बिग बॉस मराठी Bigg Boss Marathi आता चांगल्याच रंगत वळणावर आहे. कारण या घरात 50 दिवस म्हणजे अर्धा टप्पा पार पाडल्यानंतर आता या घरातील लढत अधिक चुरशीची होत राहणार आहे. थोड्यात दिवसात घरातील टॉप 10 सदस्या कोण? याचा निकाल लागणार आहे. त्यासाठीच घरात काही टास्क सुरु आहे. ‘जपून दांडा धर’ या टास्कदरम्यान स्नेहा खेळातून बाद झाली त्यावेळी तिने विकासवर धक्का लावल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर स्नेहाने विकास असा कायम धक्का मारतो असे देखील विधान केले. त्यामुळे विकास फॅन्सना खूपच धक्का बसला आहे. स्नेहा या खेळात स्पष्ट हरल्याचे दिसल्यानंतर हा कांगावा करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. विकास आणि स्नेहा या दोघांकडून या संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. पण त्यामध्ये आम्हालाही विकासने धक्का मारला असे दिसून येत नाही. प्रेक्षकांनाही असे काही दिसत नसल्यामुळे स्नेहाचा कमेंट बॉक्सही तिच्या विरोधात भरलेला दिसत आहे.
कार्यादरम्यान झाली का धक्काबुक्की
Bigg Boss Marathi च्या घरात आतापर्यंत कोणताही टास्क भांडण आणि राड्याशिवाय झालेला नाही. नुकताच झालेला ‘जपून दांडा धर’ या टास्कदरम्यान कॅप्टनपदासाठी दावेदार निवडणे होते. त्यासाठी गार्डन एरियामध्ये असलेल्या एका खांबावर स्पर्धकांना आपले नाव लावणे अनिवार्य होते. या खेळातून एक एक खांब बाद होणार होता आणि त्यानुसार स्पर्धक. विकास आणि स्नेहा हे ज्यावेळी एकाच खांबावर आपले नाव चिकटवायला गेले त्यावेळी विकास हा वेगात पोलकडे धावला. स्नेहा ही त्यावेळी मागे पडली हे सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिले. त्यानंतर ती विकासच्या अंगावर जाऊन धडकली. तिला झालेला उशीर आणि कार्यातून बाहेर पडल्यामुळे तिने थेट विकासने धक्का दिला असा आरोप केला. विकास पाटील असं नेहमी करतो असं देखील ती म्हणाली. हा व्हिडिओ दोन्ही स्पर्धकांच्या सोशल मीडियावर आहेत. त्यामध्ये कोणालाही विकासने स्नेहाला कोपर मारले असे दिसत नाही. उलट त्यामध्ये स्नेहाच त्याच्या अंगावर धडकताना दिसत आहे. असे धडधडीत खोटे बोलल्यामुळे नक्कीच स्नेहाला या शनिवारी चावडीत ऐकावे लागेल यात शंका नाही.
या आधीही केले आरोप
सुरुवातीच्या टास्क दरम्यानही असाच आरोप स्नेहाने विकासवर केला होता. त्यावेळी महेश मांजरेकरांनी विकासची बाजू घेतली होती. विकास त्यावेळी स्नेहाला बाजूला होण्यास सांगत होता. पण ती झाली नाही. त्यावेळी पर्यायी तो धक्का बसला. त्यावेळी स्नेहा, तृप्ती, मीरा यांनी वुमन कार्ड खेळत मुद्दाम धक्का दिल्याचे म्हटले. ज्याचा फायदा घरातील काही इतर सदस्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण महेश मांजरेकरांनी बाजू घेतल्यामुळे तो विषय तिथेच थांबला. घरात इतके कॅमेरे असताना अशा प्रकारे धडधडीत खोटं बोलणं. शिवाय मला धक्का लागला. असे सांगणे त्यानंतर फारच चुकीचे आहे. स्नेहाच्या टीमने या संदर्भातील काही पुराव्यादाखलचे व्हिडिओ जरी शेअर केले असले तरी तिला पाठिंबा देताना कोणीही दिसत नाही.
आयुष्य जगा… का दिला अजिंक्य राऊतने दिला फॅन्सला सल्ला
चावडीवर घ्यायला हवी शाळा
यंदाच्या आठवड्यात चावडीवर घेण्यासाठी काही खास विषय नक्की आहेत. पण महेश मांजरेकरांनी स्नेहाची शाळा घ्यावी असे अनेकांना वाटते. इतरवेळी जयच्या आजुबाजूला सतत वावरणारी स्नेहा खेळात फार कमीच सहभागी असते.शिवाय टास्क हरल्यानंतर अशाप्रकारे आरोप करते याचा आमने सामने व्हायला पाहिजे. असे अनेकांना वाटत आहे.
आता या चावडीच्यावेळी हा विषय निघेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या जिथे तिथे होतेय कतरिनाच्या टिप टिप बरसा पानीची चर्चा, रविना म्हणाली