खाणंपिण आणि नाइटलाईफ

#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

Aaditi Datar  |  Sep 25, 2019
#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

गरमागरम भात-वरण, त्यावर तूपाची धार आणि तोंडीला लिंबाच्या लोणच्याची फोड. असा साधा बेतही अनेक जणांना स्वर्गसुख देतो. फक्त भारतातच नाहीतर डाळ-भात हे जगातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. भारतातील जास्तीत जास्त भागात डाळ-भात म्हणजेच दाल-चावलला सर्वात जास्त पसंती आहे. कारण हे बनवायला अगदीच सोपं आणि वेळही कमी लागतो. काही लोकांना हे खाणं खूप बोअरिंगसुद्धा वाटतं. पण याच डाळ-भाताला जगातील सर्वोत्तम आहार म्हणण्यात आल्याचं समोर आलंय. एक रिसर्च रिपोर्टनुसार हा आश्चर्यजनक आणि आनंददायी खुलासा समोर आला आहे.

Instagram

जगभरातील वैज्ञानिकांनी पहिल्यांदा मानलं आहे की, डाळ-भात हा आहार अनुवंशिक आजारांशी (जेनेटीक डिसऑर्डर) शी लढण्यात उपयोगी ठरू शकतो. याला दुजोरा मिळाला जर्मनीतील एका युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चमध्ये.  या रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, डाळ-भाताने जेनेटिक डिसऑर्डरल दूर होण्यास मदत होते. त्यांच्यानुसार हे कळलं आहे की, फक्त DNA तील दोषामुळे अनुवंशिक रोग होत नाहीत तर व्यक्तीचं आहारसुद्धा यामागील एक मुख्य कारण असू शकतं. या रिसर्चनुसार, पाश्चिमात्य देशात खाल्लं जाणाऱ्या हाय कॅलरी फूडपेक्षा भारतीय उपमहाद्विपात खाल्ला जाणारा डाळ-भात हा अनुवंशिक आजारांना मात देतो. डाळ-भात किंवा भाज्या ज्यामध्ये विशेषकरून हळदीचा वापर होतो. त्या अशा रोगांशी प्रतिकार करण्यास मदत करतात.

तूपचे आरोग्यविषयक फायदे देखील वाचा

Shutterstock

डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. ज्यामध्ये व्हिटॅमीन ए, बी 12, कार्बोहायड्रेट, फायबर, फॉस्फरस आणि अनेक प्रकारची पोषक तत्त्व आढळतात. भातासोबत डाळ खाल्ल्याने शरीराला संपूर्ण प्रोटीन मिळतं. डाळीमध्ये काही प्रकारची अमिनो एसिड्सही आढळतात. ज्यांचं सेवन भातासोबत केल्यास शरीराला फायदेशीर ठरतं. या दोन्हीच्या सेवनाने ना फक्त शरीर निरोगी राहतं तर जेनेटिक डिसऑर्डर्सपासूनही बचाव होतो. वैज्ञानिकांनुसार, पिझ्झा, बर्गर आणि फास्टफूड खाण्याऐवजी डाळ-भातासारखं लो कॅलरी फूड खाणं शरीराला निरोगी ठेवतं आणि आजारापासून बचाव करतं.

वाचा – गुळामध्ये दडलं आहे निरोगी आयुष्याचं रहस्य

डाळ-भात खाण्याचे फायदे

Instagram

वाचा – तसेच मराठीमध्ये मिठाईची रेसिपी

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

बटाट्याशिवाय तुमचेही जेवण होत नाही पूर्ण, मग वाचाच

स्टॅमिना वाढवण्यासाठी आपल्या जेवणात समाविष्ट करा ‘हा’ आहार

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ