DIY सौंदर्य

घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय

Leenal Gawade  |  Sep 25, 2020
घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय

चेहऱ्यावरील पोअर्स मोठे झाले की, त्यामध्ये धूळ- माती- घाण साचून तयार होणारे ब्लॅक हेड्स त्वचेच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक असतात. त्यामुळे त्वचेवरील छिद्र अर्थात पोअर्स वेळच्या वेळी स्वच्छ करणे फारच गरजेचे असते. ब्लॅकहेड्स तयार होण्याआधी असलेल्या व्हाईट हेड्सवर योग्य त्यावेळी इलाज केला तर हा त्रास अगदी काहीच मिनिटांत दूर होऊ शकतो. तुम्ही सगळ्या घरगुती ट्रिक्स वापरुन झाला असाल. पण त्यानेही फारसा फायदा तुम्हाला झाला नसेल तर आज मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे. ज्यांच्या मदतीने तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ब्लॅकहेड्स अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि चेहऱ्याला कोणताही त्रास न देता काढून टाकता येईल. चला जाणून घेऊया या पद्धती

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)

Derma suction machine

Instagram


 कोणत्याही कष्टाशिवाय तुम्हाला व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स काढायचे असतील तर  अगदी कोणत्याही मेहनतीशिवाय अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काढण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. डर्मा सक्शन मशीनचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी नक्कीच पाहिले असतील. ही मशीन वापरायला आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी फारच सोपी अशी प्रणाली आहे. या मशीनच्या टोकाला एक सक्शन पंप असते. ज्यावेळी तुम्ही मशीन सुरु करता त्यावेळी हा सक्शन पंप तुमच्या त्वचेला चिकटते. असे करताना ती तुमच्या चेहऱ्यावरील  ब्लॅकहेड्स काढण्यास मदत करते. त्वचेच्या छिद्राशी चिकटलेल्या ब्लॅकहेड्सला मुळापासून काढण्याचे काम करते. 


किंमत : हल्ली या मशीनचे वेगवेगळे प्रकार मिळतात. पण साधारण 1000 रुपयांपासून तुम्हाला यातील चांगल्या क्वालिटीचे मशीन मिळतात. 

‘या’ घरगुती वस्तूंचा करा वापर आणि मिळवा ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका (How to remove Blackheads)

Steel blackhead remover

Instagram

ब्लॅकहेड्स काढण्याची ही एक सोपी पद्धत फारच जुनी आहे. पण अनेक लोक हे वापरायला घाबरतात. जर तुम्ही याचा चुकीचा वापर करत असाल तर तुम्हाला याचा त्रास होणे अगदी साहजिक आहे. पण जर याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर हे क्लासिक टुल तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यास मदत करते. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असलेल्या ठिकाणी तुम्हाला याची मोठी बाजू घेऊन तुम्हाला काढायचे आहे. याचा वापर केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर अॅस्ट्रिजंट लावायला विसरु नका. 

किंमत : सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी ही ब्लॅकहेड्स काढण्याची सोय आहे. याची किंमत 15 ते 30 रुपये इतकीच आहे. 

अशी करा तयारी

ब्लॅकहेड्स अगदी सहज बाहेर यावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी किंवा पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. 

आता तुम्हाला ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर तुम्ही या पद्धतीही नक्की वापरुन पाहा.

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

Read More From DIY सौंदर्य