गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. गणपतीच्या शुभेच्छा मिळायला सुरूवात होण्याआधी सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने अगदी फुलून गेल्या आहेत. मात्र बाजारात मिळणारं सजावटीचं सामान पर्यावरणाला पूरक आणि पोषक असेलच असे नाही. या वर्षी तुम्हाला बाप्पाच्या स्वागतासाठी स्वतःच इकोफ्रेन्डली सजावट करायची ईच्छा असेल तर आम्ही दिलेल्या या कलाकृती तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत. घरातील सजावटीचं साधं-सुधं आणि पर्यावरण पूरक-पोषक सामान वापरून तुम्ही ही सजावट करू शकता. कलाकृती Fevicryl तज्ज्ञांनी सूचवलेल्या आहेत. या कलाकृती लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही तयार करू शकतं. शिवाय त्या अगदी घरच्या घरी करण्यासारख्या सोप्या आणि आकर्षक आहेत. शिवाय या घरगुती गणेशोत्सवासाठी खास तयार करण्यात आलेल्या आहेत. तेव्हा यंदाचा गणेशोत्सव साजरा करा स्वतः तयार केलेल्या या इकोफ्रेन्डली सजावटीने…
कलाकृती नं 1 – कार्डबोर्ड रोल्स सजावट
घरच्या घरी गणपती बाप्पासाठी सजावट करताना हे डेकोरेशन तुम्हाला नक्कीच आवडेल. कार्डबोर्डपासून तयार करण्यात येणारी सजावट तुम्ही स्वतःच्या हाताने अगदी सहज तयार करू शकता.
कलाकृती रंगवण्यासाठी उत्पादन- Acrylic अक्रेलिक रंग क्रिमसन 04, लेमन यलो 11, ऑरेंज 17, व्हाइट 27, सेरुलियन ब्लू 32, थ्री डी आउटलायनर ग्लिटर गोल्ड 401, फॅब्रिक ग्लू, फाइन आर्ट ब्रशेस
साहित्य – कार्ड बोर्ड रोल्स, पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे
सजावट करण्याची कृती –
स्टेप 1 – रोल्स तयार करा
गणपतीच्या मूर्तीसाठी पार्श्वभूमीची सजावट म्हणून टोटेम पोल तयार करण्यासाठी मोठे कार्ड बोर्ड रोल्स घ्या.
स्टेप 2 – बेसकोट रंगवा
- रोल्सवर हॅकसॉ ब्लेडने खूणा करून कापा – 14 इंचांचे 2 रोल्स, 18 इंचांचे 2 रोल्स, 20 इंचांचे 2 रोल्स आणि 24 इंची
- एक रोल अंदाजे आकारात घ्या. आपण 7 रोल्स घेतले आहेत.
- मुख्य चित्राचा संदर्भ घ्या.
- रोल्सला अक्रेलिक कलर व्हाइट 27 चा बेस कोट पेंट करा.
- सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 3 – पॅर्टन रंगवा
- रोल्स टोटम पोल्सवर आदिवासी डिझान्ससारखे काही भूमितीय पॅटर्न, लाटांप्रमाणे रेषा आणि मोसाइक पॅटर्न्स काढा.
- डिझाइन अक्रेलिक रंग क्रिमसन 04, लेमन यलो 11, ऑरेंज 17, व्हाइट 27, सेरुलियन ब्लू 32 ने रंगवा.
- सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 4 – डिझाइन आणखी सुशोभित करणे
- थ्री डी आउटलायनर ग्लिटर गोल्ड 401 ने डिझाइन आणखी सुशोभित करा.
- सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 5 – बेस बनवणे आणि जुळणी करणे
- 16 x 20 इंची आकाराचा कॅनव्हास बोर्ड घेऊन टोटेम पोल्ससाठी बेस बनवा.
- अक्रेलिक रंग क्रिमसन 04, लेमन यलो 11, ऑरेंज 17, व्हाइट 27, सेरुलियन ब्लू 32 आणि थ्री डी आउटलायनर ग्लिटर गोल्ड 401 ने त्यावर समान भौमितिक डिझाइन काढा आणि रंगवा.
- सुकण्यासाठी ठेवा.
- रंगवलेले कार्डबोर्ड रोल्स टोटेम पोल्स बेसवर अर्धवर्तुळाकार पद्धतीने फॅब्रिक ग्लु वापरून चिकटवा. सुकण्यासाठी ठेवा.
- तुमची टोटेम पोल सजावट तयार आहे.
वाचा – श्री गणेशाची अर्थासह आधुनिक 25 नावे
कलाकृती नं 2 – कमळांच्या फुलांची सजावट
क्राफ्ट प्रकार- युनिक क्राफ्ट प्रकार
या गणेशोत्सवाला अशा प्रकारचे कमळाचे लटकन तयार करून सजावट करा. बाप्पाच्या दर्शनासाठी येणारी पाहुणेमंडळी तुमचं कौतुक करता करता थांबणार नाहीत.
कलाकृती रंगवण्यासाठी उत्पादन – अक्रेलिक रंग निऑन पिंक 018, अक्रेलिक कलर्स पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फॅब्रिक ग्लू, फाइन आर्ट ब्रशेस
साहित्य – माउंट बोर्ड, पांढरा कागद, पिवळा कार्बन कागद, पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, पेपर कटर, कात्री, जाड सोनेरी धागा, प्लॅस्टिकचे मणी (गुलाबी, मेटॅलिक निळा)
कृती –
स्टेप 1 – कमळाचे कटआउट्स बनवा.
गणेशोत्सवासाठी आपण कमळाच्या फुलांची सजावट बनवणार आहोत.
ए फोर आकाराचा पांढरा कगद घ्या व त्यावर कमळाच्या फुलाचे चित्र कट वर्क पेटल डिझाइनसह काढा.
कमळाचे फुल आउटलाइनवरून पेपर कटरच्या सहाय्याने कापून घ्या.
सजावटीसाठी 6 मोठी, 3 मध्यम आणि 3 लहान फुले बनवा.
स्टेप 2- आतील भाग कापून घ्या
कमळाच्या फुलाचा आतील भाग पेपर कटरने कापा.
चित्राचा संदर्भ घ्या
स्टेप 3 – पार्श्वभूमी कापून व रंगवून घ्या.
माउंट बोर्ड घ्या.
तीन वेगवेगळ्या आकारांत कमळाची एकसारखी आउटलाइन बनवा.
अक्रेलिक रंग निऑन पिंक 018 ने कमळफुले रंगवा.
सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 4 – फुलांची जुळवणी करा
कमळ फुलांचे कटवर्क घेऊन ते अक्रेलिक रंग पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवाय
सर्व फुले एकाच रंगछटेत रंगवाय
मागील बाजूच्या कर्टवर्क फुलावर गुलाबी पिंक कट आउट्स फॅब्रिक ग्लुने चिकटवा.
सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 5 – फुलांचे लटकन तयार करणे
जाड सोनेरी धागा, मेटॅलिक ब्लू प्लॅस्टिक बीड्स घेऊन मण्यांची माळ बनवा.
कमळ फुलांच्या दोन्ही टोकांना भोक पाडून त्यावर मण्यांची माळ जोडा.
पर्यावरणस्नेही कमळ फुलांची सजावट गणेशोत्सवासाठी तयार आहे.
कलाकृती नं 3 – निऑन मंडळ सजावट
क्राफ्ट प्रकार – फॅब्रिक पेंटिंग
सजावट जितकी आकर्षक, तितका गणपती घरी आणण्याचा उत्साह वाढतो. ही निऑन मंडळे सुंदर आहेत, शिवाय सजावटीला उत्साहवर्धक लूक देतात. तुम्ही स्वतःच आजमावून पाहा ही सजावट.
कलाकृती रंगवण्यासाठी उत्पादन – फेव्हिक्रिल निऑन रंग, फॅब्रिक रंग टियल ब्लू २६८, अल्ट्रा व्हायलेट २६९, अल्ट्रामरीन ब्लू २२३, अक्रेलिक व्हायलेट, फॅब्रिक ग्लू, फाइन आर्ट ब्रशेस
साहित्य – पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, ए फोर कागद, पिवळा कार्बन कागद, फाइल दोन मीटर पॉप्लिन फॅब्रिक,
राउंडर, सुई, धागा, एम्ब्रॉयडरी रिंग्ज
कृती –
स्टेप 1- डिझाइन अक्रेलिर रंग प्रुशियन ब्लू १९, अक्रेलिक निऑन यलो ०११, ग्रीन ०१२, ऑरेंज ०१७ आणि पिंक ०१८ ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवा.
स्टेप 2 – फॅब्रिक रंग आणि निऑन रंगांनी चित्रात दाखवल्याप्रमाणे मंडलाकार रंगवा. सर्व पाच मंडले रंगवा आणि सुकण्यासाठी ठरवा.
स्टेप 3 – रिंग्ज अक्रेलिक रंग व्हायलेटने रंगवा. सुकण्यासाठी ठएवा. रंगवलेले फॅब्रिक रिंगवर लावा आणि फॅब्रिक ग्लू किंवा सुईदोऱ्याच्या मदतीने जास्तीचे कापड पाठीमागे व्यवस्थित लावून घ्या.
स्टेप 4- गणपती मूर्तीच्या पाठीमागे हबी मंडले चिकटवा किंवा टांगा. रंगीबेरंगी मंडल सजावट तयार आहे.
आम्ही सूचवलेल्या या सजावटीसाठी कलाकृती तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या तुम्ही तयार केल्या का हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या बाप्पाची सजावट आम्हाला तुम्ही सेल्फी काढून पाठवू शकता. तसंच बाप्पा विसर्जनानंतर गणपती बाप्पा विसर्जन कोट्स तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता.
अधिक वाचा
गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar