बिग बॉस

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेने Kiss मागत ओलांडल्या मर्यादा, हद्द पार

Dipali Naphade  |  Dec 16, 2021
bigg boss 15

बिग बॉस (Bigg Boss) हा असा रियालिटी शो आहे जिथे रोज प्रत्येकाचे एकमेकांबरोबर वागणे बदलताना दिसते. काही जण अत्यंत चांगले वागून पुढे जातात तर काही जण अत्यंत वाईट वागतात. या रियालिटी शो मध्ये सेलिब्रिटी आणि त्यांचा मूळ स्वभाव कसा आहे हेच दिसून येते. यावर्षीचा बिग बॉस हा फक्त आणि फक्त भांडणामुळे गाजला आहे. इतकंच नाही तर यावर्षी स्पर्धकांनी एकमेकांवर हातदेखील उचलला आहे. तर आता स्पर्धक असणाऱ्या अभिजित बिचुकलेने (Abhijeet Bichukale) हद्द पार केली आहे. अभिनेत्री देवोलिन भट्टाचारजी (Devoleena Bhattacharjee) हिच्याकडून त्याने थेट गालावर चुंबन (kiss) मागितले आहे. त्यामुळे आता विकेंड का वारमध्ये (Weekend ka War) अभिजितवर नक्की काय काय आरोप लागणार आणि काय ऐकून घ्यावं लागणार तसंच अभिजित टिकणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान यावरून घरात एकच गदारोळ माजलेला दिसून येत आहे. 

अधिक वाचा – राजेशाही थाटात केले अंकिता लोखंडेने लग्न, मराठी कलाकारांची हजेरी

देवोलिना आणि अभिजितमध्ये कडाक्याचे भांडण 

अभिजित बिचुकले आणि देवोलिना हे नेहमीच घरात एकत्र दिसून येत होते. मात्र आता अभिजितच्या या वागण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालेले प्रोमोमध्ये दिसून आले आहे. एका फॅनपेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. एका टास्कदरम्यान अभिजितने आपल्या वागण्याची हद्द पार केलेली दिसून येत आहे. या टास्कमध्ये सामानाची चोरी करायची आहे. सुरूवातीला अभिजितने देवोलिनाचे गाल ओढले आणि म्हणाला, ‘माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन पण मला एक किस हवंय.’ हे ऐकल्यानंतर देवोलिनच्या रागाचा पारा वाढलेला दिसते आणि ती त्याला नकार देते. तर त्यावर अभिजित आपण मदत करणार नाही असंही सांगतो. त्यावर देवोलिनाने त्याला सांगितले की आपल्या चांगुलपणाचा त्याने फायदा घेऊ नये आणि हद्द पार करू नये. यानंतर अभिजित तिला म्हणतो की, मी तर मस्करी करतोय. मात्र त्यावेळी प्रतिक सहजपाल येऊन भांडण थांबविण्याचा प्रयत्न करतो. तर तेजस्वीला याबाबत कळले असता ती मात्र देवोलिनाला पाठिंबा देते. 

अधिक वाचा – साराच्या ‘चकाचक’ गाण्यावर झालेत सेलिब्रिटीही फिदा

अत्यंत खालच्या थराची मागणी 

प्रकरण अंगाशी येत आहे असं वाटल्यावर अभिजितने आपण मस्करी करत आहोत असं सांगितलं असंच या व्हिडिओमध्येदेखील वाटत आहे. तसंच याआधीही अभिजित बिचुकलेने अनेक अशा गोष्टी केल्या आहेत ज्या आक्षेपार्ह आहेत. त्याचं वागणं बोलणं हे कोणालाही न पटण्यासारखं असून त्याने घरात राहणं योग्य नाही असंही अनेकांना वाटत आहे. बिग बॉसच्या घरात असणारे स्पर्धक आणि त्यांचे वागणे याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र पहिल्यांदाच या घरात अशी खालच्या थराची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता अभिजित बिचुकले यानंतर या आठवड्यात घरात टिकणार का? आणि त्याची हकालपट्टी होणार की, त्याला समज देऊन घरात ठेवण्यात येईल याबाबतदेखील आता अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र देवोलिना आणि अन्य मुली याबाबत नक्कीच आवाज उठवतील असाही अंदाज बांधण्यात येत आहे. या कृतीमुळे देवोलिनाला नक्कीच धक्का बसला आहे हे दिसून येत आहे. 

अधिक वाच – लग्नानंतर विकी जैनने अंकिताला गिफ्ट केला मालदिव्जमध्ये लग्जरी व्हिला

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस