लिपस्टिकचे कोणतेही शेड्स असो तुमच्या स्किनटोनवर ते परफेक्ट उठून दिसायला हवेत. तुमचा चेहरा अधिक उजळ असो अथवा डस्की असो तुम्हाला आपली लिपस्टिक शेड योग्यरित्या निवडायला हवी. काही जणींना वाटतं की, गुलाबी शेड त्यांना चांगली दिसत नाही. पण गुलाबी रंगामध्येही अशा काही शेड्स असतात ज्या कोणालाही चांगल्या दिसतात. कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी हल्ली लाल अथवा गुलाबी शेड्स जास्त प्रमाणात वापरल्या जातात. अशाच काही #musthave गुलाबी लिपस्टिक शेड्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात मस्त मिरवू शकता. अशा कोणत्या शेड्सचा वापर करायचा आपण पाहूया. या लिपस्टिक तुम्हाला अधिक सुंदर दिसतील आणि तुम्ही अधिक आकर्षक दिसाल.
मेबेलिन न्यूयॉर्क कलर सेन्सेशनल मॅट लिपस्टिक – लस्ट फॉर ब्लश (Maybelline New York Color Sensational Creamy Matte Lipstick – Lust for Blush)
तुम्हाला गुलाबी रंग खूप गॉडी वाटत असेल आणि तुम्हाला जर अगदी गडद रंग नको असेल तर तुम्हाला हा उत्तम पर्याय आहे. मेबेलिनची ही शेड तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या लिपस्टिकचे टेक्स्चर क्रिमी असून फिनिश मॅट आहे. पण ज्या व्यक्तींचे ओठ कोरडे आहेत आणि एक्स्ट्रिम मॅट ज्यांना आवडत नाही अशा लोकांसाठी ही लिपस्टिक नाही. पण तुम्ही जर नियमित लिपस्टिक वापरत असाल आणि तुम्हाला गुलाबी रंग वापरायचा असेल तर तुम्ही नक्की ही शेड वापरायला हवी. ही शेड तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच फरक निर्माण करते आणि तुम्ही अधिक आकर्षक आणि उठावदार दिसता.
स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी
फेसेस कॅनडा वेटलेस मॅट फिनिश लिपस्टिक – ब्लेझिंग ब्लश (Faces Canada Weightless Matte Finish Lipstick – Blazing Blush)
तुम्हाला हेव्ही लिपस्टिक आवडत नसेल तर तुम्ही फेसेस कॅनडा (Faces Canada) ची ही वेटलेस व्हर्जन लिपस्टिक नक्की वापरायला हवी. विटामिन ई, बदाम आणि जोजोबा ऑईलने युक्त अशी ही गुलाबी रंगाची लिपस्टिक ना केवळ तुमच्या ओठांचे पोषण करत तर कंडिशनदेखील करते आणि तुम्हाला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मदतही करते. या लिपस्टिकमुळे तुम्हाला लिप बामची गरज भासत नाही. तसाच याचा लुकही वेगळा आणि रॉयल येतो.
तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स
मनिष मल्होत्रा सॉफ्ट मॅट लिपस्टिक – ब्लश रोझ (Manish Malhotra Soft Matte Lipstick – Blush Rose)
एकदम फ्रेश लुक हवा असेल तर तुम्ही या गुलाबी रंगाच्या शेडचा वापर करू शकता. महत्त्वाचे म्हणजे ही लिपस्टिक पेटाद्वारे संमत असून क्रुएल्टी फ्री आहे. ही अतिशय सॉफ्ट लिपस्टिक असून याचं टेक्स्चर क्रिमी आहे. मॅट फिनिश असून तुमच्या ओठांना मॉईस्चराईज करण्यासाठीही याची मदत होते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातही तुम्ही याचा वापर करू शकता. ही लिपस्टिक नॉनग्रीसी असून व्हिगन आहे. तसंच मिनरल्स, D5 आणि पावडरमुक्त आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही लिपस्टिक वापरू शकता.
सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक
लॅक्मे 9 टू 5 प्राईमर + मॅट लिप कलर – पिंक परफेक्ट (Lakme 9 to 5 Primer + Matte Lip Color – Pink Perfect)
फ्लेकिंग लिपस्टिक, स्मिअर लिप्स अशा समस्या असतील तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये इनबिल्ट प्राईमर आहे जे लिपस्टिक जास्त काळ ओठांवर टिकण्यासाठी फायदेशीर ठरते. ही एक ज्युसी निऑन शेड लिपस्टिक असून तुमच्या स्किनटोनवर उठून दिसते आणि तुम्हाला अधिक आकर्षक बनवते. ही वापरायलाही सोपी आहे आणि ओठांवर जास्त काळ टिकते.
एले 18 गो मॅट लिप क्रेयोन्स – 03 माओ शॉट (Elle 18 Go Matte Lip Crayons – 03 Mauve Shot)
तुमच्या त्वचेचा स्किन टोन गडद असेल तर तुम्ही लाईट शेड्स निवडू शकता पण तुम्हाला यासाठी एक ट्रिक वापरावी लागेल. यामुळे तुमची स्किन जास्त अंडरटोन होईल. त्यासाठी ही लिपस्टिक चांगला पर्याय आहे. ही लिपस्टिक लावायला पण सोपी आहे. क्रेयॉन असल्याने तुम्हाला पटकन ओठांवर अप्लाय करता येते. तसंच तुम्हाला जंकी मेकअप आवडत नसेल तर ही लिपस्टिक उत्तम पर्याय आहे. पटकन येता जाता तुम्ही कधीही या लिपस्टिकचा वापार करू शकता आणि ही दिसायलाही सुंदर दिसते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक