प्रत्येकीला आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं असं वाटत असतं. मात्र वाढत्या वयानुसार चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, काळे डाग अशा समस्यांमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा येते. मग सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक उपचार आणि महागड्या ब्युटि ट्रिटमेंट तुम्ही करता.खरंतर या समस्या काही घरगुती उपचारांनी बऱ्या होऊ शकतात. घरात देवपूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चंदनाचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकवेळा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का लाल चंदनही सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे. लाल चंदन हा चंदनाचाच आणखी एक प्रकार आहे. काहीजण लाल चंदनाला रक्त चंदन असंही म्हणतात. लाल चंदनाचा वापर सौंदर्यासाठी नेमका कसा करावा हे जाणून घेण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा
कोरड्या त्वचेसाठी –
हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. कारण वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. तुमची त्वचा नाजूक असल्यामुळे ती लवकर कोरडी आणि हिहायड्रेट होते. त्यात जर तुमची त्वचा मुळातच कोरड्या प्रकारची असेल तर त्वचेच्या समस्या अधिकच वाढतात. मात्र लाल चंदनाच्या तेलाने तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लाल चंदनाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. रात्र भर हे तेल तुमच्या त्वचेत मुरू द्या ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि मुलायम झाल्याचा अनुभव मिळेल. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही लाल चंदनाच्या तेलाचा वापर नक्कीच करू शकता.
त्वचेवर ग्लो येण्यासाठी –
धुळ, माती, हवेतील प्रदूषण यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि खराब होते. मात्र अशावेळी त्वचेवरील नैसर्गिक ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी त्वचेवर नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. यासाठी लाल चंदन पावडर आणि नारळाचे तेल, बदामाचे तेल एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा. वीस ते तीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून काढा. ज्यामुळे त्वचेला थंडावा आणि चमक मिळेल. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्याचा हा एक सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे.
त्वचा उजळ करण्यासाठी –
सुर्यप्रकाशात फिरल्यामुळे त्वचेवर सनटॅन आणि सनबर्नचे डाग येतात. सनबर्न अथवा सनटॅन सहज जात नाही. मात्र त्यावर लाल चंदन लावल्यास हे डाग कमी होत नाहीसे होऊ शकतात, यासाठी लाल चंदन पावडर, मुलतानी माती आणि लिंबू एकत्र करून त्वचेवर लावा. चेहऱ्यावरील काळे डाग यामुळे हलके होतील.
चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यासाठी –
धुळ, माती, प्रदूषण, डेड स्किन यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. सहाजिकच यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मात्र यावर उपाय करण्यासाठी पिकलेला पपई आणि लाल चंदन पावडर एकत्र करून त्वचेवर लावा. सुकल्यावर वीस ते तीस मिनिटांनी त्वचा कोमट धुवून टाका, यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ, माती आणि डेड स्किन निघून जाईल. त्वचेची छिद्रे मोकळी होतील आणि रक्तप्रवाह सुधारल्यामुळे, ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे त्वचा चमकदार होईल.
आम्ही सांगितलेले लाल चंदनाचे फायदे तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
चंदनाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर असा करा केशराचा वापर
व्यस्त आयुष्यात हवा असेल Instant Glow तर ट्राय करा 11 घरगुती उपाय