DIY सौंदर्य

स्तन काळे पडले असतील तर वापरा सोपे घरगुती उपाय

Dipali Naphade  |  May 23, 2022
dark-breast-skin-home-remedies-in-marathi

कोणत्याही महिलेच्या सौंदर्यामध्ये अर्थातच स्तनांचाही महत्त्वाचा भाग असतो. आपले स्तन उभारलेले आणि व्यवस्थित दिसावे यासाठी अनेक अभिनेत्री कॉस्मेटिक सर्जरीदेखील करून घेतात. तर आपल्यासारख्या सामान्य महिला आणि तरूणीही आपले स्तन व्यवस्थित राहावे यासाठी त्याची व्यवस्थित देखभाल करताना दिसतात. पण तरीही अनेकदा काही महिलांचे स्तन आणि त्याखालील त्वचा काळी पडलेली दिसून येते. पण याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण हे तुमच्या स्तनांची आणि तुमच्या शरीराची सौंदर्यता कमी करते. यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय वापरून पाहू शकता. स्तन काळे पडण्याची अनेक कारणं असू शकतात, पण त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे घट्ट कपडे घालणे, विशेषतः ब्रा चे माप योग्य नसणे. पण तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला लेखातून काही सोपे आणि घरगुती उपाय देत आहोत, ज्यामुळे तुम्ही स्तन काळे पडल्यास सहज वापरू शकता. 

कोरफड आहे कमालीचे उपयोगी 

कोरफडमध्ये एलोइन नावाचे तत्व असते जे नैसर्गिक डिपिगमेंटिंग यौगिक (Depigmenting) आहे. हे त्वचेवर काळसरपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच नॉन टॉक्झिन (Non – Toxin) हायपिगमेंटेशन उपायाच्या स्वरूपात योग्य काम करते. तसंच कोरफडमध्ये अँटिऑक्सिडंट आणि विटामिन्स असतात. हेच कारण आहे ज्यामुळे तुम्ही स्तनांचा काळेपणा दूर करण्यासाठी याचा प्रभावी वापर करून घेऊ शकता. 

साहित्य

बनविण्याची पद्धत 

टॉमेटो आहे अद्भुत उपाय 

टॉमेटोचा अनेक भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी उपयोग करून घेत असतो. टॉमेटोमध्ये असणारे लायकोपीन नावाचे तत्व हे त्वचेवरील कोणतेही काळे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरते. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

दूध आणि मधाची जादू 

दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेचा टोन हलका करण्यासाठी मदत करते, विशेषतः स्तनांचा काळेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. कच्च्या दुधात तुम्हाला विटामिन बी, कॅल्शियम, अल्पा हायड्रॉक्सी अॅसिड आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट हे घटक आढळतात. मधामध्ये त्वचा उजळविण्याचे गुण असतात

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

तुम्ही हे घरगुती उपचार करून स्तनांचा काळेपणा दूर करू शकता. तसंच हे उपाय संपूर्णतः नैसर्गिक आहेत, ज्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. पण तरीही वापरण्यापूर्वी तुम्ही याची एक पॅच टेस्ट नक्की करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य