खाणंपिण आणि नाइटलाईफ

तुमच्या पोटात जाताहेत भेसळयुक्त मसाले, होऊ शकतात गंभीर आजार

Harshada Shirsekar  |  Nov 21, 2019
तुमच्या पोटात जाताहेत भेसळयुक्त मसाले, होऊ शकतात गंभीर आजार

हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे तिखट मसालेदेखील भेसळीपासून दूर नाहीत. कित्येक दुकानदार हळद, जीरे,  गरम मसाला, भाजीचा मसाला, मिरची पावडर, इत्यादी मसाले उघड्यावर ठेवून त्याची विक्री करत असल्याचं आपण पाहिलं असेलच. जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवण्याच्या नादात मसाले आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये सररास भेसळ केली जाते. पण याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

उघड्या मसाल्यांवर बसते धूळ

दुकानात उघड्यावर ठेवलेल्या मसाल्यांची कधीही खरेदी करू नये,  असं अन्न आणि पुरवठा विभागाकडून वारंवार सांगितलं जातं. कारण उघड्यावर ठेवलेल्या मसाल्यांमध्ये धुळीचे कण मिसळतात. धुळ-माती असलेले मसाले जेवणासोबत आपल्या पोटात जातात. यामुळे कित्येक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.  

 

खडा मसाल्याचा करा वापर

बाजारात मिळणाऱ्या खडा मसाला खरेदी करून ते गिरणीवर दळायला द्या. या मसाल्याचा आपल्या अन्नपदार्थांमध्ये वापर करा. यामुळे अन्नपदार्थांना एक वेगळीच स्वादिष्ट चवदेखील येते आणि आरोग्यावर दुष्परिणामदेखील होत नाही.

(वाचा : मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या)

 

अशी करा भेसळयुक्त मसल्यांची तपासणी

1.हळद 
हळदीचा रंग अधिक गडद दिसल्यास त्यामध्ये रंगांची भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शुद्ध हळदीचा रंग फिकट पिवळा असतो. जाणकारांच्या माहितीनुसार, हळदीतला हा रंग रसायनांपासून तयार केला जातो. त्यामुळे रसायनयुक्त हळद जेवणातून खाल्ल्यानं अनेक आजारांना आयतं निमंत्रण मिळतं. 
तपासणी : हळदीला पाण्यात मिसळा. यातील रंग नाहीसा झाल्यास समजून जा की भेसळ झाली आहे.

2.धणे पावडर
धणे पूडमध्येही बारीक-बारीक तण तसेच ठेवून दळली जाते. यामुळे भेसळ ओखळणं फारच कठीण होतं. धणे पूडमध्ये सुगंध नसणं म्हणजे ती भेसळयुक्त असल्याचा पुरावा आहे. 

3. तिखट
तिखटामध्ये  विटांची बारीक पावडर मिसळी जाते. यामध्ये रसायनयुक्त रंगदेखील असतो.  
तपासणी : एका ग्लासमध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये तिखट मिसळा. तिखट पाण्यावर तरंगल्यास ते शुद्ध आणि तळाला गेल्यास तिखट भेसळयुक्त असल्याचं समजा.

(वाचा : आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा)

4.  दालचिनी
दालचिनीमध्ये केसिया (वेगळ्या प्रकारची दालचिनी) किंवा पेरूच्या झाडाची साले मिसळली जातात. शुद्ध दालचिनी हलकी तपकरी रंगाची आणि तिची साल पातळ असते. त्यास एक विशिष्ट प्रकारचा सुगंधदेखील असतो.  
तपासणी : दालचिनी हातावर रगडून पाहा. हातावर त्याचा रंग न लागल्यास दालचिनी भेसळयुक्त आहे. 

5. मीठ
सामान्य मीठ आणि आयोडिनयुक्त मीठ ओळखण्यासाठी एक बटाटा  घ्या. बटाटा बरोबर मधोमध कापा. एकीकडे सामान्य मीठ आणि दुसऱ्या कापावर आयोडिनयुक्त मीठ घ्या. त्यावर लिंबूचे काही थेंब मिसळा. 7 ते 10 मिनिटांनंतर त्याचा रंग निळा झाल्यास ते आयोडिनयुक्त मीठ आहे. रंग निळा न झाल्यास ते मीठ सामान्य आहे, हे ओळखा. 

6. केसर 
शुद्ध केसरचा रंग अतिशय गडद असतो. तसंच त्याचे तुकडे सहजासहजी होत नाहीत. भेसळयुक्त केसरीचे सहजरित्या तुकड होतात, रंगदेखील फिकट लाल किंवा पिवळा असतो.
तपासणी – एका ग्लासमध्ये पाणी घ्या. केसर पाण्यावर तंरगल्यास, ती शुद्ध असल्याचं समजा. 

(वाचा : सकाळच्या घाईत झटपट बनवा टेस्टी नाश्ता, जाणून घ्या रेसिपीज)

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ