सुंदर, नितळ कांती हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. बाहेरुन सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो.फेशिअल, क्लिनअप आणि काही स्किन ट्रिटमेंटने त्वचा बाहेरुन सुंदर आणि चमकदार होण्यास मदत मिळते. पण जर शरीराच्या आत जर काही गोष्टी केल्या तर त्याचा उपयोग अधिक जास्त दिसून येतो. त्वचेखाली असणारे कोलॅजन वाढवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करायला हवेत. सध्या ट्रेडिंगमध्ये मनुका आणि केशरचे पाणी हे चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. दररोज सकाळी तुम्ही पाण्यात मनुका आणि केशर भिजवून ते पाणी प्याल तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळण्यास मदत मिळेल. उजळ कांतीसाठी याचे नेमके फायदे काय? त्याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.
पाण्यात भिजवा मनुका आणि केशर
सगळ्यात महागडा आणि तोळ्याच्या भावाने मिळणारे केशर हे अनेक गुणांनी युक्त आहे. केशरचे फायदे अनेक आहेत. केशरमध्ये असलेले घटक हे त्वचेवर असणाऱ्या समस्यांना कमी करण्यास मदत करतात. केशरमध्ये अँटीबॅक्टेरिअल घटक असतात.त्यामुळे त्वचेवर येणारे पिंपल्स नियंत्रित राहतात. केशरमध्ये अँटी-एजिंग आणि अँटी ऑक्सिडंटचा साठा असतो जो त्वचा अधिक चांगली ठेवण्यासाठी मदत करतो. केशरचा उपयोग अनेक स्किनकेअर प्रॉडक्टमध्ये केला जातो. तर दुसरीकडे मनुका हा सुकामेवा हा देखील खूपच जास्त फायद्याचा असतो. मनुक्यामध्येही त्वचेच्या पेशी नीट ठेवण्याची क्षमता असते. मनुक्याच्या सेवनामुळे पोट साफ होते आणि शरीरात नको असलेले घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यामुळे मनुका आणि केशर यांचे कॉम्बिनेशन खूपच फायद्याचे ठरते.
असे बनवा मनुका आणि केशरचे पाणी
तुम्हालाही उजळ कांती हवी असेल तर तुम्ही केशर आणि मनुक्याचे पाणी रोज प्यायला हवे. केशर आणि मनुक्याचे पाणी कसे तयार करावे ते जाणून घेऊया.
- एका ग्लासामध्ये 10 ते 12 मनुके घ्या. त्यामध्ये काही केशरच्या काड्या घ्या. त्यामध्ये पाणी घालून ते पाणी रात्रभर भिजत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी मनुका चांगला फुगून येतो आणि केशरचा सगळा रंग हा पाण्यामध्ये उतरतो.
- या दोन्ही पदार्थांचे चांगले घटक यामध्ये उतरल्यामुळे हे पाणी या दोन्ही घटकांनी इन्फ्युज्ड असते. त्यामुळे त्याचे फायदे मिळण्यास मदत मिळते.
- सकाळी उपाशी पोटी तुम्ही हे पाणी पिऊ शकता. ते गरम करुन किंवा थंड प्यायले तरी चालू शकते.
- पाणी गरम प्यायची तुम्हाला सवय असेल तर पाणी गरम करुन प्यायले तरी देखील चालू शकेल.
हे ही असू द्या लक्षात
एखाद्या गोष्टीचे सेवन सतत करत राहिल्यामुळे त्याचे परिणाम कमी होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्ही एक दिवस आड याचे सेवन केले तर त्याचा फायदा जास्त मिळेल. ठराविक काळानंतर तुम्ही याचे सेवन बंद करुन पुन्हा सुरु करावे म्हणजे तुम्हाला त्याचा फरक जाणवेल.
आता सुंदर कांती आणि उजळ कांती यासाठी मनुका आणि केशर याचे सेवन करा.
अधिक वाचा
फेशिअल करताना कराल ‘या’ चुका तर चेहऱ्यावर येतील पिम्पल्स
अतिव्यायाम आणि स्टिरॉईडच्या सेवनाने प्रजनन क्षमतेवर होताय दुष्परिणाम