बिग बॉस

Bigg Boss Marathi: आदिशच्या एंट्रीमुळे घरात खळबळ, जय-उत्कर्ष अस्वस्थ

Leenal GawadeLeenal Gawade  |  Oct 13, 2021
आदिश वैद्य

Bigg Boss Marathi च्या घऱात सध्या वादळ यायला सुरुवात झाली आहे. घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरात आलेला आदिश वैद्य घरातील अनेकांना त्रासदायक वाटू लागला आहे. आदिशवैद्यला घरात येताना कॅप्टनपदाचा मान मिळाला. घरात येण्याच्या आधीच त्यांनी जय आणि उत्कर्ष यांच्या ग्रुपशी पंगा घेतल्यामुळे ते अस्वस्थ होऊ लागले आहेत. आता घरात जिथे तिथे आदिशची चर्चा होऊ लागली आहे. उत्कर्ष आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सध्या आदिशबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता आदिश आणि दुसऱ्या गटात आधीच पंगा झाल्यामुळे आता आणखीन पंगा होणार आहे असे दिसून येत आहे. 

ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती

आदिशबद्दल सुरु झाली चर्चा

एखादी वाईल्ड कार्ड एंट्री घरात आल्यानंतर तिला कधीच कोणी स्विकारत नाही. असेच काहीसे पडसाद आदिशबद्दल पाहायला मिळत आहे.आदिश  गट ए म्हणून प्रसिद्ध असलेला जय, उत्कर्ष, मीरा, स्नेहा, गायत्री, सुरेखा यांच्या गटाला याचा चांगलाच त्रास होणार आहे असे दिसून येत आहे. उत्कर्ष आणि जय यांना आपण या घरात सरस आहोत असे वाटत होते. पण आता त्यांना नडण्यासाठी आलेला आदिश त्यांना चांगलाच त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच की काय आदिशची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. आता पुढच्या टास्कमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते पाहणे रोमांचक ठरणार आहे.

पहाऱ्यावरुन झाला पंगा

आदिश वैद्य घरी आल्या आधीपासूनच पंगा सुरु झाला आहे. आदिश घरी येण्याआधी त्याने टेम्पटेशन स्विकारल्यामुळे तो घरचा कॅप्टन झाला आहे. घरचा कॅप्टन झाल्यामुळे त्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्याला काही अधिकार दिल्यामुळे त्याने घरचा पहारा करायला लावल्यामुळे आधीच त्यांच्या गटात धूसपूस सुरु झाली आहे.  पहिल्याच दिवशी घरात भांडणं झाल्यामुळे  जय- आदिशचा हा पंगा सगळ्यांनाच बघायला आवडला आहे. पण जो जय पहिल्या दिवशी अनेकांच्या आवडीचा चेहरा होता तो मात्र आता हळुहळू निगेटीव्ह रोलमध्ये गेला आहे. आदिश हा आपलं काम करत असताना दुसऱ्या गटातील लोकं ही चुकीची वागताना दिसत आहे.

Bigg Boss 15 : मायशा आणि इशानने केली हद्द पार, नवा व्हिडिओ व्हायरल

स्नेहा आणि जयचे फ्लर्टिंग

घरात सध्या जय- स्नेहावर अनेकांचे कॅमेरे आहेत. कारण या दोघांमध्ये काहीतरी गडबड सुरु आहे असे अनेकांना दिसत आहे. स्नेहासोबत जय अनेकदा फ्लर्ट करताना दिसत आहे. त्यामुळे आता या घरात ही नवी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे असे दिसून येत आहे. पण पुन्हा एकदा हा प्रश्न येतो की, हे सगळे कॅमेरऱ्यामुळे होत आहे की, अजून कशामुळे ते कळत नाही. पण या दोघांची लव्हस्टोरी आता अनेकांना दिसू लागली आहे.

आदिश आहे का विकासच्या बाजूने

 आदिशच्या बद्दल इतक्या चर्चा रंगलेल्या असताना आदिशला मात्र विकास जास्त आवडतो असे त्याने आधीही सांगितले. त्यामुळे नक्कीच तो त्या गटाकडे अधिक झुकताना दिसत आहे. दुसरीकडे महेश मांजरेकरांनी कितीही फटकारले तरी देखील जय मीरा, उत्कर्ष यांच्यात काहीही फरक झालेला दिसत नाही. त्यामुळे आता यंदाच्या चावडीवर नेमकं काय होईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आता ही खळबळ भुकंपामध्ये कधी बदलणार याची अनेक जण वाट पाहात आहेत

Read More From बिग बॉस