चारोळी (Cuddapah Almond) आरोग्य आणि सौंदर्य अशा दोन्ही साठी अतिशय उपयुक्त आहे. चारोळीला हिंदीत चिरौंजी असं म्हणतात. चारोळी नियमित सेवन केल्यास शरीराला ताकद मिळते, अपचनाच्या समस्या कमी होतात, कारण चारोळी मध्ये व्हिटॅमिन सी, बी 1, व्हिटॅमिन बी 2 असते. चारोळी च्या झाडाची फळं, बिया, फुले, फळे, खोड, तेल आणि डिंक सर्व काही औषधी आहे. सुकामेव्यामध्ये चारोळीचा समावेश केला जातो. चारोळी खाणं शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं. पण एवढंच नाही तर चारोळीचा फेसपॅक लावण्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर होतात एवढंच नाही तर यामुळे तुमचे त्वचा विकारही बरे करता येऊ शकतात. चारोळी गुलाब पाण्यात मिसळून त्याचा फेसपॅक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. यासाठीच जाणून घ्या चारोळीचे फायदे
चारोळीचे त्वचेवर होणारे फायदे –
चारोळीचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात, अगदी त्याचप्रमाणे चारोळी तुमच्या त्वचेसाठीही खूप उपयुक्त आहे.
- चारोळीमुळे तुमच्या त्वचा हायड्रेट राहते ज्यामुळे ती मऊ होते
- त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात
- त्वचेवरील पिंपल्स कमी होतात
- त्वचेवरील डाग आणि टॅनिनच्या खुणा कमी होतात
- त्वचेवर नैसर्गिक चमक येते
- गालावर गुलाबी छटा येतात
- डेड स्किन निघून जाते
- त्वचेचं झालेलं नुकसान भरून निघतं
- चारोळीतील घटकांमुळे त्वचेचं योग्य पोषण होतं
- त्वचेवरील जुनाट डाग आणि व्रण कमी होतात
तेलकट त्वचेसाठी चारोळीचा फेसपॅक –
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या चेहऱ्यावर या फेसपॅकचा नक्कीच चांगला फायदा होईल
साहित्य
- एक चमचा चारोळीची पेस्ट
- एक चिमुट हळद
- गुलाबपाणी
कसा तयार कराल फेसपॅक
- या तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि त्यापासून एक छान फेसपॅक तयार करा.
- चेहरा आणि मानेवर हा फेसपॅक लावा
- वीस ते तीस मिनीटांनी चेहरा आणि मान कोमट पाण्याने धुवून टाका
काय होतो परिणाम
गुलाब पाण्यात तयार केलेल्या या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचा मुळापासून स्वच्छ होते. हळदीमुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्सची समस्या निर्माण होत नाही. त्वचेवरील डाग, व्रण, ब्लॅकहेडस निघून जाते आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकू लागते.
कोरड्या त्वचेसाठी चारोळीचा फेसपॅक –
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही या पद्धतीने चारोळीपासून फेसपॅक तयार करू शकता.
साहित्य
- दोन चमचे चारोळीची पावडर
- पाव चमचा मध
- दोन चमचे दूध
कसा तयार कराल फेसपॅक
- हे तीनही पदार्थ एकजीव करा ज्यामुळे एक छान फेसपॅक तयार होईल
- चेहरा आणि मानेवर हा फेसपॅक एकसमान लावा
- वीस मिनीटांनी चेहरा आणि मान पाण्याने धुवून टाका
काय होईल परिणाम
दूध आणि मधापासून तयार केलेल्या या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होईल. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागेल.
कॉम्बिनेशन त्वचेसाठी चारोळीचा फेसपॅक –
जर तुमची त्वचा तेलकट अथवा कोरडी नसून कॉम्बिनेशन प्रकारची असेल तर तुम्ही हा फेसपॅक तयार करू शकता.
साहित्य
- एक चमचा चारोळीची पावडर
- एक चिमुट हळद
- गुलाबपाणी
- मध
कसा तयार कराल फेसपॅक
- चारही घटक नीट मिक्स करा आणि फेसपॅक तयार करा
- चेहरा आणि मानेवर हा फेसपॅक लावा
- वीस मिनीटांनी चेहरा आणि मान धुवून टाका
काय होईल परिणाम
गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतील आणि चारोळी, दुध, मधामुळे त्यांचे योग्य पोषण होईल. हळदीमुळे त्वचेच्या समस्या कमी होतील.
टिप – चारोळीची पावडर तयार करण्यासाठी ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी अथवा रात्री चारोळी गुलाबपाण्यात भिजत ठेवून सकाळी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करावी. हे फेसपॅक तुम्हाला कसे वाटले त्याचा तुमच्यावर काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. त्याचप्रमाणे चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एकदा हे फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
काळे चणे आहेत त्वचेसाठी उपयुक्त, असा तयार करा फेसपॅक
गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार
चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब