खाणंपिण आणि नाइटलाईफ

बेसनचे लाडू करताना करू नका या चुका, होतील स्वादिष्ट

Dipali Naphade  |  Oct 27, 2021
besan ladoo recipe in marathi

दिवाळी आणि दिवाळीचा फराळ हा सर्वात महत्त्वाचा विषय. चकल्यांची रेसिपी, रवा लाडू, खुसखुशीत शंकरपाळे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण घरीच तयार करतो. दिवाळीची वेळ अशी असते की, घरी अनेक पाहुणे येत असतात. पण दिवाळीमध्ये बेसनचे लाडू तर नक्कीच आपण घरी करतो. बेसनचे लाडू करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. बेसनचे लाडू तयार करणे अत्यंत सोपे आहे. पण तुम्ही या लहानसहान सोप्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बेसनचे लाडू करताना या चुका करू नका, तुम्ही या चुका टाळल्यात तर बेसनचे लाडू चांगले होतील. दिवाळीच्या शुभेच्छा!

बेसन भाजताना या चुका करू नका

बेसनचे लाडू बनवताना तुम्हाला सर्वात पहिले बेसन व्यवस्थित भाजून घ्यावे लागते. यामध्ये थोडासा वेळ लागतो त्यामुळे बेसन बरेचदा मध्यम आचेवर बेसन भाजतात. पण ही पद्धत चुकीची आहे. जलद अथवा मध्यम आचेवर तुम्ही जर बेसन भाजत असाल तर बेसन कच्चे राहाते. तर तुम्ही जलद गॅसवर बेसन भाजले तर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे लाडूचा स्वाद बिघडू शकतो. बेसन जर कच्चे राहिले तर लाडू घशात चिकटतो. त्यामुळे वेळ लागला तरीही चालेल पण बेसन तुम्ही भाजताना नेहमी मंद आचेवर भाजा. 

बेसनमध्ये तूप घालताना तुम्ही करू नका ही चूक

जर तुम्हाला देशी तुपामध्ये बनवत असाल तर तुम्हाला लागणारे तूप संपूर्ण तुम्ही कढईत ओतू नका. पहिले थोडेसे तूप कढईत तुम्ही ओता आणि त्यात बेसन भाजून घ्या. त्यानंतर बेसन किती कोरडे राहतेय ते पाहून तुम्ही त्यामध्ये अधिक तूप घाला. बेसनाचा सुगंध यायला लागल्यावर आणि बेसनाचा रंग थोडासा ब्राऊन झाल्यावर बेसन व्यवस्थित तुपामध्ये भाजले गेले आहे असे समजा. बऱ्याच महिला लाडू वळण्यासाठी वरून तूप त्यामध्ये घालतात. पण असे अजिबात करू नका. तुम्हाला जर दाणेदार बेसनाचे लाडू खायचे असतील तर बेसन अधिक भाजा जेणेकरून त्यातील पाणी पूर्ण सुकेल. असं केल्यामुळे बेसनाचे लाडू अधिक दाणेदार होतात. 

बेसनमध्ये साखर घालताना लक्षात ठेवा या गोष्टी

सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या की, तुम्ही बेसनाच्या लाडूमध्ये तुम्ही घरातच पाक बनवा. तुम्ही एका पॅनमध्ये पाणी आणि साखर एकत्र घेऊन त्याचा पाक तयार करायला हवा. जोपर्यंत पाक पांढरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिश्रण गॅसवर तयार करायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, पाकामध्ये गुठळ्या तुम्हाला नको असतील तर तुम्ही यामध्ये थोडेस तूप मिक्स करा आणि मग पाक थंड होऊ द्या. चुकूनही तुम्ही गरम पाक भाजलेल्या बेसनामध्ये अथवा गरम बेसनामध्ये तुम्ही पिठी साखर अथवा पाक मिक्स करू नका. असं केल्यामुळे बेसनाला अधिक पाणी सुटते आणि बेसन अधिक ओले होते, ज्यामुळे लाडू वळताना त्रास होतो. 

बेसन लाडू स्टोअर करताना करू नका अशा चुका

जेव्हा बेसनाचे लाडू वळून तयार होतात तेव्हा ते लाडू तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात अथवा फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही बेसनाचे लाडू हे फ्रिजच्या बाहेर स्टीलच्या डब्यातच ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवल्यास हे लाडू कडक होतात आणि मग त्याचा अजिबात स्वाद येत नाही. 

बेसन लाडू बनविण्याची रेसिपी (Besan Ladoo Recipe)

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

बेसनचा लाडू बनविण्याची आजीच्या बटव्याची पद्धत

बेसनचा लाडू अधिक हेल्दी अर्थात पौष्टिक बनविण्यासाठी त्यात काजू, बदाम, पिस्ता, खारीक हे तुपामध्ये तळून घ्या आणि त्याची पावडर करून बेसन भाजताना त्यामध्ये मिक्स करा. यामुळे बेसन लाडू अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होतात. तुम्हीदेखील या दिवाळीसाठी घरात बेसनचा लाडू तयार करणार असाल तर नक्की वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा चुका करू नका. बाजारापेक्षाही अधिक चविष्ट लाडू होतील घरी तयार!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ