Diet

बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा ‘हे’ उपाय

Harshada Shirsekar  |  Nov 10, 2019
बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा ‘हे’ उपाय

बहुतांश जणांना छोट्या-मोठ्या आजारातून लगेचच सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांकडे धावण्याची किंवा पेन किलर्स घेण्याची सवय असते. अगदी सर्दी-खोकल्यासाठीही लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात. पण या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. पण तुम्हाला माहिती आहे का? सर्दी-खोकला, पोटदुखी यांसारख्या दुखण्यावर आपल्याला स्वयंपाकघरातही रामबाण उपाय सापडतात. त्यात आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळा ऋतू म्हणजे अनेक आजारांना आयतंच निमंत्रण. हिवाळ्यात सुकामेव्याचं सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सुकामेव्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. शिवाय, शरीराचं तापमान देखील उबदार राहतं. सुकामेव्यातील मनुक्यामध्ये सर्वाधिक औषधी गुण आहेत. हिवाळ्यात मनुक्याचे सेवन केल्यास आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर ठरतं. 

ShutterStock

जाणून घेऊया मनुक्याच्या सेवनाचे फायदे :

मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह (Iron), पोटॅशियम (Potassium), कॅल्शिअम (Calcium), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि फायबर (Fiber) आहे. काही निवडक गोड अन्नपदार्थांमध्येही मणुक्यांचा वापर केला जातो. मणुक्याच्या आंबट-गोड चवीमुळे पदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यास मदत होते. 

1.बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठतेच्या त्रासामुळे तुम्ही प्रचंड हैराण झाले आहात का? तर मग मनुक्याचे सेवन करून बद्धकोष्ठतेची समस्या दूर केली जाऊ शकते. या समस्येवर मनुके हे एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरत नाहीत. बद्धकोष्ठतेच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक जण घरगुती औषधोपचारांचा पर्याय अधिक पसंत करतात. मनुके बद्धकोष्ठतेच्या समस्येवर एक रामबाण उपाय आहे. मनुके काही वेळासाठी पाण्यात भिजत ठेवावेत, त्यानंतर ते खावेत. भिजवलेले मनुके खाल्ल्यानं शरीराला अधिक फायदा होतो.

 मूळव्याधीने हैराण असाल तर करा हे घरगुती उपाय

 

 

 

2. शारीरिक शक्ती वाढते

काही जण मनुके रोज रात्री पाण्यात भिजत ठेवतात आणि सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके उपाशी पोटी खातात. यामुळे शारीरिक ताकद वाढण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये निसर्गतः साखर असते, त्यामुळे ते अगदी सहज पचतात. यामुळे शरीराला लगेचच उर्जा मिळते. हृदविकारांचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठीही मनुके अतिशय फायदेशीर ठरू शकतात. न चुकता नियमित मनुक्यांचे सेवन केल्यानं शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.

तुमच्या पायांची अशी घ्याल काळजी तर कधीच होणार नाही त्रास 

3. हाडांना मिळते बळकटी

दररोजच्या धकाधकीमुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या हाडांवरही गंभीर परिणाम होतात. परिणाम, बहुतांश जणांची हाडे कमकुवत झाल्याची तक्रार असते. हाडे बळकट करण्यासाठी नियमित मनुक्यांचं सेवन करावं. कारण मनुक्यांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. मेंदूच्या आरोग्यासाठीही मनुके प्रचंड फायदेशीर आहेत. 

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

4. वजन घटवणे

शरीर सडपातळ व्हावं, यासाठी कित्येक जण तास-न्-तास जीममध्ये घालवतात. तुम्हीदेखील वजन घटवण्यासाठी अथक मेहनत घेत आहात,  तर मनुके खाण्यास सुरुवात करा. कारण मनुक्यांमध्ये नॅशचल शुगर असते. या साखरेमुळे आपल्या शरीराचं कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. मनुकांच्या निमयित सेवनामुळे तुमचं वजन सहजरित्या घटण्यास सुरूवात होते. शरीरातील कोलेस्ट्रोरॉलचं प्रमाण देखील संतुलित राहतं. 

5. रक्तशुद्धी

मनुक्यामध्ये पुरेशा प्रमाणात लोह (Iron) आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं. शरीरात रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता असते. अशातच शरीरात रक्ताची कमतरता जाणवल्यास मनुके तसंच मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होईल. तसंत रक्त शुद्ध देखील होतं. महत्त्वाचे म्हणजे ऍनिमियाचा त्रास कमी करण्यासही मदत होते.

 

6. दृष्टी सुधारते  

मनुक्यामध्ये ‘व्हिटॅमिन A’ असल्यानं डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. ज्यांना रात आंधळेपणा किंवा ज्यांचे डोळ्यांचे स्नायू अशक्त आहेत. त्यांनी मनुक्याच्या पाण्याचं सेवन नियमित करावं. त्यामुळे बराच फायदा तुम्ही स्वतः अनुभवाल. एकूणच आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठी आहारामध्ये मनुक्याचा समावेश नक्की करा. 

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Diet