Skin Care Products

थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल (Best Foot Scrubs In India)

Leenal Gawade  |  Dec 3, 2019
थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल (Best Foot Scrubs In India)

चेहऱ्याच्या त्वचेसोबतच हल्ली पायांची काळजी देखील फारच महत्वाची झाली आहे. तुमचे पाय स्वच्छ, सुंदर आणि मुलायम असतील तर ते आकर्षक दिसतात. अनेकांच्या चेहऱ्याची त्वचा आणि पायाची त्वचा फारच वेगळी असते. याचे कारण इतकेच की, तुम्ही पायांकडे फार लक्ष देत नाही. तुम्ही तुमचे पाय नीट पाहिले आहेत का? तुम्हालाही तुमच्याा पायाची त्वचा निस्तेज आणि कोरडी वाटत असेल तर तुमच्या पायांन स्क्रब आणि मॉश्चराईज करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला तुमच्या पायांसाठी बेस्ट फूट स्क्रब आणि फूट क्रिम याची एक यादीच तयार केली आहे.

पायांची काळजी आणि हिवाळा (Winter and Foot Health)

Shutterstock

हवामान कोणतेही असो तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचेच असते. विशेषत: हिवाळ्यात अनेकांना त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी जाणवू लागतात. विशेषत: पायांची त्वचा कोरडी पडू लागते. अनेकांना हिवाळा आला की, पायांन भेगा पडायला सुरुवात होते. जर पायांना पडलेल्या भेगांकडे दुर्लक्ष केले तर हा त्रास अधिक वाढू लागतो. अनेकांच्या भेगांचा त्रास इतका वाढतो की, चालायलाही अनेकांना अडथळा निर्माण होतो. म्हणूनच इतर हवामानाच्या तुलनेत हिवाळ्यात पायांची काळजी घेणे फार गरजेचे असते. 

सी सॉल्ट स्क्रब म्हणजे काय? (What Is Sea Salt Scrub In Marathi)

तुमच्या पायांना का आहे स्क्रबची गरज (Why Feet Need Scrub)

तुमच्या पायांची काळजी हिवाळ्यात घेणे गरजेचे असते हे जाणून घेतल्यानंतर तुमच्या पायांना स्क्रबची गरज का असते ते जाणून घेणे देखील आवश्यक आहे. तुमच्या इतर अवयवांच्या त्वचेप्रमाणे तुमच्या पायांनाही बरेच काही सहन करावे लागते. तुमचे पाय दिवसभर चालत असतात. तुमच्या चेहऱ्यापेक्षाही जास्त माती आणि धूळ पायांना चिकटत असते. ही धूळ आणि माती नुसत्या पाण्याने अनेकदा निघून जात नाही. अशावेळी तुम्हाला स्क्रबची गरज असते. तुम्ही तुमच्या पायांना स्क्रब चोळल्यानंतर त्यातील लहान लहान पार्टीकल्स तुमच्या पायांच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकतात आणि तुमच्या पायाची त्वचा अधिक चांगली करतात. म्हणून तुम्ही तुमच्या पायांना स्क्रब करणे आवश्यक असते.

चांगल्या त्वचेसाठी टोनर वापरणेही आहे आवश्यक, जाणून घ्या बेस्ट टोनरविषयी

नक्की वापरुन पाहा हे 10 फूट स्क्रब (Best Foot Scrubs In India In Marathi)

आता तुम्ही चांगल्या स्क्रबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही 10 बेस्ट स्क्रब शोधून काढले आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे प्रोडक्ट घेऊ शकता.

1. Biocare Foot Scrub (500 ml, Set of 1)

फायदे (Pros): जोजोबा ऑईल असल्यामुळे तुम्हाला या स्क्रबमुळे फायदा होऊ शकतो. शिवाय किंमतीच्या तुलनेत हे प्रोडक्ट फारच चांगले आहे.

तोटे (Cons): जर तुम्ही या स्क्रबचा अति वापर केला तर तुमची त्वचा कोरडी पडू शकते.

2. BioCare Coffee Gel Scrub

फायदे (Pros):  जर तुम्हाला कॉफीचा वास आवडत असेल तर तुमच्यासाठी कॉफी स्क्रब फार उत्तम आहे. कॉफीमुळे तुमच्या त्वचेला तजेला मिळेलच शिवाय तुमची त्वचा जास्त काळासाठी मॉश्चरायइज राहील. 

तोटे (Cons): कॉफी स्क्रबचे तसे काही तोटे नाहीत. पण तुम्ही जर त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला तो स्क्रब पायावरुन काढणेही गरजेचे असते.

वाचा – गडद गुडघा आणि कोपरांपासून मुक्त कसे करावे

3. Gorgeous London Foot scrub (450 ml, Set of 1)

फायदे (Pros): अॅपरिकॉट, रोझमेरी ऑईल असलेले हे स्क्रब तुमच्या पायांच्या त्वचेसाठी फारच चांगले आहे. तुम्ही त्याचा अगदी बिनधास्त वापर करु शकता.

तोटे (Cons): तुमची त्वचा फार नाजूक असेल तर तुम्ही तुमचे पाय फार जोरात स्क्रब करु नका.

4. Vedic Line Foot Spa Scrub With Menthol

फायदे (Pros): मिंथॉल असल्यामुळे हे स्क्रब लावल्यानंतर तुमच्या पायांना थंडावा मिळतो. याच्या वापरानंतर तुमच्या पायांच्या त्वचेमध्ये तुम्हाला लगेचच झालेला बदल जाणवेल.

तोटे (Cons): जर तुम्हाला मिथाँल आणि थंडावा आवडत नसेल तर मग तुम्ही हे स्क्रब वापरायला नको.

5. BodyHerbals Foot Scrub – 1 minute pedicure

फायदे (Pros):  तुम्हाला कमी वेळात तुमच्या पायांची त्वचा चांगली करायची असेल तर तुम्ही हे स्क्रब नक्कीच वापरुन पाहू शकता. हे स्क्रब 1 मिनिटात पाय चांगले करण्याचा दावा करते.  

तोटे (Cons): इतर स्क्रबच्या तुलनेत हा स्क्रब थोडा महाग आहे. पण एकदा वापरुन पाहण्यास काहीच हरकत नाही.

6. The Nature’s Co. Walnut – Mint Foot Scrub

फायदे (Pros):  या स्क्रबची किंमत जरी जास्त असली तरी याचा रिव्ह्यू चांगला आहे. हे प्रोडक्ट क्रॅक्ड आणि कोरड्या पायांसाठी चांगले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यामध्ये स्क्रब पार्टीकल्स लहान असल्यामुळे ते त्वचेला त्रासदायक ठरत नाही.

तोटे (Cons): याचे फारसे तोटे नाहीत

7. Lorys Chocolate Skin Purifying Foot Scrub

फायदे (Pros): कॉफी स्क्रबसोबत तुम्हाला चॉकलेटचा वास आवडत असेल तर मग तुम्ही हे स्क्रब नक्की ट्राय करुन पाहायला हवे. याचा सुगंध चांगला आहे. आणि याचा परिणाम लगेच तुमच्या त्वचेवर जाणवतो

तोटे (Cons): चॉकलेटचा वास आवडणाऱ्यांना कदाचित हे स्क्रब तितकेसे आवडणार नाही.

8. Vaadi Herbals Foot Scrub With Fenugreek & Lemongrass Oil

फायदे (Pros): मेथीचा आणि लेमनग्रासचे कॉम्बिनेशन असलेला हा स्क्रब तुमच्या पायांसाठी फारच उत्तम आहे.   

तोटे (Cons): मेथीचा वास तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला हर्बल प्रोडक्ट आवडत नसतील तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरु शकता.

9. Beauty Works Foot Scrub

फायदे (Pros):  याचे पॅकींग फारच आकर्षक आहे. अॅपरिकॉट, जोजोबा आणि रोझमेरी ऑईल यामध्ये असल्यामुळे तुमचे पाय मुलायम होतात. 

तोटे (Cons):  याचे रिव्ह्यूज चांगले आहेत. त्यामुळे याचे तोटे नाहीत.

10. Spa Ceylon Luxury Ayurveda Green Mint Cooling Foot Scrub

फायदे (Pros):  मिंट आणि कुलिंग देणारा असा हा स्क्रब आहे.त्यामुळे तुम्हाला हा स्क्रब आवडू शकेल.

तोटे (Cons):  किंमतीच्या तुलनेत या स्क्रबची किंमत अधिक आहे.

फूट क्रिम पायांसाठी म्हणून असते आवश्यक (Why Foot Creams Are Special)

Shutterstock

पायांना स्क्रब करणे जेवढे आवश्यक असते तितकेच त्याला मॉश्चरायइज करणेही तितकेच आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या पायांना चांगले क्रिम लावले तर तुमचे पाय अधिक काळासाठी कोमल राहतील तुमची त्वचा कधीही कोरडी पडणार नाही.

कोमल पायांसाठी नक्की ट्राय करा हे 10 फूट क्रिम (Best Foot Creams)

आता स्क्रबनंतर तुम्ही जर चांगल्या फूट क्रिमच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही 10 फूट क्रिमही शोधले आहेत जे तुम्ही नक्की ट्राय करु शकता.

1. BioCare Foot Spa Cream

फायदे (Pros):  या क्रिमचा सुगंध चांगला आहे.तुमचे पाय दिवसभर छान मऊ राहतात. शिवाय हा ब्रँड बजेट फ्रेंडली आहे.

तोटे (Cons): याचं पॅकींग आकर्षक नाही.

2. Gorgeous London Foot Spa Cream (450 ml, Set of 1)

फायदे (Pros): अॅलोवेरा आणि शिआ बटर याचा समावेश क्रिममध्ये आहे. त्यामुळे या क्रिममुळे तुमची त्वचा छान सॉफ्ट होते.

तोटे (Cons): तोटे असे फार काही नाही.

3. Vaadi Herbals Foot Cream With Clove Oil & Sandalwood

फायदे (Pros):  लवंगाचे तेल आणि चंदनाचा उपयोग या क्रिममध्ये केला असल्यामुळे तुम्हाला याचा जास्त फायदा मिळतो. 

तोटे (Cons): पण तुम्हाला आयुर्वेदीक घटक आवडत नसतील तर मात्र तुम्हाला हे क्रिम आवडणार नाही

4. Fabindia Avocado Foot Cream

फायदे (Pros):  फॅब इंडिया ही कंपनी सौंदर्यप्रसाधनांसाठी फारच प्रसिद्ध आहे. अवाकाडो त्वचा चांगली ठेवते.  याचे रिव्ह्यूज फार चांगले आहेत. 

तोटे (Cons): किमतीच्या तुलनेत हे फारच कमी येते.

5. The Moms Co. Natural Foot Cream

फायदे (Pros): तुमच्या पायांना मुलायम करण्यापासून ते आराम देण्यापर्यंत हे क्रिम काम करते. हे कॅरी करण्यासही सोपे आहे. गरोदर महिलांसाठी ही कंपनी खास प्रोडक्ट बनवते.

तोटे (Cons): ऑलिव्ह ऑईलचा त्रास असेल तर तुम्ही याचा वापर टाळा

6. Kaya Deep Nourish Elbow & Foot Cream

फायदे (Pros): कायाचे ब्युटी प्रोडक्ट अनेकांना आवडतात. एकाचवेळी दोन फायदा देणारे असे हे कायाचे क्रिम असून तुम्हाला त्याचा वापर करता येईल

तोटे (Cons): किंमतीच्या बाबतीत तुम्ही इतर क्रिमसोबत याची तुलना करु नका

7. Coco Soul Foot Cream With Virgin Coconut Oil

फायदे (Pros):  खोबरेल तेलाचे फायदे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला या क्रिमचा उपयोग कळू शकेल तुमची त्वचा मुलायम करण्याचे काम हे क्रिम करते.

तोटे (Cons): खोबरेल तेलाचा त्रास होत असेल तर तुम्ही हे क्रिम वापरु नका.

8. TONYMOLY Shiny Foot Moisture Cream

फायदे (Pros): तुमच्या पायांना शाईन देण्याचे काम हे क्रिम करते असा दावा ही कंपनी करते आणि अगदी तसेच याचे रिव्ह्यूजसुद्धा आहेत. 

तोटे (Cons): जर तुम्हाला दुधाचा त्रास असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट टाळा

9. Kama Ayurveda Foot Cream

फायदे (Pros): 100% ऑरगॅनिक असे हे प्रोडक्ट असून तुम्हाला याचा फारसा त्रास होत नाही. यात अनेक चांगले घटक असल्यामुळे याचा फायदाच तुम्हाला होतो.

तोटे (Cons): तोटे असे काही नाही

10. L’Occitane Shea Butter Foot Cream

फायदे (Pros): शिआ बटर असल्यामुळे हे क्रिम फारच उत्तम आहे. 

तोटे (Cons): पण याची किंमत फारच जास्त आहे. त्यामानाने हे क्रिम फार कमी आहे.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

1. पायांचा कोमलपणा कसा टिकवता येईल?

पाय, पायाची नखं चांगली राहावी म्हणून अनेक जण पेडिक्युअर करतात. पेडिक्युअर केल्यानंतर तुमच्या पायांची त्वचा स्वच्छच होत नाही. पण कोमल होते. पण हा फरक काही काळापुरताच राहतो. त्यानंतर तुमच्या पायाची त्वचा पुन्हा रुक्ष वाटू लागते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी फूट मास्क वापरा. फेस मास्कप्रमाणे फूट मास्कमध्ये तुमच्या पायातील कोमलपणा जपण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही जरआठवड्यातून एकदा पायांसाठी या मास्कचा उपयोग केला तर तुमचे पाय कोमल राहतील. 

2. पाय कोरडे का पडतात ?

काही जणांचे पाय फारच कोरडे असतात. त्वचा कोरडी असेल तर तुमचे पाय अजिबात आकर्षक वाटत नाही.  चुकीच्या चपलांची निवड, पाय सतत उघडे असणे यामुळेही तुमचे पाय कोरडे पडतात. जर तुम्ही तुमच्या पायांकडे लक्ष देत नसाल तरी देखील ते कोरडे पडायला लागतात. 

3. पायांची काळजी घेणे हिवाळ्यात गरजेचे असते ?

ज्यांचे पाय अति शुष्क असतात त्यांना हिवाळ्यात पाय फुटण्याचा भयंकर त्रास होतो.जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेणे फारच आवश्यक असते. तुम्ही तुमच्या पायांना मॉश्चरायझर लावले तर तुमच्या पायांना हिवाळ्यात होणारे त्रास होणार नाहीत.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.

You Might Like These:

हिवाळ्यामध्ये अशी घ्या त्वचेची काळजी (Winter Skin Care Tips In Marathi)

चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय

काळ्या डागांवर करा घरगुती उपाय

Read More From Skin Care Products