DIY फॅशन

पोल्की ज्वेलरी म्हणजे काय, जाणून घ्या वेगळेपणा

Dipali Naphade  |  Feb 20, 2022
know-all-about-polki-jewellery

रियल आणि रिगल टचवाली पोल्की ज्वेलरी (Polki Jewellery) दिसायला अत्यंत सुंदर दिसते. आपल्याकडे महिलांना दागिने घालण्याची खूपच आवड असते आणि नेहमी तेच तेच दागिने घालण्याचा कंटाळा नक्कीच येतो. तर सध्या नवरीसाठी काही खास आणि वेगळे दागिने हवे असतील तर तुम्ही पोल्की दागिन्यांचा नक्कीच विचार करू शकता. केवळ नवरीच्या लेहंगा अथवा, कांजिवरम वा पैठणी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांवरच नाही तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी या दागिन्यांची स्टाईल करू शकता. मुघलांकडून भारतात आलेले हे पोल्की डिझाईन तसे तर अत्यंत जुने आहे. हे डिझाईन मुघलांकडून आले असले तरीही भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा एक समृद्ध भाग बनले आहे. अनफिनिश्ड नैसर्गिक हिरे (unfinished natural diamonds) आणि कच्च्या स्वरूपातील खड्यांनी (raw form stones) हे सुंदर दागिने बनविण्यात येतात. लग्नासाठी असा पोल्की दागिन्यांचा सेट खूपच आकर्षक आणि उठावदार दिसतो. नवरीचा वेडिंग लुक अधिक छान दिसतो. पण अनेकदा याची किंमत आणि ओळख लोकांना कळत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पोल्की आणि कुंदन सारखाच वाटतो. पण कुंदन आणि पोल्की यामध्ये बराच फरक आहे. सर्वात मोठा फरक म्हणजे पोल्की हा मुघलांद्वारे प्राप्त झाला असून कुंदन हे राजस्थानी दागिने आहेत. पोल्की दागिन्यांबाबत आपण अधिक जाणून घेऊया. 

काय आहे पोल्की दागिने (What is Polki Jewellery)

पोल्की दागिन्यांमध्ये असे काय विशेष आहे जे याला अधिक आकर्षक आणि सुंदर बनवतात? तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, पोल्की दागिने हे हिऱ्यांपासून तयार करण्यात येतात आणि हे हँडक्राफ्टेड असतात. पोल्कीमध्ये जे खडे (Stone) वापरण्यात येतात, त्यांना पोल्की स्टोन्स असं म्हणतात. वास्तविक हे हिरे अनकट, अनफिनिश्ड असतात, जे सरळ हिऱ्यांच्या खाणीतून आणले जातात आणि वापरण्यात येतात. हे हिरे नैसर्गिक स्वरूपात वापरण्यात येतात आणि त्यामुळेच पोल्की दागिन्यांना एक वेगळा साज येतो. या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न्स असतात, जे नवरीला अधिक आकर्षक आणि सुंदर बनवतात. 

कशी बनवतात पोल्की ज्वेलरी? (How to make Polki Jewellery) 

जसं आम्ही तुम्हाला वर सांगितलं की, पोल्की दागिन्यांचे सेट्स हे खास असतात, यामध्ये वापरण्यात आलेले हिरे हे अनकट असतात. हे पोल्की स्टोन्स लाख आणि शुद्ध सोन्याच्या पन्नीचा उपयोग करून सोन्याच्या दागिन्यांमध्ये सेट केले जातात. सोन्याची पन्न पोल्की स्टोन्ससह ठेवण्यात येते आणि त्याला आपल्या डिझाईन्सनुसार आकार देण्यात येतो. कधी कधी यामध्ये रूबी, सफायर अर्थात नीलम, पाचू आणि जेमस्टोन्सदेखील लावण्यात येतात. हे खडे पोल्की डिझाईन्स वेगळे बनवतात आणि दागिन्यांना एक क्लासी लुक मिळवून देतात.  

जडलेले पोल्की दागिने म्हणजे काय?

आपल्यापैकी अधिकाधिक महिला या जडलेल्या दागिन्यांना पोल्की अथवा कुंदनप्रमाणे वेगळे दागिने समजून जातात. पण हे चुकीचे आहे. जडाऊ पोल्की एक वेगळे तंत्र आहे. याला इंग्रेव्ड ज्वेलरी मेकिंग असंही म्हटलं जातं. मुघल काळापासून राजस्थान आणि गुजरात क्षेत्रामध्ये याचा अधिकाधिक उपयोग करण्यात येतो. जडाऊ पोल्की दागिन्यांसाठी अत्याधिक कुशल कामगारांची आवश्यकता भासते. कारण हे दागिने बनविण्यासाठी बरीच कारागिरी करण्याची गरज अशते. यामध्ये नाजूक डिझाईन्स आणि पॅटर्नचा समावेश असतो. त्यामुळे हे दागिने बनविण्यासाठी खूप वेळ लागतो.  

पोल्की आणि कुंदनमधील फरक (Difference between Polki and Kundan)

बऱ्याचदा अनेकांना कुंदन आणि पोल्की हे सारखेच दिसतात. पण या दोघांमध्ये बराच फरक आहे. असं म्हटलं जातं की, पोल्कीचा शोध हा राजस्थानच्या शाही दरबारात झाला आणि याचा विकास नंतर मुघलांच्या काळात झाला. पोल्की आणि कुंदन डिझाईन सारखे दिसतात पण हे बनविण्याचे तंत्र मात्र वेगळे आहे. कुंदन दागिने बनविण्यासाठी अत्यंत लक्षपूर्वकतेची आवश्यकता असते. तर कुंदन दागिन्यांचा बेस हा सोन्याच्या स्ट्राईप्सना रगडून बनविण्यात येतो आणि मग त्याला आकार देण्यात येतो. तसंच कुंदन दागिन्यांमध्ये सोन्याचा जास्त वापर होत नाही. याची किंमत त्यातील महाग मोती, खडे आणि अन्य मेटलमुळे अधिक वाढते. तर पोल्की दागिने हे हिरे आणि अन्य खड्यांपासून तयार करण्यात येतात. 

कशी घ्यावी पोल्की दागिन्यांची काळजी 

पोल्की, कुंदन आणि अन्य दागिने हे आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आहेत. तुम्हीही तुमच्या लग्नासाठी या पोल्की दागिन्यांचा नक्कीच विचार करू शकता. हे दागिने तुम्हाला एक वेगळा रॉयल आणि एलिगंट लुक देतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन