लग्न फॅशन

ब्लाउजचे डिझाईन लेहेंगा आणि साडीसाठी (Bridal Blouse Design In Marathi)

Aaditi Datar  |  Dec 9, 2019
ब्लाउजचे डिझाईन

तुमच्याकडेही लग्नाची लगबग सुरू आहे का? मग शॉपिंगची धावपळ सुरू असेलच. लग्न म्हटल्यावर वधूसाठी साडी किंवा लेहंगा शॉपिंग आलीच. बरं ही शॉपिंग एवढ्यावरच थांबते असं नाही. साडी किंवा लेहंगा खरेदी पसंत केल्यावर वधूसाठी महत्त्वाचा असतो तो त्यावरील ब्लाऊज. मग शोधाशोध सुरू होते ती त्यावर हटके आणि सुंदर अशा ब्लाऊज डिझाईनची. पण आता तुम्हाला जास्त शोधाशोध करावी लागणार नाही कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास आणि हटके ब्लाऊज डिझाईन्स जे तुमच्या ब्रायडल वेअरला देतील सुंदर लुक.

ब्लाऊज डिझाईन्सचे प्रकार (Types Of Blouse Designs)

तुम्ही एखादा छान एम्बॉयडरीचा ब्लाऊज किंवा क्लासिक ब्लाऊज शिवण्याच्या विचारात आहात का? पण लग्नाच्या निमित्ताने ज्वेलरीमध्ये कानातल्यांचे प्रकार आणि वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करून पाहण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण लग्न आणि लग्नाआधीच्या विधींना लक्षात घेतल्यास तुम्हाला किमान पाच तरी ब्लाऊज लागतीलच. मग थोडं एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे. ब्लाऊजमध्ये फिटींगनंतर सर्वात जास्त महत्त्व आहे ते बॅक डिझाईनला. पाहा ब्लाऊज बॅकमधील विविध डिझाईन्सचे प्रकार.

1. एलिगंट बॅक ब्लाऊज डिझाईन (Elegant Back Blouse Design)

जेव्हा तुम्हाला जास्त ओपन किंवा अगदी डीप नेक ब्लाऊज नको असतो तेव्हा तुम्ही या प्रकारचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. हा पॅटर्न तुम्हाला स्टाईल तर देईलच पण त्यासोबतच तुम्हाला एलिंगट लुकही देईल. तुमच्या टिपीकल लेहंग्याला मॉर्डन ट्विस्ट देण्यासाठीही तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकता.

2. इन्व्हर्टेड यू बॅक डिझाईन (Inverted U Back Design)

जर तुम्ही खास बॅक ओपन ब्लाऊज घालण्यासाठी तयारी करत असाल तर मग तसा ब्लाऊज शिवलाच पाहिजे. मग तुम्हीही हा बोल्ड यू प्रकारचा डिझाईनर अनिता डोंगरेने डिझाईन केलेला ब्लाऊज घालू शकता. खरंतर असा एक तरी ब्लाऊज नववधूच्या बॅगमध्ये असायलाच हवा. पण अशा ब्लाऊजचे स्लीव्ह्स मात्र लांबच असले पाहिजेत. ज्यामुळे ब्लाऊजचा लुक बॅलन्स होईल.

3. व्ही-शेप्ड बॅक ब्लाऊज डिझाईन (V Shaped Back Blouse Design)

‘V’ शेप लेहंगा ब्लाऊज डिझाईनने तुम्हाला स्लीमर लुक मिळेल. डीप ‘व्ही‘ शेपमधील सेक्सी डिझाईन तुमच्या पाठीला आकर्षक लुक देईल. जर तुमचा लेहंगा सिंपल पण स्टाईलिश असा असेल तर या प्रकारचा ब्लाऊज नक्की ट्राय करा.

4. नाजूक बॅक ब्लाऊज डिझाईन (Back Blouse Design)

आहे ना सुंदर आणि नाजूक. नेहमीच्या डिझाईन्सपेक्षा वेगळं असलेलं हे ब्लाऊज नेक डिझाईन आहे. असा ब्लाऊज घातल्यावर तुमचा लुक नक्कीच आकर्षक दिसेल.

5. क्लासिक यू बॅक ब्लाऊज डिझाईन (Classic U Back Blouse Design)

सिंपल आणि एलिगंट असलेलं हे नेहमीचं डिझाईन कधीही आऊटडेटेड होऊ शकत नाही. जर तुमचा लेहंगा हेवी असेल तर तुम्ही हे सिंपल डिझाईन निवडून त्याचा लुक बॅलन्स करू शकता. तसंच हे ब्लाऊज तुम्हाला इतर साड्या किंवा लेहंग्यावरही पेअर अप करता येईल. या ब्लाऊजला थोडं ग्लॅमर द्यायचं असल्यास तुम्ही हेवी लटकन लावू शकता.

6. बटन-डाऊन ब्लाऊज डिझाईन (Button Down Blouse Design)

बटन-डाऊन ब्लाऊजेसची सध्या खूपच क्रेझ आहे. पण तुम्ही याच्या बेसिक डिझाईनला टाळून असं वेगळं डिझाईन निवडू शकता. साधारणतः काठाच्या साडीचे ब्लाऊज डिझाईन (Kathachya Sadiche Blouse Design) करताना तुम्ही हा पॅटर्न करू शकता.

7. हूप्स ब्लाऊज डिझाईन (Hoops Blouse Design)

आम्हाला हा प्रकार खूपच आवडला आहे. कारण का हा प्रकार टिपीकल बटन ब्लाऊजपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे तो क्युटही वाटत आहे. अशा प्रकारच्या ब्लाऊजला तुम्ही साईड झिप लावून घालू शकता.

8. एकावर एक बॅक ब्लाऊज डिझाईन (One Back Blouse Design)

काहीजणींना ब्लाऊजला डोरी लावण्याची हौस असते. मग याला लग्न कसं अपवाद असेल. जर तुम्हालाही डोरी डिझाईन्सची आवड असेल तर तुम्ही असा ब्लाऊज लग्नासाठीही शिवून घेऊ शकता.

9. मटका बॅक ब्लाऊज डिझाईन (Matka Back Blouse Design)

हे डिझाईन एव्हरग्रीन आहे. जे तुमच्या ब्लाऊजला सेक्सी आणि स्टाईलिश असा दोन्ही लुक देईल. पण लक्षात ठेवा असा ब्लाऊज शिवताना स्लीव्ह्स नेहमी हाफ किंवा थ्री फोर्थ असाव्यात या प्रकारच्या ब्लाऊजवरही लटकन छान दिसते.

10. लेयर्ड आणि स्टडेड बॅक डिझाईन (Layered And Studded Back Design)

आजकाल बऱ्याच जणी लग्नाच्या रिसेप्शनसाठी डिझाईनर साड्यांना किंवा डायमंड वर्क असलेल्या लेहंग्याला पसंती देतात. त्यांच्यासाठी हा ब्लाऊज प्रकार परफेक्ट आहे. थोडा शिवून घ्यायला किचकट आहे. पण जर तुमचा टेलर खरेच चांगले डिझाईनर ब्लाऊज शिवत असल्यास हा प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही.

11. बॅकलेस असून बॅकलेस नसलेलं ब्लाऊज डिझाईन (Backless And Non-Backless Blouse Design)

या ब्लाऊज डिझाईनच्या प्रकाराला आय कट ब्लाऊज म्हणतात. पण हा ब्लाऊज डिझाईनचा प्रकार तुम्ही लग्नातल्या साड्यांऐवजी तुमच्या इतर साड्यांसाठी वापरू शकता. जसं मेहंदी फंक्शन किंवा हळदी फंक्शनची साडी किंवा लेहंग्यावर. हे डिझाईन साडी आणि लेहंगा दोन्हीसाठी सूटेबल आहे.

12. सिंड्रेला-कट ब्लाऊज डिझाईन (Cinderella-Cut Blouse Design)

प्रत्येक नववधू खरंतर राजकन्येसारखीच वावरत असते. मग राजकन्येसारखा ब्लाऊज शिवायला काय हरकत आहे. हे डिझाईन तुम्ही निवडल्यास तुम्हाला ओढणी घेण्याचीही गरज नाही. हे डिझाईन खूप युनिक आणि ग्रेसफुल आहे. जर तुम्हाला पारंपारिक लुक टाळून इंडो-वेस्टर्न लुक हवा असल्यास हे डिझाईन परफेक्ट आहे.

13. नाजूक कट-वर्क ब्लाऊज डिझाईन (Cut-Work Blouse Design)

जर तुम्हाला कटवर्क केलेलं ब्लाऊज हवं असल्यास हे डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. इतर ब्लाऊजपेक्षा हे डिझाईन नक्कीच हटके आणि उठावदार आहे. पण या ब्लाऊज डिझाईनसाठी टेलरकडील कारागिरही तितकाच चांगला असायला हवा.

14. एलिगंट कट-वर्क बॅक डिझाईन (Elegant Cut-Work Back Design)

अप्रतिम असं कटवर्क आणि बीड्स वर्क केलेला हा ब्लाऊज बॅक डिझाईन आहे. हे पाहिल्यावर नक्कीच आवडेल. पण हे ब्लाऊज शिवल्यावर तुम्हाला जपावंही तेवढंच लागेल. पण या डिझाईनचा चार्म काही वेगळाच आहे.

15. झुमका स्पेशल (Jhumka Special)

गेल्या एक वर्षापासून हे डिझाईन ट्रेंडमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये अनेक प्रकार तुम्हाला सध्या बाजारात रेडिमेड ब्लाऊममध्येही आरामात मिळतील. पण हे डिझाईन थोडं ओव्हरही वाटू शकतं.

16. एम्बेलिश्ड ब्लाऊज बॅक डिझाईन (Embellished Blouse Back Design)

तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजमध्ये डिझाईन आणि ज्वेलरी दोन्ही हवं असल्यास हे डिझाईन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला सिंपल डिझाईन नको असल्यास तुम्ही हे डिझाईन निवडून तुमचा ब्रायडल लुक ग्लॅमअप करू शकता.

17. क्रिसक्रॉस मॅजिक (Crisscross Magic)

हे डिझाईन तुम्हाला लग्नासाठी नाहीतर इतर फंक्शन्सच्या ब्लाऊजसाठी नक्कीच वापरता येईल. पुन्हा एकदा इथे सांगू की, हे डिझाईन शिवण्यासाठी टेलर किंवा डिझाईनरसुद्धा तेवढाच कलाकार असला पाहिजे. कारण हे डिझाईन प्रत्येक टेलरला जमेलच असं नाही.

18. एलिगंट आणि मिनीमल बॅक डिझाईन (Elegant And Minimal Back Design)

जर तुम्हाला सिंपल पण स्टनिंग बॅक डिझाईन ब्लाऊज हवा असल्यास तुम्ही हे डिझाईन निवडू शकता. हे डिझाईन एव्हरग्रीन डिझाईन्समध्ये मोडतं. तसंच यामध्ये जास्त वर्क नसल्याने ते शिवून घेणंही सोपं आहे.

19. फ्लोरल डिटेलिंग ब्लाऊज बॅक डिझाईन (Floral Detailing Blouse Back Design)

कटवर्क आणि बारीक बारीक नक्षीकाम असलेला ब्लाऊज दिसायला फारच सुंदर वाटतो. प्रत्येकाची नजर या ब्लाऊजवर खिळतेच. अशा ब्लाऊज तुम्हाला ग्लॅम दिवा लुक मिळेल. अशा प्रकारचं ब्लाऊज तुम्हाला हवं असल्यास तुम्हाला तो लवकर शिवायला टाकावा लागेल. कारण असं वर्क करायला बऱ्यापैकी वेळ लागतो.

20. कस्टमाईज्ड पैठणी ब्लाऊज डिझाईन कटिंग (Customized Paithani Blouse Design)

जर तुम्ही लग्नासाठी पैठणीला पसंती दिली असेल तर यामध्येही आता बॅक ब्लाऊज डिझाईन्सची भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. कारण आता पैठणीवर टिपीकल डिझाईनचा ब्लाऊज घालण्यापेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करायला वधू आणि डिझाईन्सर्स दोन्हीही उत्सुक असतात. 

ब्लाऊज डिझाईनमधील विविध पॅटर्न्स (Patterns In Blouse Design)

ब्लाऊजच्या बॅक डिझाईन्समधील व्हरायटी आपण पाहिली आता पाहूया ब्लाऊजच्या डिझाईन्समधील विविध पॅटर्न्स.

शिअर ब्लाऊज डिझाईन्स (Sheer Blouse Designs)

शिअर ब्लाऊज पॅटर्नने तुम्हाला क्लासी आणि स्लीक लुक मिळतो. तुम्हालाही असा लुक हवा असेल तर पाहा शिअर ब्लाऊज डिझाईन्स. 

पार्शिअल शिअर बॅक ब्लाऊज डिझाईन (Partial Sheer Back Blouse Design)

शिअर डिझाईन सेक्सी लुक मिळवण्यासाठी परफेक्ट आहे. नेट ब्लाऊज बॅक आणि त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी व बटन्सचं हे डिझाईन लग्नाला नाही पण साखरपुडा किंवा रिसेप्शनसाठी तुम्ही नक्कीच निवडू शकता. 

टोटल शिअर बॅक ब्लाऊज डिझाईन (Total Sheer Back Blouse Design)

नववधू आहे म्हटल्यावर तुम्हाला लग्नाच्या निमित्ताने बरीच सूटही असतेच. जर तुम्हालाही लग्नाच्या निमित्ताने हॉट दिसायचं असेल तर हा शिअर बॅक ब्लाऊज पॅटर्न तुमच्यासाठी आहे. या ब्लाऊजने तुम्हाला एकाच वेळी सेक्सी आणि पाठ कव्हर केलेला असा दोन्ही प्रकारे फायदेशीर आहे. ज्या ब्राईडला इतरांपेक्षा वेगळा लुक हवा असेल त्यांनी या डिझाईनला नक्की ट्राय करावं. 

शिअर केप ब्लाऊज डिझाईन (Sheer Cape Blouse Design)

शिअर म्हणजे हॉट लुक हे तर आपल्याला माहीत आहे पण त्यासोबतच असा सुंदर शिअर केप असेल तर चारचांदच. ड्रेस पॅटर्नमधील केप तुम्ही पाहिला असेल पण नेट ब्लाऊज डिझाईन पॅटर्नचा वापर तुम्ही लग्नाच्या ब्लाऊजसाठीही नक्कीच करू शकता.

डोरी ब्लाऊज डिझाईन्स (Dori Blouse Designs)

ब्लाऊजमध्ये डोरी पॅटर्न हा खूप वर्षांपासून असूनही आजही बऱ्याच डिझाईन्समध्ये आवर्जून वापरला जातो. यातही आता बरेच प्रकार आले आहेत. खरंतर एका सिंपल डोरीनेही ब्लाऊजला वेगळा लुक मिळतो. 

बेसिक डोरी डिझाईन (Basic Dori Design)

डिझाईनर अनिता डोंगरेने डिझाईन केलेलं ब्रायडल ब्लाऊज आहे. ज्या ब्राईडला जास्त शो ऑफ करायचा नसेल तर किंवा जास्त फॅशनही नको असेल त्यांना हे ऑप्शन उत्तम आहे. डीप नेक, डेलिकेट डोरी आणि शॉर्ट स्लीव्हज्स. उन्हाळ्यातील लग्नासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

टॅसल डोरी ब्लाऊज बॅक डिझाईन (Tassel Dori Blouse Back Design)

या ब्लाऊज डिझाईनची खासियत म्हणजे याचे टॅसल्स. या ब्लाऊजचा रंग आणि डोरीसोबतचे  हे फॅब्रिक टॅसल्स अगदीच हटके आहेत. डोरीसोबतच तुम्हाला आवड असल्यास तुम्ही टॅसलऐवजी पॉम पॉमचाही वापर करू शकता.

बो ब्लाऊज डिझाईन्स (Bow Blouse Design)

बो डिझाईन बघितल्या आवडणार नाही पण जर तुम्ही लेहंगा घालणार असाल किंवा तुमची रिसेप्शनची साडी डिझाईनर असेल तर त्यासाठी हे डिझाईन नक्कीच छान वाटेल. 

क्लासिक कट आऊट आणि बो डिझाईन (Classical Cut Out And Bow Design)

लेहंग्यावरील ब्लाऊजसाठी हे उत्तम डिझाईन आहे. क्लासिक कट आऊट डिझाईन आणि क्युट बो हे तुमच्या ब्लाऊजला बनवेल मास्टरपीस. 

बॅक कट आऊट ब्लाऊज (Bank Cut Out Blouse)

हे ब्लाऊज डिझाईन त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांचा ब्लाऊज कंफर्टेबल आणि फॅशनेबल असा दोन्ही हवा आहे. हा ब्लाऊज घालायला ही सिंपल आहे आणि डान्स किंवा फंक्शनसाठी कंफर्टेबलही आहे. ज्याने तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडेल. 

साईड बोज डिझाईन (Side Bows Design)

तुमच्या मेहंदी फंक्शन किंवा लग्नाच्या पार्टीसाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. तुमच्या ट्रेडीशनल आऊटफिटला या डिझाईनने थोडा हटके लुक मिळेल. असा क्रॉप टॉप स्टाईल ब्लाऊज आणि स्कर्ट तुमच्या मेहंदी फंक्शनला छान दिसेल. फक्त अशा ब्लाऊजवर बन किंवा फ्रेंच रोलसारखी हेअरस्टाईल करा. ज्यामुळे हे डिझाईन उठून दिसेल.

ऑफबीट ब्लाऊज स्टाईल्स (Offbeat Blouse Styles)

जर तुमच्या वरील सगळ्या डिझाईन्स पाहून झाल्या असतील आणि तरीही अजून नेमका कोणता पॅटर्न निवडावा हे कळत नाहीये का. मग तुम्हीही खालील ऑफबीट प्रकारांपेैकी एक निवडू शकता. यापैकी एखादं डिझाईन तुम्ही संगीत किंवा कॉकेटल्ससाठी नक्कीच पसंत कराल. 

फेदर क्रिस्टल ब्लाऊज (Feather Clouds Blouse)

अॅक्वा कलर्ड रफल्ड साडी आणि त्यावरील हा फेदर स्वरोस्की क्रिस्टल ब्लाऊज तुम्हाला एखाद्या एंजलसारखा लुक देईल. हा क्रिस्टल ब्लाऊज तुम्हाला रिसेप्शन किंवा कॉकटेल इव्हेंटला अगदी सुंदर लुक देईल. 

कॅस्केडींग स्लीव्हज्स (Cascading Sleeves)

तुम्हालाही ओढणी घेण्याचा कंटाळा आहे का, मग डिझाईनर तरूण ताहिलियानीने डिझाईन केलेल्या या ब्लाऊजला पसंती देऊ शकता. 

इंडो पर्शियन वे (Indo Persian Way)

जान्हवी कपूरने घातलेला हा सेन्शुअल लुक देणारा इंडो-पर्शियन आर्टवर्क ब्लाऊज डिझाईन केला आहे डिझाईनर मनीष मल्होत्राने. हा सिल्व्हर टोन्ड एम्ब्रॉयडरीड ब्लाऊज तुमच्या ब्लू किंवा पिंक लेहंग्यावर परफेक्ट दिसेल. 

नेकलाईन डिझाईन्स (Neckline Designs)

ब्लाऊज शिवताना आपण नेहमी बॅक डिझाईनसोबतच नेकलाईनलाही महत्त्व देत असतो. नेकलाईनचं फिटींगही ब्लाऊजसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेकलाईनही विशेषतः बघून निवडा. 

बोल्ड व्ही नेक ब्लाऊज डिझाईन्स (Bold V Neck Blouse Designs)

परफेक्ट व्ही-नेक ब्लाऊज हा शिवून मिळणं आणि तो कॅरी करणं हे दोन्हीही कठीणचं. जर तुम्हालाही व्ही नेक ब्लाऊज शिवायचा असेल तर हे डिझाईन नक्की पाहा. या ब्लाऊज डिझाईनमध्ये टॅसल्सही तुम्ही लावून घेऊ शकता. 

प्लंजिग नेकलाईन ब्लाऊज डिझाईन (Plunging Neckline Blouse Design)

या स्टाईलने तुमची कॉलरबोन हायलाईट होईल आणि तुमचा नेकलेसही उठून दिसेल. त्यातल्या त्यात बीटल लीफ कर्व्ह असेल तर अजूनच छान दिसेल. 

शिअर डीप प्लंजिग नेकलाईन (Sheer Deep Plunging Neckline)

मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला हा ब्लाऊज तुम्हाला देईल स्टनिंग लुक. सध्या बॉलीवूडमधील बेबोपासून ते सोनाक्षीपर्यंत सर्व अभिनेत्री ही नेकलाईन मिरवताना दिसतात.

स्लीव्ह्स स्टाईल्स (Sleeves Styles)

ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये स्लीव्ह्सनेही खूप फरक पडतो. त्यामुळे ब्लाऊज शिवून घेताना स्लीव्ह्सजही तेवढेच महत्त्वाचे आहेत.  

फ्लोटी स्लीव्ह्स ब्लाऊज डिझाईन (Floaty Sleeves Blouse Design)

जर तुम्हाला आवड असेल तर असे फ्लोटी स्लीव्ह्स तुम्ही ब्लाऊज डिझाईनसाठी निवडू शकता. जर तुम्ही बारीक असाल तर हा पॅटर्न तुमच्यावर नक्कीच छान दिसेल. 

नेट फुल स्लीव्हज्स (Net Full Sleeves)

फुल स्लीव्हज्सने ब्लाऊजला एक वेगळाच ग्रेसफुल लुक येतो. जर तुमचं लग्न हिवाळ्यात असेल तर तुम्ही या ब्लाऊजची निवड नक्कीच करा. तुम्ही या नेट स्लीव्हज्समध्ये पॅच वर्कही करू घेऊ शकता. यामुळे हे ब्लाऊज अजूनच सुंदर दिसेल. 

द मॉडर्न केप स्लीव्हज्स (The Modern Cape Sleeves)

जर तुम्हीही मॉडर्न ब्राईड असाल तर हे डिझाईन तुमच्यासाठीच आहे. जर तुमचा ब्लाऊज स्लीव्हलेस किंवा ऑफ शॉल्डर असेल तर त्यावर तुम्ही केपचं ऑप्शन ठेऊ शकता. यामुळे तुमचा लुक ट्रेंडीही वाटेल आणि लेहंग्यावरील दुपट्टाही कॅरी करावा लागणार नाही.

ऑफ-शोल्डर ब्लाऊजेस (Off-Shoulder Blouses)

सध्या ऑफ शोल्डर ब्लाऊजेस ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी खालीलपैकी डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. 

सेन्शुअल ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन (Sensual Off Shoulder Blouse Design)

आदिती रावसारखा लुक तुम्हालाही हवा असेल तर तुम्हीही हे डिझाईन निवडा. तुम्हीही मिनिमल लुकसाठी आदितीसारखा बनारसी लेहंगा निवडू शकता. 

डिझाईनर ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन (Designer Off Shoulder Blouse Design)

मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला ब्लाऊज आहे. ज्याचं स्लीव्ह पॅटर्न खूपच युनिक आहे. जो घातल्यावर तुमच्याकडे सगळ्यांची नजर वळेलच. यावर केलेलं वर्क हे तर खूपच सुंदर आहे. 

ब्युटीफुल ब्रोकेड (Beautiful Brocade)

ट्यूब ब्लाऊज नेहमीच सुंदर दिसतात. त्यातही असा हेवी ब्रोकेड ट्यूब ब्लाऊज असेल तर अप्रतिमच. असा ब्लाऊज तुम्ही मेहंदी फंक्शनसाठी निवडू शकता. जर तुम्हाला हा खूप ओपन वाटला तर त्यावर तुम्ही कॅपचं ऑप्शन ठेवू शकता. 

ऑफ द शोल्डर ग्लॅम (Off The Shoulder Glam)

ऑफ शोल्डर ब्लाऊज हे कोणत्याही वेळी घातले तरी ते ग्लॅमरसचं वाटतात. जर तुम्ही कंफर्टेबल असाल तर असा ब्लाऊज तुम्ही रिसेप्शनसाठी निवडू शकता. फक्त असा ब्लाऊज शिवताना एक काळजी घ्या की, याचे स्लीव्ह्स जास्त ओघळते नसावेत.

ब्लाऊज शिवून घेताना या चुका टाळा (Avoid Mistakes While Sewing A Blouse)

आता तुमच्याकडे साडी आणि लेहंग्यावर ब्लाऊज शिवण्यासाठी भरपूर डिझाईन्सची लिस्ट तर आहेच. पण फक्त डिझाईन मिळालं की, काम संपतं असं नाही. त्या ब्लाऊजचं फिटींग आणि स्टिचिंगही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण हा तुमच्या लग्नाच्या साडीवरचा किंवा लेहंग्यावरचा ब्लाऊज असणार आहे. त्यामुळे तो परफेक्ट असलाच पाहिजे. फक्त परफेक्ट लेहंगा असेल पण ब्लाऊज चांगला नसेल तर काय उपयोग? मग ब्लाऊज शिवून घेताना पुढील चुका नक्की टाळा.

1. स्लीव्ह्सची लांबी (Length Of The Sleeves)

ब्लाऊजच्या स्लीव्ह्सची लांबी तुमच्या लग्नाच्या लुकमध्ये खूप महत्त्वाची आहे. 3/4th लांबीचा ब्लाऊज किंवा कोपरापर्यंत लांब असलेल्या स्लीव्ह्स दिसायला छान वाटतात. पण त्यावर भरपूर बांगड्या आणि मेहंदी असेल तर हे खूपच जास्त वाटतं. त्यामुळे ब्लाऊज शिवताना या गोष्टींचा विचारही नक्की करा.

2. एम्ब्रॉयडरी करून घेताना… (Embroidery)

ही खूप कॉमन चूक आपल्या सगळ्यांकडून होते. त्यामुळे लग्नाचा ब्लाऊज शिवायला देताना टेलरला आवर्जून सांगा की, तुमच्या ब्लाऊजवरील एम्ब्रॉयडरी काखेपर्यंत येता कामा नये. कारण जेव्हा तुम्हाला लग्नात घाम येतो तेव्हा ती एम्ब्रॉयडरी बोचू शकते किंवा त्यामुळे रॅशही येऊ शकते. जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर ब्लाऊज शिवायला टाकताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या.

3. हे नक्की टाळा (Avoid This)

जर तुम्ही शिफॉन किंवा क्रेपची साडी किंवा दुपट्टा घालणार असाल तर त्यावर भरपूर सिक्वीन किंवा एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाऊज घालू नका. कारण तुमच्या ब्लाऊजवरील हेवी वर्क त्या साडी किंवा दुपट्ट्यात अडकू शकतं. त्यामुळे चंदेरी, ब्रोकेड किंवा कांजीवरम फॅब्रिक ब्लाऊजसाठी निवडू शकता. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लुकही मिळेल आणि ते तुमच्या साडीत किंवा दुपट्ट्यात अडकणारही नाही.

4. बटणांऐवजी झिप (Zip Instead Of Buttons)

तुम्ही लग्नाच्या ब्लाऊजला बटणांऐवजी झिप लावून घ्या. ही झिप ब्लाऊजच्या एका साईडला लावा. जी छानही दिसते. तुम्ही जास्त जेवल्यावरही असा ब्लाऊज घट्ट होऊ शकत नाही. तसंच हे बटण कशात अडकही नाही.

5. हाय नेक आणि ज्वेलरी (High Neck And Jewellery)

जर तुमचा ब्लाऊज हायनेक किंवा हाय कॉलर डिझाईनचा शिवणाच्या विचारात असाल तर ते टाळा. कारण हायनेकच्या ब्लाऊजवर ज्वेलरी चांगली दिसत नाही. त्यामुळे इतर वेळी आवडत नसली तरी लग्नासाठी मात्र थोडा डीप नेकचा ब्लाऊज नक्की शिवा. तसंही दागिने घातल्यावर डीप नेक झाकला जाईलच.

6. पॅडेड ब्लाऊजचं फिटींग (Padded Blouse Fitting)

पॅडेड ब्लाऊजमुळे तुमच्या ब्रेस्टला छान शेप मिळतो. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पॅड्स व्यवस्थित फिट असतील. तसंच ते पॅड्स जास्त जाड किंवा जास्त पातळही नसावेत. हे ब्लाऊज शिवण्याआधी नक्की चेक करा.

आता तुम्हाला ब्रायडल ब्लाऊज भरपूर माहिती मिळाली आहे. त्यामुळे लग्नाचा किंवा रिसेप्शनचा ब्लाऊज शिवताना व्यवस्थित डिझाईन आणि पॅटर्न निवडा. मग पाहा तुमचा वेडिंग लुक नक्कीच परफेक्ट होईल. 

हेही वाचा –

नववधूवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स

लग्नासाठी खास ब्रायडल एंट्री आयडियाज

मुंबईतील ‘या’ लई भारी बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात करा लग्न

Read More From लग्न फॅशन