Diet

पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे

Harshada Shirsekar  |  Jan 17, 2020
पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे

 

भाजीपाल्यासह आपल्या आहारात फळांचाही समावेश करावा. काही फळांच्या साल तसंच पानांमधूनही आपल्या शरीरासाठी पौषकतत्त्वे मिळतात. पपईप्रमाणेच पपईच्या पानांमध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत. पपईच्या पानांच्या रसाचं सेवन केल्यास तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल. पपईच्या पानांमध्ये अल्कॉइड्स कार्पेन (Alkaloids carpain), स्यूडोकार्पेन (pseudocarpain), डिहायड्रोकार्पाइन I आणि II (dehydrocarpaine I and II), कोलिन (choline), कार्पोसाइड (carposide) आणि व्हिटॅमिन सी आणि ई (vitamin C and E ) यासारख्या असंख्य गुणधर्मांचा समावेश आहे. 

(वाचा : हिवाळ्यात करा तिळाचं सेवन, गंभीर आजारातून होईल सुटका)

1. डेंग्यूवर रामबाण उपाय

 

डेंग्यूची लागण झाल्यानंतर रुग्णांना सतत ताप येत राहतो आणि बऱ्याचदा हा ताप कमी देखील होत नाही. तर काही जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू देखील होतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर तीव्र डोकेदुखी, हात-पाय दुखणे, स्नायूंचे दुखणे, अंग थरथरणे आणि डोळे दुखीची समस्याही उद्भवते. या जीवघेण्या तापामध्ये शरीरातील प्लेटलेट कमी होतात. डेंग्यूच्या त्रासातून स्वतःचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पपईच्या पानांच्या रसाचं सेवन करावं. यामुळे शरीरातील प्लेटलेट वाढण्यास मदत होते आणि संसर्गाची तीव्रता देखील कमी होते.

(वाचा : सावधान! तणावामुळे तुमच्या ‘या’ शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम)

2. अँटीमेलेरिया

 

मलेरियाची लागण झाल्यास पपई खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पपईमध्ये, पपईच्या पानांमध्ये अँटीमेलेरियल (Antimalarial) म्हणजे या आजाराविरोधात प्रतिकार करणाऱ्या गुणधर्मांचा समावेश असतो. विशेषतः पपईच्या पानांमध्ये असलेले अँटीमेलेरियल (Antimalarial) गुणधर्म रक्तातील पॅरासाइटना समूळ नष्ट करण्याचं कार्य करते. ज्यामुळे मलेरियाची लागण होण्यापासून आपलं संरक्षण होते.

(वाचा :पाठ दुखीतून सुटका मिळवण्यासाठी करा ही दहा योगासने)

Instagram

3. पचन प्रक्रिया सुधारते

 

पपईच्या पानांमध्ये कर्पेन (Karpain) या रासायनिक संयुगाचा समावेश आहे. कर्पेन पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सुक्ष्म जिवांचा खात्मा करण्याचं कार्य करतं. ज्यामुळे पचन प्रक्रिया योग्य प्रकारे होते. पोटाच्या अन्य आजारांपासूनही सुटका होऊ शकते. विशेष मद्यसेवनामुळे होणारा गॅस किंवा गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.  

Instagram

4. यकृतासाठी फायदेशीर

 

बऱ्याचदा अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे यकृत संबंधी आजार उद्भवतात. यासंबंधी लक्षण आढळून आल्यास पपईच्या पानांच्या रसाचं सेवन करणं करावे. यामुळे यकृत संबंधीच्या आजारांचा धोका कमी होतो. या रसामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्त शुद्ध होतं. महत्त्वाचे म्हणजे यकृताचं आरोग्य सुधारते. 

5. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

 

पपईच्या पानांच्या रसाचा सेवन केल्यास तुमची शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे अनेक आजारांपासून तुमचं शरीर सुरक्षित राहतं. पपईच्या पानांमध्ये इम्यूनोमोडायलेटरी  (Immunomodulatory) चे गुणधर्म आहेत. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.  

6. त्वचा होते सुंदर

 

तुम्हाला सुंदर, नितळ त्वचा हवी असल्यास पपईच्या पानांच्या रसाचं सेवन करावे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ईचं भरपूर प्रमाणआत आहे, ज्यामुळे तुमच्या त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होतं. सोबतच त्वचेवरील सुरकुत्याही कमी होतात.

shutterstock

 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet