या स्तरात कमतरता (Deficiency In Cortisol Level)

कोर्टिसोल हा हार्मोनचा एक प्रकार आहे. ज्याला स्ट्रेस हार्मोन असं म्हटलं जातं. हे शारीरिक परिवर्तन होण्यासाठी जबाबदार ठरतात. भूक लागली आहे हे या कोर्टिसोलमुळे कळतं. हे हार्मोन जेव्हा रक्तामध्ये वाढतं तेव्हा शरीरामध्ये फॅट आणि तणावाचा स्तरदेखील वाढू लागतो. यामुळे शरीरातील विभिन्न आजार नुकसान कमी होतात. यासाठी कोर्टिसोलचा स्तर कमी करणं आवश्यक आहे. एनसीबीआयद्वारे प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार अश्वगंधाचा प्रयोग करून कोर्टिसोल कमी करण्यात येतो. 

साहित्य – अश्वगंधा 

कसे वापरावे 

रोज अश्वगंधाचे 3 ते 6 ग्रॅम इतकेच सेवन करावे. तेदेखील डॉक्टरांना वापरून करावे. लक्षात ठेवा याचा वापर हा प्रमाणातच करावा. 

केसांसाठी अश्वगंधाचे फायदे (Ashwagandha Benefits For Hair In Marathi)

आरोग्य आणि त्वचेप्रमाणेच केसांसाठीही अश्वगंधाचा फायदा होत असतो. खरं तर आजकालच्या आयुष्यात धूळ आणि मातीमुळे केसांची खूपच वाईट अवस्था होत असते. पण त्यासाठी आपण अश्वगंधाचा कसा उपयोग करून घेऊ शकतो पाहूया – 

1. लांब केस (Long Hair)

काळे, घनदाट आणि लांब केस कोणाला नको असतात. हे तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा स्कॅप्ल निरोगी असेल. त्यासाठी वेगवेगळी औषधं, शँपू आणि कंडिशनरप्रमाणेच आयुर्वेदवरदेखील आपण विश्वासा ठेवायला हवा. एनसीबीआयद्वारे प्रकाशित एका शोधानुसार, अनुवंशिक कारण आणि थायरॉईडच्या कारणामुळे केसगळती थांबवण्यासाठी मदत होऊ शकते. अश्वगंधा केसांमधील मेलेनेन वाढवण्यासाठीही मदत करतात, ज्यामुळे केसांचा मूळ रंग टिकवण्यासाठी मदत होते. अश्वगंधाची पेस्ट तुम्ही आंघोळ करण्याआधी साधारण अर्धा तास केसांना लावा त्यानंतर शँपू आणि कंडिशनरने केस धुवा. याचा तुमच्या केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. 

2. कोंडा घालवण्यासाठी (To Get Rid Of Dandruff)

केसांची सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कोंडा. सतत धूळ आणि प्रदूषण असल्याने केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडा होत असतो. तसंच सतत तणाव असल्याने आणि झोप नीट होत नसली तरीही केसांमध्ये कोंडा होतो. वास्तविक असं सेबोरेहिक डर्मेटायटिस त्वचा विकारदरम्यान होते. यामुळे स्कॅल्पमध्ये खाज, लाल रॅशेस आणि कोंडा अशी समस्या निर्माण होते. अशावेळी तुम्ही अश्वगंधाचा वापर करू शकता. यातील अँटीस्ट्रेस गुणांमुळे केसांना फायदा मिळतो. तसंच तणाव कमी करून कोंडा कमी करण्याासाठीही याची मदत होते. तसंच यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असल्याने याचाही फायदा होतो.

3. पांढऱ्या केसांसाठी (For White Hair)

आपले केस पांढरे झालेले कोणालाही आवडत नाहीत. वयाच्या आधी तर पांढरे केस होणं हे नक्कीच चांगलं नाही. त्यामुळे यासाठी अश्वगंधाचा वापर करता येऊ शकतो. हे औषध आयुर्वेदिक असल्याने मेलेनिनचं उत्पादन वाढवते जे तुमच्या केसांचा मूळ रंग ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. मेलेनिन हा एक प्रकारचे पिगमेंट असतं. जे केसांचा मूळ रंग तसाच ठेवतं. त्यामुळे याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसांचा काळेपणा जपून ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता. 

अश्वगंधाचा वापर कसा करावा (How To Use Ashwagandha In Marathi)

बाजारामध्ये अनेक स्वरूपात अश्वगंधा प्राप्त होते. पण सर्वात जास्त पावडर आणि चूर्ण हेच स्वरूप दिसतं. अश्वगंधाचे चूर्ण खाण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. मध, पाणी अथवा तूप यापैकी कोणतीही गोष्ट त्यात मिक्स करून तुम्ही अश्वगंंधा चूर्ण खाऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला बाजारामध्ये अश्वगंधा चहा, अश्वगंधा कॅप्सूल आणि अश्वगंधाचा रसही आरामात मिळतो. त्याशिवाय तुम्ही अश्वगंधा चूर्ण तयारदेखील करू शकता. पण याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही नक्की याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसारच अश्वगंधाचा उपयोग करा. याचा वापर प्रमाणातच करावा. साधारण दिवसाला 3 ते 6 ग्रॅम इतकीच याची मात्रा तुम्ही घेऊ शकता. 

अश्वगंधाबाबात प्रश्नोत्तरं (FAQs)

1. अश्वगंधा बाजारात सहज मिळतं का?

हो. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे त्यामुळे बाजारात ही पावडर अथवा चूर्ण स्वरूपात सहज प्राप्त होते. मात्र याची मात्रा किती प्रमाणात घ्यायची याची सल्लामसलत डॉक्टरांसह करणं आवश्यक आहे.

2. अश्वगंधामुळे काही नुकसान होऊ शकतं का?

याची मात्रा चुकीची घेतल्यास, नुकसान होऊ शकतं. यामुळे जंत अथवा उलट्या होण्याची शक्यता असते. गर्भावस्थेत असताना याचं सेवन करू नये. कारण अश्वगंधा हे गर्भनिरोधक म्हणून काम करतं. त्याचा बाळावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

3. यातून कोणती पौष्टिक तत्व मिळतात?

अश्वगंधामधून प्रोटीन, फॅट, कॅल्शियम, विटामिन सी, कार्बोहायड्रेट, आयरन ही सगळी पौष्टिक तत्व यातून मिळतात. साधारण 100 ग्रॅम इतकं पौष्टिक तत्व यातून मिळतं.

पुढे वाचा – 

Ashwagandha Benefits in Hindi

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From DIY सौंदर्य