Planning

तुमचं लग्न ठरलं आहे का, मग फॉलो करा हे ‘ब्रायडल ब्युटी केअर रूटीन’ Bridal Beauty Routine

Trupti Paradkar  |  Oct 9, 2019
तुमचं लग्न ठरलं आहे का, मग फॉलो करा हे ‘ब्रायडल ब्युटी केअर रूटीन’ Bridal Beauty Routine

लग्नसोहळा हा प्रत्येकासाठी खास असतो. सहाजिकच आपण आपल्या लग्नाच्या दिवशी सर्वात स्पेशल दिसावं असं प्रत्येकीला वाटत असतं. लग्नात तुमचा पेहराव आणि मेकअप यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लुक नक्कीच करू शकता. पण लग्नाचे विधी हे कमीत कमी चार ते पाच दिवस असतात. लग्नाआधी अथवा नंतर केल्या जाण्याऱ्या सर्वच विधींमध्ये तुम्ही मेकअप करू शकत नाही. अशावेळी तुमचे नैसर्गिक सौंदर्यच अधिक खुलून दिसतं.  पण असा नैसर्गिक ग्लो हवा असेल तर यासाठी कमीत कमी सहा महिने आधीपासून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नववधूचं रुप खुलून दिसण्यासाठी काही ब्रायडल ब्युटी केअर रूटीन फॉलो केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच या टिप्स नक्कीच वाचा. 

Shutterstock

त्वचेची काळजी रूटीन (Skin Care Routine)

जर तुम्ही याआधी तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणतंही स्कीन केअर फॉलो करत नसाल तर आता तुम्ही ते करायलाच हवं. यासाठी दररोज सकाळी आणि रात्री झोपताना तुमची त्वचा क्लिंझिंग, टोनिंग, मॉश्चराईझ करायला मुळीच विसरू नका. याशिवाय महिन्यातून एकदा तुमच्या त्वचेवर सूट होईल अशी स्कीन ट्रिटमेंट सुद्धा घ्या. नियमित काळजी घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी अगदी सुंदर आणि आकर्षक दिसाल.  त्वचेवर नैसर्गिक उपचार करण्यासाठी मुलतानी माती अथवा चंदन पावडरचा फेसपॅक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्वचा क्लीन करण्यासाठी गुलाबपाणी अथवा कच्चे दूध तुम्ही वापरू शकता. त्वचा मॉश्चराईझ करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज आठ तास पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल. 

तसेच ब्राइडल एन्ट्री गाण्याबद्दल वाचा

केसांची काळजी रूटीन (Hair Care Routine)

लग्नात विविध विधींसाठी निरनिराळ्या हेअर स्टाईल तुम्हाला कराव्या लागतात. सहाजिकच अशावेळी तुमचे केस मजबूत आणि दाट असतील तर त्या तुम्हाला नक्कीच सुट होतात. शिवाय हेअर ट्रिटमेंटमुळे केस खराब देखील कमी प्रमाणात होतात. यासाठी काही महिने आधीपासूनच केसांची काळजी घेण्यास सुरूवात करा. नियमित हेअर ऑयलिंग, स्पा, शॅंम्पू, कंडिश्नर करून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. 

हाता-पायाची निगा (Hands And Feet Care)

लग्नात हात आणि पायांवर मेंदी काढली जाते. यासाठी तुमचे हात आणि पायदेखील तितकेच आकर्षक दिसणं गरजेचं  आहे. नियमित मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून तुम्ही हात काळजी घेऊ शकता. घरच्या घरी हात-पायांची निगा राखण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ आणि एक-दोन थेंब लव्हेंडर ऑईल टाकून त्यात हात पाय बुडवून ठेवू शकता. दररोज रात्री आणि सकाळी हातापायांना मॉश्चराईझर लावून तुम्ही स्कीन केअर घेऊ शकता. 

Also Read About Makeup Kit In Marathi

 

नखांची काळजी (Nail Care)

नखं जितकी सुंदर दिसतात तितकंच तुमचे हात सुंदर दिसतात. यासाठी नेलपेंट काढल्यावर रात्री झोपताना नखांना ट्री ट्री ऑईल लावून तुम्ही त्यांची निगा राखू शकता. शिवाय नखांची काळजी घेण्यासाठी नखांचं वरचेवर स्पादेखील करून घ्या. ज्यामुळे तुमच्या नखांचं आरोग्य चांगलं राहील. 

ब्रायडल मेकअपमध्ये सर्वात जास्त भर दिला जातो तो म्हणजे तुमच्या आयमेकअपवर. त्यामुळे लग्नाआधी तुमचे डोळे सुंदर आणि  निरोगी असायला हवे. जर वधूला डार्क सर्कल्स, पफी आईज अशा समस्या असतील तर लग्नानंतर मेकअप काढल्यावर तुमचा लूक अगदीच खराब दिसेल. यासाठीच नैसर्गिक पद्धतीने डोळ्यांची काळजी घ्या. ज्यामुळे तुम्ही लग्नाआधी आणि नंतरही सुंदर दिसाल. यासाठी नियमित आठ तासांची झोप घ्या. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा 

परफ्युमचे होणारे दुष्परिणाम (Side Effects Of Perfume In Marathi)

WeddingSpecial : लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स

मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट

नववधूवर खुलून दिसतील बाजूबंदच्या या ’15’ डिझाईन्स

Read More From Planning