DIY सौंदर्य

बॉलीवूड अभिनेत्री ज्या आजही सौंदर्यांसाठी करतात आयुर्वेदिक उपचार

Trupti Paradkar  |  Mar 19, 2021
बॉलीवूड अभिनेत्री ज्या आजही सौंदर्यांसाठी करतात आयुर्वेदिक उपचार

बॉलीवूडच्या अभिनेत्रींना सतत सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे त्या त्यांच्या सौंदर्याबाबत नेहमीच जागरूक असताना दिसतात. आजकाल बाजारात महिलांना चिरतरूण ठेवणाऱ्या अनेक महागड्या ब्युटी ट्रीटमेंट आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. मात्र तरीही बॉलीवूडच्या या ललना त्यांच्या सौंदर्यासाठी प्राचीन आयुर्वेदिक उपचारांची मदत घेतात. अशा अनेक बॉलीवूड अभिनेत्री आहेत ज्या पारंपरिक आणि जुने घरगुती उपचार घेवून स्वतःचं सौंदर्य जपतात.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचे आयुर्वेद  आणि योगा या थेरपीवर खूप प्रेम आणि विश्वास आहे. ती नियमित योगा  करते आणि सौंदर्य खुलवण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची मदत घेते. ज्यामुळे तिची त्वचा नेहमीच नैसर्गिक पद्धतीने ग्लो करत असते. शिल्पाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहमीच तिच्या चाहत्यांना या योगा आणि आयुर्वेद बाबतच्या टिप्स देताना दिसते. थोडक्यात शिल्पाच्या सौंदर्याचे रहस्य आयुर्वेदिक उपचारांमध्ये दडलेले आहे.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्ये स्वतःचं एक स्थान प्रेक्षकांच्या मनात केलेलं आहे. मात्र अमेरिकेत निकजोनससोबत राहणारी प्रियांका आजही आर्युर्वेदिक आणि घरगुती सौंदर्योपचार घेते. प्रियांकाच्या मते ती यासाठी दही, ओटमील, हळद आणि कोमट पाण्याने तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावते. कारण या उपचारामुळे तिची त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि नॅचरल लुक मिळतो. प्रियांकाचा नॅचरल थेरपी वर विश्वास आहे. ज्यामुळे आयुर्वेद हा तिच्या जीवनाचा एक भागच आहे. ती नेहमी आयुर्वेदिक नियम पाळण्याचा प्रयत्न करताना दिसते.

ऐश्वर्या रॉय बच्चन –

विश्व सुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चनचे चाहते जगभरात आहेत. कायम चिरतरूण आणि सुंदर दिसण्यासाठी ऐश्वर्या खूप मेहनत घेताना दिसते. तिच्या मते ती यासाठी आयुर्वेद आणि घरगुती उपचारांवर जास्त विश्वास ठेवते. चेहऱ्यासाठी ऐश्वर्या बेसन आणि हळदीचा मास्कही वापरते. कारण हा फेसमास्क अतिशय प्राचीन आणि पारंपरिक आहे. हा मास्क आपल्या आई, आजीच्या पिढीनेही वापरला  आहे. शिवाय यासोबतच ती योग्य आहार आणि व्यायाम याचीही मदत घेते. ज्यामुळे आजही ऐश्वर्या अनेकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवू शकते. 

आलिया भट –

आलिया भट ही सध्या बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री ठरत आहे. कमी वयातच तिने तिचे सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान मिळवलं आहे. आलियाच्या मते  ती फिट आणि सुंदर दिसण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेते. आयुर्वेदिक नियम जीवनात पाळले आणि या प्राचीन चिकित्सा पद्धतीचा अवलंब केला तर तुम्ही कायम सुंदर आणि फिट दिसाल असं तिला वाटतं. मानसिक स्वास्थासाठी ती सुर्यप्रकाशात राहणं पसंत करते. कारण यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात प्राणवायु मिळतो. यासोबत नियमित फळं खाण्यामुळेही तिची त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. तिच्या मते यासाठी सीझनल फळे नियमित खावी. आयुर्वेदानुसार जगणं म्हणजे चिरतरूण राहण्याचा सोपा मार्ग आहे असं तिला वाटतं. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम 

अधिक वाचा –

अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा पार्टी मेकअप तुम्हाला करेल ‘बोल्ड’

साठीतही डिंपल कपाडियाचे केस आहेत बाऊंसी, अशी घेते काळजी

Read More From DIY सौंदर्य