बिग बॉस

#BBM2 ही दोस्ती तुटायची नाय….

Aaditi Datar  |  Sep 4, 2019
#BBM2 ही दोस्ती तुटायची नाय….

#BBM2 संपल्यानंतरही माधव देवचके, नेहा शितोळे, हिना पांचाळ, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वे यांनी आपली मैत्री जपली आहे. नुकतंच माधव देवचकेच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नेहा आणि हिना आल्या होत्या. बाप्पाच्या दर्शनानंतर माधवने आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला व्हिडीओ कॉल केला आणि मग हिना, माधव, नेहा, आरोह आणि शिवानी यांच्या बराच वेळ गप्पा रंगल्या. याची पोस्टही नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या गप्पांनंतर माधव, हिना आणि नेहाने घरात खूप धमाल केली.

माधव, नेहा आणि हिनाची धमाल

खरंतर अभिनेता माधव देवचकेच्या घरी दरवर्षी गणपतीच्या दर्शनाला त्याचे शाळा-कॉलेजपासून ते अगदी फिल्म इंडस्ट्रीतले बरेच मित्र-मैत्रिणी येतात. यंदा या लिस्टमध्ये हिना आणि नेहाचीही भर पडली आहे. माधवला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मिळालेल्या या दोन मैत्रिणींशी त्याचे ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जुळले आहेत, असंच दिसतंय. नेहा-हिनाने माधवच्या घरी खूप धमाल केली. त्याच्या सर्व घरच्यांसोबत भरपूर गप्पा मारण्याशिवाय त्या तिघांनी एक मस्त डान्सही केला. ज्याचा व्हिडीओ माधवने नंतर आपल्या सोशल मीडियावर टाकला. पाहा त्यांच्या धमाल डान्सचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ –

माधवच्या फ्रेंडलिस्टमध्ये झालं अॅडीशन

नेहा आणि हिना गणपती दर्शनासाठी घरी भेटायला आल्या त्यामुळे माधवला खूप आनंद झाला. त्यांच्या या भेटीबाबत सांगताना माधव म्हणाला की,  “गेल्या 60 वर्षांपासून आमच्या घरी गणपती बसत आहे पण हे वर्ष आमच्यासाठी अधिक खास आहे. कारण बिग बॉसच्या घरातल्या दोन नव्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या आहेत.”

माधवच्या बाप्पामुळे पुण्याला करणार नाही मिस

तर माधव आणि त्याच्या घरच्यांना भेटून नेहा म्हणाली, “माधवच्या घरी मी पहिल्यांदाच गणपतीसाठी आले आहे. पण माधवच्या घरची मंडळी इतकी गोड आहेत की, मला अजिबात असं वाटत नाहीये की, मी पहिल्यांदाच त्यांना भेटते आहे. मुंबईतलं माझं घर सोडून आता अजून एक नवीन घर मला मिळालंय. मी बऱ्याचदा कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे घरात गणपती बसवणे खूप मिस करते पण यावर्षीपासून आता माधवच्या घरी गणपती येत असल्याने घरी नसणे मी मिस करणार नाही.”

बिग बॉसच्या घरातले शत्रू आता झाले मित्र

हिना आणि माधवचे बिग बॉसच्या घरात काही वेळेला मतभेद, कडाक्याची भांडणं झाली होती. परंतू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ते सारे रुसवे फुगवे विसरून ते पुन्हा नव्याने मित्र म्हणून भेटले. त्याविषयी हिना म्हणाली की, “बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा कुठल्याच स्पर्धकांशी माझी ओळख नव्हती. पण बिग बॉसच्या घरातून परत आल्यावर बाहेरच्या जगात त्यांच्या बरोबर जगणं खूप वेगळी आणि मस्त फिलींग आहे. बिग बॉसच्या घरामूळे मला खास दोस्त, बेस्ट बडीज मिळाले. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांबरेबर भांडणं होतात पण बाहेर आल्यावर ते विसरून सगळे पुन्हा खूप छान मित्र होतात.”

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन संपला तरी प्रेक्षक घरातील कंटेस्टंट्सना अजूनही भरभरून प्रेम देत आहेत आणि घरातील सदस्यही बाहेर आल्यावर एकमेकांसोबत मैत्री ठेवून आहेत.

हेही वाचा –

स्वप्नं पूर्ण होतात….शिव ठाकरेने दिला चाहत्यांना संदेश

#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

#BBM2 : धक्कादायक निकालात माधव देवचके झाला एलिमिनेट

Read More From बिग बॉस