लाईफस्टाईल

ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)

Aaditi Datar  |  Dec 18, 2018
ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)

ख्रिसमस म्हणजे सेलिब्रेशन आणि एकमेकांना गिफ्ट देण्याची आणि मिळवण्याची आयती संधी. मला आठवतंय की, लहानपणी ख्रिसमस आल्यावर मला खूप उत्सुकता असायची की, आपल्याकडे सांता कधी येणार? आणि गिफ्ट कधी मिळणार. मी अगदी निरागसपणे माझ्या बेडला सॉक्स बांधत असे. भाबड्या आशेने की, सांता येईल आणि मला गिफ्ट देईल. मला गिफ्ट मिळायचंही पण ते असायचं आईबाबांनी दिलेलं. आत्ताच विचाराल तर अजूनही ख्रिसमससाठी गिफ्ट्स मिळतातच ऑफिसच्या सिक्रेट सँटामध्ये.

गिफ्ट मग ते मोठं असो वा छोटं ते नेहमीच खास असतं. कारण ते गिफ्ट देण्यामागे देणाऱ्याचा काही ना काही विचार असतो. त्यामुळे ते विशेषच असतं.पण जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबियांना ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं. कारण गिफ्ट तर द्यायचंय, पण काय द्यायचं हा नेहमी पडलेला गहन प्रश्न असतो. काळजी नको, आम्ही आहोत ना. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय भली मोठी लिस्ट ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटपासून ते फॅन्सी कपड्यांपर्यंत सगळं आहे, जे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. नाताळचा सण असतोच खास या दिवशी तुम्ही ख्रिसमस शुभेच्छा संदेश पाठवून आणि गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करु शकता.. मग साजरा करूया ख्रिसमसही थाटामाटात.

बेस्ट फ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट्स

बॉयफ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट

गर्लफ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट

भावासाठी ख्रिसमस गिफ्ट

बेस्ट फ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट्स (Christmas Gifts For Your BFF)

ख्रिसमसच्या खास निमित्ताने मित्रमैत्रिणींना गिफ्ट देणं तर आलंच. मग पाहा खास बेस्ट फ्रेंड ख्रिसमस गिफ्ट देण्यासाठी खास आयडियाज.  

लायक्रा हाय अँकल बूट्स (Lycra High Ankle Boots)

मुंबईत तशी जास्त थंडी नसते. पण आजकाल आपल्याकडेही बऱ्यापैकी गारवा जाणवतोय. मग फॅशनेबल बूट किंवा जॅकेट हाही गिफ्ट्ससाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या बेस्टीला गिफ्ट करा कूव्ह्जवरून ब्लॅक बूट्सची सेक्सी पेअर. जे तिच्या शूज वॉर्डरोबची शान नक्कीच वाढवतील. त्यातही ती मस्तपैकी स्टायलिश आणि वनपीस घालायची आवड असणारी असेल तर क्या कहने, तिला हे गिफ्ट नक्कीच आवडेल.

किंमत : Rs 3,499. इथे खरेदी करा.

Also Read How To Celebrate New Year At Home In Marathi

फॅब इंडिया ब्लू सिल्क गज्जी ढाबू प्रिटेंड स्टोल (Fabindia Blue Silk Gajji Dabu Printed Stole)


फॅब इंडिया जरा महाग आहे, पण जर बेस्ट फ्रेंडला गिफ्ट द्यायचंय तर मग थोडाफारस जास्त खर्च तर करावाच लागेल ना. मग तुमच्या बेस्टीला गिफ्ट करा फॅब इंडियाचा हा आकर्षक निळा स्टोल. निळा रंग हा नेहमीच छान दिसतो आणि सगळ्या स्कीन टोन्सवरही उठून दिसतो.

किंमत: Rs 1,590. इथे खरेदी करा.

वीरे फॉरेव्हर कॉफी मग (Veere Forever Coffee Mug)

Also Read Christmas Quotes,Wishes & Status In Marathi

आठवतोय ना.. ‘वीरे दी वेडींग’ हा चित्रपट. तुमच्या बेस्टीबरोबर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल आणि जर पाहिला नसेल तर हीच संधी आहे तिला हा ‘कॉफी मग’ गिफ्ट द्यायची. POPxo shop च्या खास कलेक्शनमधला हा ‘वीरे फॉरेव्हर कॉफी’ मग तिला नक्की गिफ्ट करा. मग रोज सकाळी या मग मधून कॉफी पिताना तिला तुमची नक्की आठवण येईल.

किंमत: Rs 499. इथे खरेदी करा.

क्रिस क्रॉस बॅक रेड कॅमी ड्रेस (Criss Cross Back Red Cami Dress)

तुम्ही जर एकत्र ख्रिसमस पार्टीला जाणार असाल तर तुमच्या बेस्टीला देण्यासाठी रेड ड्रेस हे आयडियल गिफ्ट आहे. शिन (Shein) वरचा हा चिक लुक रेड ड्रेस ख्रिसमससाठी परफेक्ट आहे. तिने हा ड्रेस घातल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच वळतील यात शंका नाही.

किंमत: Rs 518. इथे खरेदी करा.

मॅक रेट्रो लिपस्टीक – रूबी व्हू (M.A.C Retro Matte Lipstick – Ruby Woo)

आता इतक्या मस्त ड्रेसवर लावायला सिग्नेचर रेड लिपस्टीकसुद्धा हवीच ना? मॅकची रेट्रो लिपस्टीक – रूबी व्हू (Retro Matte Lipstick -Ruby Woo) ही शेड परफेक्ट ठरेल. ही एक इंटेन्स रेड कलर आणि पूर्णतः मॅट फिनीश असलेली जास्त काळ टिकणारी लिपस्टीक आहे.

किंमत: Rs 1,500. इथे खरेदी करा.

तुमच्या बॉयफ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट (Christmas Gifts For Boyfriend)

बॉयफ्रेंडला नेहमी काय गिफ्ट द्यायचं हा गंभीर प्रश्न असतो. पण आजकाल जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडच्या चॉईस माहीत असतील तर त्याला गिफ्ट देणं एकदम सोपं आहे. खरंच पहा ही गिफ्ट लिस्ट.

परफ्यूम (Lacoste Eau De Lacoste Blanc for Men)


सुगंध आणि तोही तुमच्या खास व्यक्तीचा असेल तर त्याची गोष्टच वेगळी असते. मग तुम्हालाही त्याच्या सुगंधाने मंत्रमुग्ध व्हायचं असेल, तर त्याला लकोस्ट परफ्यूम द्या. या परफ्यूममध्ये आहे रोझमेरी आणि द्राक्षाचा अर्क. मग तुमची ख्रिसमस डेटही एकदम खास होईल.

किंमत: Rs 4,125. इथे खरेदी करा.

लेदर जॅकेट (Zara Faux Leather Bomber Jacket)

मस्त थंडी आहे आणि बॉयफ्रेंडबरोबर लाँग बाईक राईडला जायचं असेल तर जॅकेट मस्ट आहे. मग तुमच्या बॉयफ्रेंडला सरप्राइज करा हे खास झारा ब्रँडचं जॅकेट गिफ्ट करून. जर तो स्टायलिश आणि ब्रँड कॉन्शिअस असेल तर त्याला गिफ्ट हे नक्कीच आवडेल. फ्रंट झीप पॉकेट्स, स्नॅप बटन पॉकेट, राऊंड नेक आणि लाँग स्लीव्ह्स असलेलं हे झाराचं जॅकेट एकदम थंडीसाठी एकदम परफेक्ट आहे.

किंमत: Rs 3,490. इथे खरेदी करा.

फोन कव्हर (Winter is Coming Phone Cover)


जर तुमचं बजेट कमी आहे आणि तुम्हाला त्याला इंम्प्रेस करायचं असेल तर गिफ्ट करा फोन कव्हर. त्यातही तो जर गेम ऑफ थ्रोन (Game Of Thrones) चा फॅन असेल तर तो इंम्प्रेस झालाच म्हणून समजा. GOT मोबाईल कव्हर दिल्यावर तो ही खूश आणि तुमचा बजेटचा प्रश्नही सुटला.

किंमत: Rs 279. इथे खरेदी करा.

फुटबॉल शूज (Puma Spirit Ag Red Football Shoes)

जर तुमचा बॉयफ्रेंड फुटबॉल प्रेमी आणि फुटबॉल खेळणारा असेल तर मग त्याला गिफ्ट देणं अजूनच सोपं आहे. त्याला गिफ्ट द्या हे स्टड्स. प्यूमाचे हे हॉट चिली फुटबॉल स्टड्स. हे फुटबॉल स्टड्स जर तुम्ही त्याला गिफ्ट केलेत तर फक्त बॉयफ्रेंडचं नाहीतर त्याचे मित्रही तुमचे फॅन होतील.

किंमत: Rs 2,199. इथे खरेदी करा.

पॉवर बँक (Mi Power Bank)

हे जरी टीपिकल गिफ्ट नसलं तरी काळाची गरज आहे हे नक्कीच. नाहीतरी तुमच्याशी गप्पा मारताना त्याच्या मोबाईलची बॅटरी संपत असेलच ना. अशावेळी तुम्ही दिलेली पॉवर बँकचं त्याच्या आणि तुमच्या उपयोगी पडेल, यात शंका नाही. मग त्याला नक्की गिफ्ट करा ही MI पॉवर बँक आणि किंमतही फार जास्त नाही. किंमत: Rs 899. इथे खरेदी करा.

गर्लफ्रेंडसाठी ख्रिसमस गिफ्ट्स (Christmas Gifts For Girlfriend)

बऱ्याच मुलांना गर्लफ्रेंडला नेमकं काय गिफ्ट द्यावं हे कळत नाही. कारण जसे मुलांना गिफ्ट देताना कमी ऑप्शन्स असतात. तसे मुलींना गिफ्ट द्यायला खूप असतात पण नेमकं काय घ्यावं हे कळत नाही. मग आम्ही आहोत ना पाहा या गिफ्ट आयडियाज खास गर्लफ्रेंडसाठी. 

हँडबॅग (Steve Madden Handbag with Detachable Sling Strap)


गर्लफ्रेंडला खूष करण्याचा एकदम सोपा उपाय म्हणजे स्टायलिश डिझाईनर बॅग गिफ्ट करणे. मग पाहा ती किती खूष होईल. जसं मुलांसाठी फुटबॉल स्टड तसे मुलींसाठी डिझाईनर बॅग्ज्स असतात. तिला ही बॅग गिफ्ट करा आणि दाखवून द्या की तुम्ही तिच्यावर खर्च करताना किंमत पाहात नाही.

किंमत : Rs 4,549. इथे खरेदी करा.

सनग्लासेस (Ray-Ban RB3025 Sunglasses)

सनग्लासेस आणि त्यातही एव्हिएटर सनग्लासेस तर सगळ्यांच्याच चेहऱ्याला सूट होतात. हिवाळा असो वा उन्हाळा तुम्हाला सनग्लासेसची गरज असतेच. मग तिला गिफ्ट करा स्टायलिश रे-बॅन सनग्लासेस. ज्यामुळे तिच्या डोळ्यांचे संरक्षणही होईल आणि लुकसुद्धा होईल कूल.

किंमत: Rs 5,751. इथे खरेदी करा.

ब्युटी प्रोडक्ट्स (The Body Shop Gift Set- British Rose)

प्रत्येक मुलीला ब्युटी प्रोडक्ट्स आवडतात आणि त्यातही जर ते बॉडी शॉप ब्रँडचे असतील तर क्या कहने. मग तिला गिफ्ट करा बॉडी शॉपचं नवीवन ब्रिटीश रोज कलेक्शन. ज्यामध्ये शॉवर जेल, बॉडी स्क्रब, बॉडी बटर आणि सोप बार आहे. कोणतीही गर्लफ्रेंड बॉडी शॉप प्रोडक्ट्सला नाही म्हणू शकतच नाही. नक्की ट्राय करून पाहा.

Price: Rs 3,599. इथे खरेदी करा.

फूटवेअर (Charles & Keith Speckled Felt Pointed Pumps)

फूटवेअर हा तसा खूप चांगला ऑप्शन नाही पण जर तिला फूटवेअरची आवड असेल तर काहीच हरकत नाही. तिला गिफ्ट करा हे चार्ल्स अँड किथ ब्रँडचे पाँईटेड पम्प्स. हे पाँईटेड हिल्स खास पायाला आराम मिळेल असे डिझाईन करण्यात आले आहेत. मग तिला हे फूटवेअर गिफ्ट करा आणि तिच्यासोबत आनंद घ्या ख्रिसमस डान्सचा.

Price: Rs 4,799. इथे खरेदी करा.

इनर वेअर (La Senza Lightly Lined Balconette Bra)

येस.. इनर वेअर. तुमची ही इच्छाच असेलच ना तिला तुमच्या पसंतीच्या कपड्यांमध्ये बघण्याची. मग हीच संधी आहे तिला गिफ्ट करा हे खास इनर वेअर.

Price: Rs: 4,522. इथे खरेदी करा.

भावासाठी ख्रिसमस गिफ्ट (Christmas Gifts For Your Brother)

भावाकडून आपल्या वर्षातून दोनदा गिफ्ट मिळतंच. मग नाताळच्या निमित्ताने तुम्ही त्याला द्या खास गिफ्ट. 

अमेझॉन फायर स्टीक (Amazon Fire Stick)

भावडांमध्ये नेहमीच टीव्हीवर कोणता शो किंवा कोणता चॅनल पाहायचा यावरून भांडण सुरू असतात. मग या ख्रिसमसला तुमच्या भावाला गिफ्ट करा अमेझॉन फायर स्टीक. या स्टीकने त्याला पाहता येतील हजारो बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपट, टीव्ही शोज आणि बरंच काही.

Price: Rs 3,999. इथे खरेदी करा.

हेडफोन्स (JBL Dynamic Wired Headphones)

जर त्याला व्हिडीओ गेम्स खेळायला आवडतात आणि म्युझिक ही खूप आवडतं तर हे हेडफोन्स बेस्ट आहेत. हे हेडफोन्स वापरून त्याला व्हिडीओ गेम्समधील गनशॉट्स आणि इतर साऊंड इफेक्ट्सचा आनंद घेता येईल. तसंच प्रवास करताना म्युझिक ही ऐकता येईल. या हेडफोन्सची खासियत म्हणजे उत्कृष्ट साऊंड क्वालिटी आणि डीप बास, ज्यामुळे तुमच्या ऐकण्याचा अनुभव अविस्मरणीय होतो. दुसरा फायदा म्हणजे त्याने हेडफोन वापरले की, तुम्हालाही त्याच्या गेम्सच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

Price: Rs 999. इथे खरेदी करा.

ब्लू टूथ स्पीकर (Bose SoundLink Revolve+ Bluetooth Speaker in Lux Gray)

तुमच्या भावाला मोठ्याने गाणी ऐकायला आवडतात का?, अगदी आंघोळीला गेल्यावर बाथरुममध्येही. मग हे ब्लू टूथ स्पीकर्स त्याच्यासाठी योग्य ख्रिसमस गिफ्ट आहे. आजच त्याच्यासाठी खरेदी करा हे बोस साऊंडलिंक रिवॉल्व्ह स्पीकर. जर तुमचं एवढं बजेट नसेल तर तुम्ही दुसऱ्या ब्रँडचे ब्लू टूथ स्पीकर्सही देऊ शकता.

Price: Rs 17,909. इथे खरेदी करा.

फिटनेस बँड (Fitbit Charge 2)

तुमचा भाऊ फिटनेस फ्रीक आहे का? ज्याला एकवेळ जेवण मिळालं नाहीतरी चालेल पण जीमला जाणं महत्त्वाचं आहे, असं वाटतं. मग त्याला गिफ्ट करा फिटबीट चार्ज 2. जो खास वर्कआऊटसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये तुमची हार्टबीटसुद्धा मोजता येते.

Price: Rs 9,690. इथे खरेदी करा.

बहिणीसाठी ख्रिसमस गिफ्ट्स (Christmas Gifts For Your Sister)

आपली बहीण आपली बेस्ट फ्रेंड असते. मग तुमच्या स्वीट सिस्टरला द्या खास ही ख्रिसमस गिफ्ट्स. 

क्यूट उशीचं कव्हर (Haath Mat Lagana Isko Cushion Cover)

जर तुमची बहीण तिच्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूपच पझेसिव्ह असेल आणि तिच्या गोष्टींना कोणी हात लावल्यास आवडत नसेल. तर मग तिला हे उशी कव्हर नक्की गिफ्ट करा. POPxo Shop च्या खास कलेक्शनमधून तुम्ही हे उशीचं कव्हर तिच्यासाठी निवडा. तिला हे कव्हर गिफ्ट केल्यावर तिच्या वस्तूंना हात लावण्याबद्दल तिला आरडाओरडा करावा लागणार नाही.

Price: Rs 499. इथे खरेदी करा.

इन्स्टंट फिल्म कॅमेरा (Fujifilm Instax Mini 8 Instant Film Camera)

कॅमेराच्या मदतीने तुम्हाला चांगले क्षण टिपून ते आठवणी म्हणून जपता येतात. त्यातही कॅमेरा जर पॉलोराइड असेल तर तुम्हाला फोटोही त्याच क्षणी मिळतील. कारण आपल्याला नेहमीच फोटो कसा आला हे पाहायची घाई असते. मग तुमच्या बहीणीला गिफ्ट करा, हा स्वस्त आणि मस्त फूजीफिल्म इन्स्टॅक्स मिनी 8 इन्स्टंट फिल्म कॅमेरा. या कॅमेराची खासियत म्हणजे तुम्हाला फोटो काढताना दरवेळी ब्राईटनेस पाहावा लागत नाही. कॅमेरा ऑटोमॅटीक सूटेबल सेंटीग करतो आणि तुम्हाला सूचवतो.

Price: Rs 3,699. इथे खरेदी करा.

हेअर स्ट्रेटनर (Philips Kerashine Hair Straightener)

तुमची बहीण जर वारंवार हेअर स्ट्रेटनिंगसाठी पार्लरच्या वाऱ्या करत असेल तर तिला 100 टक्के हे गिफ्ट आवडेल. कारण प्रत्येक मुलीला तिचे केस कसेही असले तरी सरळ आणि मऊ केसांची आवड असतेच. हे स्ट्रेटनर ना फक्त तुमचे केस स्ट्रेट करतं तर ते मऊ, चमकदार आणि कंडीशनही करतं. मग आजच तिला गिफ्ट करा हे स्ट्रेटनर म्हणजे तिला ही नवीन लुकमध्ये मिरवता येईल.

Price: Rs 2,995. इथे खरेदी करा.

स्वेटर (Shein Heart Pattern Sweater)

हिवाळ्यात मऊ स्वेटर घातल्यावर एकदम उबदार आणि छान वाटतं. तुमच्या बहिणीला या थंडीच्या दिवसात असा एखाद्या छान आणि क्यूट स्वेटर गिफ्ट केलात तर तिला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला मिळेल जादू की झप्पी.

Price: Rs 1,998. इथे खरेदी करा.

डीजीटल फोटो फ्रेम (XECH 7″ Digital Photo Frame)


लहानपणीचे फोटो पाहिले की, किती छान वाटतं ना. बालपणीचे दिवस आणि बहिणीबरोबरच्या त्या गोड आठवणी सतत पाहावेसे वाटतात ते फोटो. पण जुने अल्बम काढून ते पाहात बसणे म्हणजे एक कार्यक्रमच होतो. मग याला दुसरा पर्याय काय? तर डीजीटल फोटो फ्रेम. ज्यामध्ये तुम्ही तुमचे अनेक फोटो स्टोर करून ते पाहू शकता. कारण एक फोटो असलेल्या फोटोफ्रेमचे दिवस गेले.

Price: Rs 2,999. इथे खरेदी करा.

आईसाठी ख्रिसमस गिफ्ट (Christmas Gifts For Your Mom)

आई नेहमीच गिफ्ट्सना नाही म्हणत असते म्हणून काय झालं. आईला करा आश्चर्यचकित खास ख्रिसमस गिफ्ट देऊन. 

डायमंडचे कानातले (Caratlane Glory Sparkle Hoop Earrings)

डायमंड्स आर वूमन्स बेस्ट फ्रेंड, असं नेहमी म्हंटल जातं. तुम्हाला आईला डायमंड गिफ्ट करणं जरी शक्य नसलं तरी प्रेशिअस स्टोनचे कानातले नक्कीच देऊ शकता. मग आपल्या आईला गिफ्ट करा हे गडद निळ्या रंगाचे कानातले आणि मग बघा तिच्या चेहऱ्यावरील तेज. किंमत बघितल्यावर थोडी कटकट करेल पण तुम्ही गिफ्ट देताय म्हंटल्यावर तेवढीच आनंदीसुद्धा होईल.  

Price: Rs 16,902. इथे खरेदी करा.

पॉन्चो (Renka Acrylic Red Poncho)

ख्रिसमस आणि लाल रंग हे एक घट्ट समीकरण आहे. मग तुमच्या आईला गिफ्ट करा लाल रंगाचा पॉन्चो, जो ख्रिसमसच्या फॅमिली डीनर किंवा पार्टीसाठी परफेक्ट दिसेल. लाल रंग हा कोणत्याही स्कीन टोनला चांगला दिसतो आणि त्याचबरोबर तुमच्या आईला त्यात उबदारही वाटेल.

Price: Rs 1,080. इथे खरेदी करा.

कांचीपूरम साडी (Kanchipuram Saree)

प्रत्येक आईला सिल्कच्या साड्या आवडतात, नाही का? मग ख्रिसमसला देण्यासाठी यापेक्षा चांगलं गिफ्ट काय असेल? आपल्या आईला गिफ्ट करा ही छान बॉटल ग्रीन जरी पदर असलेली साडी. तुमच्या आईला नक्कीच आवडेल.

Price: Rs 7,355. इथे खरेदी करा.

शाल (Shawl)

जर सिल्कची साडी देण्याएवढं तुमचं बजेट नसेल तर नो प्रोब्लेम. मस्त थंडी पडायला लागली आहे, या गुलाबी थंडीत आईला गिफ्ट करा छान उबदार शाल. मग आईला ही उबदार वाटेल आणि तिच्या मिठीत तुम्हालाही.

Price: Rs. 4000. इथे खरेदी करा.

क्लच (Clutch)

प्रत्येकवेळा लग्नाला, बाहेर जाताना किंवा पार्टीला जाताना आईला क्लचची गरज असतेच. त्यात जर तुमचं बजेटही चांगलं असेल तर आईला द्या लव्ह मोस्किनो पिंक स्मॉल फ्लॅप क्लच.

Price: Rs 14,000. इथे खरेदी करा.

बाबांसाठी ख्रिसमस गिफ्ट (Christmas Gifts For Your Dad)

बाबा सगळ्यांसाठी नेहमीच गिफ्ट आणतात. आता तुम्ही त्यांना गिफ्ट देऊन सरप्राईज करा. 

आफ्टर शेव्ह लोशन (Park Avenue Ace After Shave Lotion)

आपल्या बाबांचा दाढीतला लुकही आपल्याला आवडतो. पण कधीकधी आईला मात्र त्यांच्या पाठीमागे लागते की दाढी करा. मग त्यांना दाढी करावीच लागते. अशावेळी त्यांना आफ्टर शेव्ह लोशन द्यायला, काय हरकत आहे. आहे ना चांगली आयडिया.

Price: Rs 225. इथे खरेदी करा.

वॉलेट (Satya Paul Brown Men’s Wallet)

वॉलेट हे आपल्या बाबांना देण्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. कारण जेव्हा आपल्याला गरज असते, तेव्हा आपण त्यांच्याच वॉलेटमधले पैसे घेतो नाही का? सत्या पॉलचं हे प्युअर लेदर वॉलेट किंमतीच्या मानाने खूपच चांगलं आहे.

Price: Rs 1,193. इथे खरेदी करा.

घड्याळ (Casio Enticer Men Analog Black Dial Watch)

क्लासिक घड्याळ हेही गिफ्ट म्हणून चांगला पर्याय आहे. मग तुमच्या बाबांना द्या हे अल्ट्रा क्लासी सिल्व्हर आणि ब्लॅक कॅसिओ घड्याळ. ज्याची वॉरंटी 20 वर्ष एवढी आहे. या घड्याळ्यात मिनरल ग्लासचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे घड्याळ्यावर ओरखडे पडणार नाहीत आणि पाण्यापासून ही संरक्षण होईल.

Price: Rs 3,495. इथे खरेदी करा.

सारेगम कारवा (Sa Re Ga Ma Carvaan)

तुमच्या बाबांना जर रेट्रो काळातली गाणी आवडत असतील तर त्यांना सारेगामा कारवा हा पोर्टेबल डिजीटल म्युझिक प्लेयर नक्की गिफ्ट करा. ज्यात आहेत 5000 सदाबहार हिंदी गाणी. जो तुमच्या बाबांना पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या काळात घेऊन जाईल.

Price: Rs 6,095. इथे खरेदी करा.

किंडल 6 (Kindle 6)


जर तुमच्या बाबांना पुस्तक वाचण्याची आवड असेल तर त्यांना हे गिफ्ट नक्कीच आवडेल. यानिमित्ताने त्यांना नवीन टेक्नोलॉजीही शिकता येईल. कारण किंडल 6 वर वाचताना अगदी पुस्तक वाचल्यासारखं वाटतं. हे जरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट असलं तरी यात ईमेल आणि पुश नोटीफिकेशन्सचा अडथळा जाणवत नाही. किंडलची स्क्रीन ग्लेअर फ्री असल्याने तुम्हाला अंधारात आणि सूर्यप्रकाशातही वाचता येतं. मग चांगलं ऑप्शन आहे ना बाबांना गिफ्ट द्यायला.

Price: Rs 5,999. इथे खरेदी करा.

ख्रिसमस गिफ्ट्ससाठी हटके आयडियाज (Innovative And Cheap Ways To Wrap Christmas Gifts)

चॉकलेटपेक्षा कधी कधी त्याचं रॅपर आपल्याला जास्त आवडतं. तसंच काहीसं आहे गिफ्ट रॅपिंगबद्दल. खासकरून तुमच्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट देताना त्याचं रॅपिंग विशेष असलंच पाहिजे ना. मग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही हटके आयडियाज ख्रिसमस गिफ्ट रॅपिंगसाठी.

लाल रिबीन्स (Red Ribbons)

तुमचं गिफ्ट ब्राऊन पेपरने रॅप करा आणि त्यानंतर लाल रिबीन्सने छानसा बो बांधा. यामुळे गिफ्ट साधं आणि सुबक ही दिसेल आणि त्याला ख्रिसमसचा टचसुद्धा मिळेल.  

स्ट्रॉ चा वापर (Straw Stars)

कोणीही गिफ्ट रॅपिंगसाठी स्ट्रॉ वापरण्याचा विचारही केला नसेल? तुमचं गिफ्ट छानश्या पेपरने रॅप करून घ्या आणि त्यावर स्टार आकारात स्ट्रॉ पेस्ट करा. आहे ना हटके?

गो ग्रीन (Go Green)

आठवतंय का, शाळेतल्या वह्यांमध्ये चिकटवलेली फुलं आणि पानं? तुमच्या शाळेतील दिवस आठवा आणि तसंच काहीसं गिफ्ट रॅपिंग करताना वापरा. सुकलेली पानं किंवा ठसे ही वापरू शकता. एकदम ईको-फ्रेंडली पर्याय आहे ना. हे दिसतं ही खूप छान.

अंगठ्याच्या ठशांचे रेनडिअर (Thumbprint Reindeers)

तुमचा अंगठा रंगामध्ये बुडवा आणि गिफ्ट रॅपिंग पेपरमध्ये ठसे उमटवा. नंतर काळ्या मार्करने रेनडिअरचे डोळे, नाक आणि शिंग काढा. पाहा ट्राय करून कसं दिसतंय ते.

स्टेनसिल्स (Sassy Stencils)

तुम्ही कधी ख्रिसमस ट्री, रेनडिअर्स, सांताची टोपी असलेली स्टेनसिल्स पुस्तक पाहिली आहेत का? या पुस्तकातील स्टेनसिल्सने तुमच्या रॅपिंग पेपरला सजवा. तुम्ही रंगीबेरंगी पेन किंवा रंगांचाही वापर करू शकता. तुम्ही या गोष्टी ख्रिसमसाठी तुमचं घर सजवण्यासाठीही वापरू शकता. 

फॉईल (Foil Time)

हो.. अॅल्युमिनिअम फॉईल जे आपण डब्यासाठी वापरतो. तुमच्या गिफ्ट रॅपिंग पेपरवर लावा आणि तुमच्या गिफ्टला  द्या ब्लिंग ईफेक्ट.

टाय आणि डाय (Tie And Dye)

एका पांढऱ्या कपडयांवर टाय आणि डायचा वापर करून रंगीबेरंगी डिझाईन्स बनवा. आहे ना क्रिएटीव्ह.
Take a white fabric and make it look colourful with an innovative tie and dye designs. Go creative, go crazy!

टाकाऊतून टिकाऊ (Best Out Of Waste)

तुमच्या ड्रेस किंवा ब्लाऊच्या कापडातून उरलेली एखादी बॉर्डर किंवा जुन्या साडीचा तुकडा ही तुम्ही रॅपिंगसाठी वापरू शकता. यामुळे तुमच्या गिफ्टला पारंपारिक टचही मिळेल आणि उरलेल्या तुकड्यांचाही वापर होईल. 

गिफ्ट रॅपिंगच्या सोप्या युक्त्या (Easy Gift Wrapping Hacks)

– वर्तमानपत्राने रॅप करा

– ब्राऊन पेपरचा वापर

– चार्ट पेपरच्या साहाय्याने बनवा पेपर बॅग 

– गिफ्ट रॅपसाठी कपड्याचा वापर करा.

ख्रिसमस गिफ्टसाठी काही खास आयडियाज (Special Christmas Gift Ideas)

तुम्ही गिफ्ट देण्यासाठी काही तरी खरेदी केलंच पाहिजे, असं काही नाही. कधीतरी एखादी साधी सोपी गोष्टही तुमच्या जवळच्यांसाठी सुंदर गिफ्ट होते. जसं बाबांसाठी बनवलेला खास केक किंवा तुमच्या बहीणीला तिच्या आवडत्या हॉटेलमध्ये डीनरला नेणे इ. तुम्ही गिफ्टऐवजी त्यांना नेहमी लक्षात राहिलं, असा अनुभव देणारी एखादी गोष्ट ही करू शकता. आहे का अशी इच्छा…मग वाचा पुढील आयडियाज.

स्पा व्हाऊचर (Spa Voucher)

स्पा व्हाऊचर हे गिफ्ट म्हणून देणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीची खरंच काळजी करता हे दर्शवतं. तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या स्पाचा अनुभव, ज्यामुळे त्यांचं मन, शरीर आणि आत्म्यालाही बरं वाटेल. तुम्ही एखाद्या स्पाचा प्रकार किंवा एखादी स्पा ट्रीटमेंट निवडू शकता.  

अॅडव्हेंचर पार्क टिकीट्स (Adventure Park Tickets)

जर तुमच्या मित्रमैत्रिणीला किंवा कुटुंबियांना अॅडव्हेंचर ट्रीपला नेलं तर? तुमच्या कुटुंबातील उत्साही व्यक्तींसाठी हा नक्कीच चांगला पर्याय ठरेल. तसंही अशा ट्रीपला जाण्यासाठी वयाची मर्यादा नक्कीच नसते.

कॉस्मेटीक व्हाऊचर (Cosmetics Voucher)

मुलींसाठी मेकअप व्हाऊचर म्हणजे अगदी स्वप्नसारखं नाही. तुमची बेस्टी असो आई असो किंवा बहीण, त्यांना मेकअपची जास्त आवडत नसली तरी फ्री मेकअप व्हाऊचर मिळाल्यावर कोणीही नाही म्हणू शकणार नाही.

सुट्टीचं बुकींग (Vacation Tickets)

आजकालच्या बिझी शेड्युलमध्ये जर तुम्हाला कोणी सुट्टी ना फक्त प्लॅन, अगदी सगळी रिझर्व्हेशनसुद्धा करून दिली तर तुम्ही प्रेमातच पडाल ना. मग तुमच्या प्रिय व्यक्तीला रोजच्या धावपळीपासून दूर न्या आणि मस्त रिलॅक्स करा. जर लांब जाणं महाग वाटत असेल आणि जास्त सुट्टी नसेल तर वीकेंड गेटवे आहेतच. स्वस्त आणि मस्त.

Read More From लाईफस्टाईल