घरात आल्यानंतर सगळ्यांचा आवडीचा असा झालेला स्पर्धक जय दुधाणे दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरे जात आहे. जयचा स्मार्टनेस आणि फिटनेस पाहून खूप जणांना आनंद झाला होता. पण आता घरात तीन आठवडे झाल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे समोर येऊ लागले आहेत.खेळात उत्तम असूनसुद्धा जय दुधाणे हा दिवसेंदिवस वेगळा दिसू लागला आहे. ज्या स्पर्धकवृत्तीने या घरात जय आला होता. ती स्पर्धकवृत्ती आता जय दुधाणेमध्ये अजिबात दिसून येत नाही. शिवाय जयचे सतत ग्रुपिझम करणे, चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देणे यामुळे अनेकांनी त्याच्या कार्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती
जयचा गेम खराब होतोय
जयचा खेळ हा ग्रुपमध्ये गेल्यामुळे खराब होऊ लागला आहे. असे अनेकांना वाटत आहे. जय- मीरा-गायत्री- उत्कर्ष असा हा ग्रुप घरात सध्या ॲक्टिव्ह दिसून येत आहे. हा ग्रुप घरातील इतरांना अजिबात खेळू देत नाही. चिडून किंवा भांडण करुन या ग्रुपला सगळे काही मिळवायचे असते. त्यामुळे या घरात इतरांना खेळायची संधी या घरात मिळत नाही. सध्या याच गटात खेळ सुरु असल्यामुळे हा सीझन फक्त या चार जणांसाठी कऱण्यात आला आहे. त्यामुळे फक्त हाच गट खेळताना दिसत आहे. सध्या घरात या चार जणांची चलती आहे. यामधील मास्टर माईंड उत्कर्ष असून फक्त भांडण करण्यासाठी जय आणि मीरा ही दोघं पुढे असताना कायम दिसून येतात. जय आता या सुरक्षा कवचात गेल्यामुळे त्याला कसे खेळायचे याचा मार्ग दिसेनासा झाला आहे. शिवाय या गटातील प्रत्येकाला ‘ग’ ची बाधा झाली असल्याचे दिसून येत आहे.
Bigg Boss Marathi: आदिशच्या एंट्रीमुळे घरात खळबळ, जय-उत्कर्ष अस्वस्थ
जयला आदिश देणार टक्कर
या घरात वाईल्ड कार्ड एंट्रीच्या रुपात आदिश वैद्य हा अभिनेता आला आहे. आदिश वैद्यची एंट्री कॅप्टनच्या रुपात झाल्यामुळे आधीच घरातल्यांना आवडले नव्हते. पहिल्याच दिवशी टास्कमध्ये जयला कामाला लावल्यामुळे आदिश जयच्या वाकड्यात गेला होता. मीरा- गायत्री-जय यांच्यामध्ये आदिशबद्दल चर्चा सुरु झाली. आपल्याहून कोणीही सरस घऱात आल्यानंतर या ग्रुपमध्ये टीका सुरु होतात. आपल्यापेक्षा कोणीही चांगले नाही असे सतत दिसून आल्यामुळे जयची इमेज घरात खराब होताना दिसत आहे. इतकेच नाही तर चावडीवर महेश मांजरेकरांनी अनेकदा संकेत देऊनसुद्धा या ग्रुपमध्ये काहीही फरक पडलेला नाही त्याचाच परिणाम की काय आता आता खेळात तो बायस दिसू लागला आहे.
सुरेखा कुडची नाराज
घरातील सिनिअरमंडळींची फळी म्हणजे सुरेखा, दादूस, तृप्ती ताई यांना या घरात केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी वापरले जात आहे. सुरेखा कुडची यांना खेळ हा अजिबात कळलेला नाही. त्यामुळे त्यांचा वापर केला जात आहे हे कोणालाही कळत नाही. दादूस या घरात जयच्या गटाकडे अधिक झुकलेले आहेत. पण तिकडे त्यांचा केवळ फायदा उठलला जात आहे हे देखील त्यांना कळत नाही. सुरेखा कुडची या केवळ विकास- मीनल यांच्यावर अरेरावी करताना दिसतात. पण त्यांना खऱा धोका हा दुऱ्या गटाकडून अधिक असल्याचे दिसून येत आहे. तृप्ती ताईंना कळत असूनही त्यांना या गटातून बाहेर पडायचे नाही. त्यामुळे या घरात केवळ जागा अडवण्यासाठी त्यांना घेण्यात आल्याचे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
त्यामुळे आता जयबद्दल नाराजी वाढलेली दिसण्यामागे ही काही कारणं असल्याची दिसत आहे.
Bigg Boss 15 : मायशा आणि इशानने केली हद्द पार, नवा व्हिडिओ व्हायरल