Dating

बॉयफ्रेंडच्या बर्थडेला असं द्या सरप्राईज Birthday Surprise Ideas For Boyfriend In Marathi

Aaditi Datar  |  Nov 20, 2019
बॉयफ्रेंडच्या बर्थडेला असं द्या सरप्राईज Birthday Surprise Ideas For Boyfriend In Marathi

 

सरप्राईज प्रत्येकाला आवडतंच. त्यातही आयुष्यातील स्पेशल माणसाचा वाढदिवस असल्यावर त्याला सरप्राईज देण्यात वेगळीच मजा आहे. बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Wishes For Boyfriend In Marathi) आणि गिफ्ट्स तर तुम्ही त्याला प्रत्येक बर्थडेला देत असालच. पण या बर्थडेला त्याला द्या काही खास सरप्राईजेस. ज्यामुळे तो पुन्हा एकदा पडेल तुमच्या प्रेमात. मग पाहा कसं देता येईल त्याच्या बर्थडेला खास आणि पैसे खर्च न करता सरप्राईज.

गिफ्ट खरेदी न करता त्याला द्या ही क्युट सरप्राईजेस (Gifts For Your Boyfriend)

आता त्याचा वाढदिवस आहे म्हटल्यावर तुमचं प्लॅनिंग एक महिना आधीपासूनच सुरू होत असेल. पण काही वेळा फक्त गिफ्ट देण्याऐवजी त्याला स्पेशल फिल करून दिलंत तर तोही सरप्राईज होईल आणि तुम्हालाही त्याच्यासाठी वेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. पाहा गिफ्ट न देताही त्याला पुढील 10 क्युट पद्धतीने कसं सरप्राईज करता येईल.

बॉयफ्रेंडसाठी वाढदिवस आश्चर्यचकित कल्पना

1. तुमच्या लव्हस्टोरीचं खास पुस्तक (Special Book Of Your Love Story)

एखादी छानशी डायरी घ्या आणि त्यावर तुमच्या हाताने खास शब्दात तुमची लव्हस्टोरी लिहा आणि त्याला सांगा की, तुमच्याासाठी तो किती महत्त्वाचा आहे. तुमच्या पहिल्या भेटीपासूनचा प्रवास आणि तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे. ते व्यक्त करा.

Giphy

2. आय लव्ह यू (I Love You)

जर तुम्ही अजून त्याला या मॅजिकल शब्दांमध्ये होकार दिला नसेल तर हीच आहे ती सुवर्णसंधी. ती तीन अक्षरं स्पेल आऊट करा पुस्तकांच्या किंवा फुल पाकळ्यांनी किंवा त्याच्या व्हिडिओ गेम्सच्या कलेक्शनने.

3. ब्रेकफास्टने मिळवा त्याच्या मनात जागा (Get Breakfast In Bed)

Giphy

स्पेशल ब्रेकफास्ट आाणि बेड टी देऊन त्याला करा खूष. हार्टशेप्ड ऑम्लेट किंवा सँडविच आणि चहा…आहे ना रोमँटीक. जर तो व्हेजिटेरियन असेल तर त्याला त्याचा आवडता ब्रेकफास्टही करून खाऊ घालू शकता. कारण तुम्हाला माहीत असेलच की, प्रत्येकाच्या हृदयाचा मार्ग हा पोटातून जातो.

4. पोस्ट पोस्ट पोस्ट (Post On Social Media)

नाही पोस्टाने काहीही पाठवायचं नाही. तर त्याला कलरफुल मेसेज पोस्ट पाठवा मग ते व्हॉट्सअपवर असो वा इन्स्टावर असो. हे मेसेजेस त्याच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि तुमच्याकडून लिहीलेले असावेत किंवा त्याचे आवडते जोक्स, त्याच्या आणि तुमच्या काही खास आठवणी, सकारात्मक मेसेज किंवा लव्ह नोट्सही लिहू शकता. मग या दर तासाला पाठवायच्या की, त्याला एकाच वेळी द्यायच्या हे तुम्हीच ठरवा.

5. केकचं सरप्राईज (Surprise Of The Cake)

Giphy

जर तुम्हाला बेकिंगची आवड असेल आणि तुम्हाला दोघांनाही डेझर्ट्स आवडत असतील तर हे केक सरप्राईज तुम्ही त्याच्यासाठी प्लॅन करू शकता. एका छानसा आणि त्याच्या आवडीच्या फ्लेवरचा केक तयार करून सरप्राईज करा. तो नक्कीच खूष होईल.

वाचा – ओरिओ चॉकलेट केक रेसिपी

6. स्पेशल ट्रीट (Special Treat)

Giphy

हा प्रकार जुना असला तरी आजही तेवढाच पसंत केला जातो. पत्र लिहीणं. त्याचा वाढदिवस जवळ आल्यावर रोज एक पत्र त्याच्यासाठी लिहा. एखादी छोटीशी नोट त्याच्यासोबत तुमच्या आठवणी पहिल्या सिनेमाला एकत्र गेला असाल त्याचं तिकीट, त्याने दिलेल्या चॉकलेटचं रॅपर किंवा त्याच्या आवडत्या पुस्तकातील ओळी लिहून पाठवा.

7. सरप्राईज पिकनिक (Surprise Picnic)

Giphy

सँडविच, कपकेक्स आणि चहा किंवा कॉफी भरलेला थर्मास घ्या आणि त्याला पिक करून सरप्राईज पिकनिकला न्या. तुमच्या रोजच्या धावपळीच्या रूटीनमधून बाहेर पडून पुन्हा एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा प्लॅन नक्कीच उपयोगी पडेल.

8. त्याच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट (Playlist Of His Favorite Songs)

तुम्हाला दोघांना किंवा त्याला गाण्याची आवड असेल तर मग सरप्राईज देणं खूपच सोपं आहे. त्याच्या आवडत्या 10-20 गाण्यांची लिस्ट करा आणि त्याला गिफ्ट करा.

9. सजना है मुझे.,..(Get Dressed For Your Boyfriend)

Giphy

तुमच्या वॉर्डरोबमधला एकतरी ड्रेस असा असेल जो त्याला खूप आवडत असेल. मग त्याला भेटायला जाताना खास तो ड्रेस घालून जा. जर त्याला तुम्ही साडी नेसलेली आवडत असेल तर त्याला सरप्राईज करा. असं ड्रेसअप व्हा की, तो अवाकच झाला पाहिजे.

10. बाहेर जाण्याआधी स्पेशल नोट (Special Note Before Leaving)

Giphy

जर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्याला सकाळी भेटणार नसाल तर त्याच्यासाठी क्युट नोट लिहून ठेवा आणि त्याला सकाळी मिळेल असं प्लॅन करा. संध्याकाळी त्याला भेटल्यावर तो नक्कीच त्या स्पेशल नोट इंप्रेस झाल्याचं तुम्हाला कळेल.

बॉयफ्रेंडच्या बर्थडेसाठी खास सरप्राईजेस (Surprise For Boyfriend’s Birthday)

वरील सरप्राईजेस जी कमीत कमी किंवा कोणताही खर्च न करता तुम्हाला बॉयफ्रेंडला देता येतीलच पण पुढील सरप्राईजेस आणि गिफ्ट्स तर बर्थडे बॉयला देणं मस्ट आहे. मग त्याच्या बर्थडेला होऊ दे खर्च असं तुम्हाला वाटत असल्यास ही पुढील सरप्राईजेसची खास लिस्ट तुमच्यासाठी.

1. फॅन्सी केक (Fancy Cake)

आजकाल कस्टमाईज केक बर्थडेला आवर्जून आणले जातात. जर तो टेक्नोसॅव्ही असेल तर तसा कस्टमाईज्ड केक किंवा हार्टशेपमधला एखादा केकही तुम्ही त्याच्यासाठी बनवून घेऊ शकता. हा केक त्याच्या बर्थडे पार्टीला किंवा त्याला सरप्राईज देण्यासाठी रात्री 12 वाजताही गिफ्ट करू शकता.

2. व्हिडिओसोबत सकाळ (Good Morning Video In Marathi)

तुमच्या मोबाईलचा उपयोग त्याच्या बर्थडेसाठी तुम्हाला करता येईल. मस्तपैकी त्याच्या फोटोजचा आणि तुमच्या बर्थडे विशचा व्हिडिओ बनवा आणि त्याला पाठवा. त्या व्हिडिओला खास टच देण्यासाठी तुम्ही त्याच्या बेस्ट फ्रेंड किंवा फॅमिलीचा मेसेजेसही त्यात तुम्ही अॅड करू शकता. तो व्हिडिओ त्याला रात्री 12 वाजता किंवा सकाळी उठल्यावर दिसेल असं सेंड करा. यासाठी तुम्हाला अनेक व्हिडिओ अॅप्सचा वापर करता येईल. असा व्हिडिओ बनवणं फारच सोपं आहे.

3. कँडलाईट डिनर (Candle Light Dinner)

Giphy

तुमची रोमँटीक बाजू त्याच्या बर्थडेच्या निमित्ताने त्याला दिसू द्या. मस्तपैकी त्याला कँडलाईट डिनरला न्या. कारण हे क्लासिक सरप्राईज कधीच आउट ऑफ स्टाईल जाणार नाही.

बोअरींग पार्टीला आणा पार्टी गेम्सनी रंगत

4. थीम्ड सरप्राईज पार्टी (Themed Surprise Party)

Shutterstock

स्टेप वन : त्याच्या आवडीची थीम शोधा मग ती अव्हेंजर्स असो वा इतर कोणती. स्टेप टू : त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना या पार्टीसाठी बोलवा. स्टेप थ्री : मग त्याला सरप्राईज करा. आता तुम्ही एवढी मेहनत घेतल्यावर बर्थडे बॉय खूष होईलच ना.

5. ट्रीप प्लॅन करा (Plan A Trip)

Giphy

वाढदिवसाच्या दिवशी त्याला उठवा. तयार व्हायला सांगा आणि अचानकवाल्या ट्रीपवर त्याला न्या. या सरप्राईज पिकनिकने तो नक्कीच आनंदी होईल.

6. सेन्शुअस सरप्राईज (Sensous Surprise)

Giphy

कधीतरी त्याच्या फँटसीप्रमाणे ड्रेसअप व्हायला काय हरकत आहे. खासकरून जेव्हा त्याचा बर्थडे असेल. मग त्याची फँटसी जर तुम्हाला माहीत असेल तर ती पूर्ण करा. तो या सरप्राईजने नक्कीच आश्चर्यचकित होईल. कारण या सरप्राईजने त्याची विशसुद्धा पूर्ण होईल.

7. स्पेशल हंट (Surprise Hunt)

Giphy

ट्रेजर हंट खेळताना प्रत्येकालाच मजा येते. कारण शेवटी मिळणारं सरप्राईज सगळ्यांना आवडतंच. मग त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हीही क्युट क्ल्यूज देऊन त्याच्यासाठी खास ट्रेजर हंट प्लॅन करा.

8. 12 O’Clock सरप्राईज (Surprise At Midnight)

Giphy

खरंतर हा सरप्राईज प्रकार खूप कॉमन झाला आहे. पण तरीही त्यातली मजा आजही कायम आहे. मग रात्री 12 वाजता त्याच्या घरी पोचा किंवा फ्रेंड्ससोबत त्याला भेटून सरप्राईज करा. अगदी रात्री 12 वाजता तुम्ही खास सरप्राईज पार्टी त्याला देऊ शकता.

9. हँडरिटर्न कार्ड (Handwriting Card)

बाजारात मिळणाऱ्या ग्रीटींग्सपेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेल्या हँडरिटन कार्डची मजा काही औरच आहे. कारण त्यातला मेसेज जेवढा आपलासा वाटतो ना तेवढा विकत घेतलेल्या ग्रीटींग्जवरचा वाटत नाही. मग तुमच्यातील कलाकार त्याला ही दिसू द्या.

10. आवडत्या इव्हेंटच तिकीट (Favorite Event Tickets)

Giphy

जर तो फुटबॉलप्रेमी असेल किंवा त्याच्या आवडत्या आर्टिस्टचं कॉन्सर्ट असेल तर त्याला तिकिट्स काढून द्या. आपल्या आवडीनिवडीची काळजी घेणारी गर्लफ्रेंड कोणालाही मिळाल्यास तो स्वतःला लकी समजेलच.

11. हॉटेल रूम बुक करा (Book A Hotel Room)

प्रत्येकाचंच स्वप्न असतं की, या ठिकाणी एकदा हॉलिडेला जावं किंवा तिकडे गेल्यावर एखाद्या हॉटेलमध्ये उतरावं. मग त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही ही इच्छा पूर्ण करा. आवडत्या हॉटेलमधील रूम त्याच्या नावाने बुक करा आणि एक संपूर्ण दिवस रिलॅक्स करण्यासाठी द्या.

12. मूव्ही नाईट (Movie Night)

जर तुमचा बॉयफ्रेंड मूव्ही फॅन असेल तर दोघांसाठी मस्तपैकी मूव्ही नाईट किंवा मूव्ही डेट प्लॅन करा. त्याच्या आवडत्या मूव्हीची तिकिटं बुक करा किंवा घरीच मस्तपैकी बॅक टू बॅक त्याचे आवडते मूव्हीज पाहा.

तुमच्या पार्टनरबरोबर पाहण्यासाठी 30 नॉटी आणि सेक्सी हिंदी फिल्म्स

Giphy

13. फ्रेंड्ससोबत नाईटआऊट (Nightout With Friends)

तुम्हाला जर त्याच्या वाढदिवसाला वेळ देणं शक्य नसेल तर त्याच्या मित्रांसोबत नाईट आऊट प्लॅन करून द्या. बर्थडे बॉय मित्रांच्या कंपनीने खूष होईलच. त्याला मित्रांसोबत दिल चाहता है मूमेंट जगता येईल. असं केल्याने तर बॉयफ्रेंडला नक्कीच आवडेल.

14. नॉटी गेम्स (Naughty Games)

Giphy

कधी कधी नॉटीपणा करणं ही आयुष्यात आवश्यक असतंच. तुम्हीही बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास तयारी करा नॉटी गेम्सची. आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स

15. आवडतं पुस्तक किंवा गेम कलेक्शन (Favorite Book Or Game Collection)

मुलींना खेळण्याची क्रेझ नसते. पण मुलं मात्र मोठं झाल्यावरही फुटबॉल फॅन किंवा वेगवेगळ्या गेम्स खेळण्यात इंटरेस्टेड असतात. मग तुमचा बॉयफ्रेंड जर बुक लव्हर असेल तर त्याला त्याच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक द्या नाहीतर तुमच्या बॉयफ्रेंडला आवडत्या गेमचं कलेक्शन द्या.

16. नोट विथ लव्ह (Note With Love)

Giphy

जर तुम्हाला शक्य असल्यास बॉयफ्रेंडच्या लंचबॉक्समध्ये काहीतरी खास डिश तर पाठवाच पण त्यासोबत खास लव्ह नोटही तुम्हाला पाठवता येईल. जर तुम्ही एकाच ऑफिसमध्ये असाल तर मग लंचटाईममध्ये या लव्हनोटने त्याच्या चेहऱ्यावर खुलणारं गोड हास्यही तुम्हाला पाहता येईल.

17. सेक्सी मेसेज (Sexy Message)

Giphy

तुम्ही जर बॉयफ्रेंडला बर्थडेच्या दिवशी संध्याकाळी भेटणार असाल तर नो प्रोब्लेम. सकाळपासून तुम्ही त्याला दर तासाला क्युट आणि सेक्सी मेसेज पाठवा. बघा संध्याकाळची भेट नक्कीच रोमँटीक होईल.

18. रिलॅक्सिंग मसाज (Relaxing Massage)

Giphy

आम्हाला खात्री आहे की, त्याने या गिफ्टचा विचार केला नसेल. जर तुम्हाला सेक्सी मेसेज पाठवणं शक्य नसेल आणि तुमच्या दोघांकडे वेळ असेल तर तुमच्या रोमान्सला वाढवा मसाज देऊन. त्याचा वाढदिवस तुम्ही दिलेल्या मसाजने नक्कीच मेमोरेबल होईल.

19. शॉपिंग शॉपिंग (Shopping For Boyfriend)

बॉयफ्रेंडला आतापर्यंत तुम्ही तुमच्या शॉपिंगसाठी अनेकदा नेलं असेल पण त्याला सरप्राईज करायचं असल्यास ऑनलाईन शॉपिंग करून त्याला वाढदिवसाच्या दिवशी ती पार्सल्स पाठवा. अचानक तुमच्या नावाने एखादं पार्सल आलं आणि ते कपडे तुम्हाला हवे तसे परफेक्ट असले तर खूशी तो बनती है. फक्त बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशी हे पार्सल पोचेल याची काळजी घ्या.

20. विसरायचं प्रँक (Prank To Forget)

Giphy

हो…ही आयडिया नेहमीची पण विथ ट्वीस्ट आहे. बॉयफ्रेंडला आदल्या दिवशी फोन करून तुम्ही त्याच्या बर्थडेसाठी काय काय प्लॅन केलं आहे ते सांगा आणि 12 वाजता विश केल्यावर मात्र उद्याचा प्रोग्रॅम कॅन्सल करावा लागणार असं सांगा. त्याचा मूड बेक्कार ऑफ होईल. पण सकाळी द्या बॉयफ्रेंडला सरप्राईज. कसं आहे हे सॅड टू हॅपी सरप्राईज.

सो मैत्रिणींनो, तुमच्या बॉयफ्रेंडला बर्थडेला वरीलपैकी सरप्राईजेस प्लॅन करा आणि त्याच्या वाढदिवसाचं धमाल प्लॅनिंग करा.

Read More From Dating