DIY फॅशन

डीप नेक ब्लाऊजची फॅशन करायची असेल तर जाणून घ्या महत्वाच्या टीप्स

Dipali Naphade  |  Apr 4, 2021
डीप नेक ब्लाऊजची फॅशन करायची असेल तर जाणून घ्या महत्वाच्या टीप्स

फॅशन ट्रेंड्समध्ये नेहमी काही ना काही बदल होत असतात. पण काही ट्रेंड असेही असतात जे कधीही जुने होत नाहीत. असाच एक ट्रेंड म्हणजे डीप नेक ब्लाऊजचा (deep neck blouse). अगदी सेलिब्रिटीजपासून ते सामान्य महिलांपर्यंत सर्वांनाच डीप नेक ब्लाऊज अतिशय आपलासा वाटतो. पण डीप नेक ब्लाऊज कॅरी करणं ही नक्कीच सर्वांच्या मनात असूनही सर्वांना जमणारी अशी गोष्ट नाही. पण तुम्हालाही जर डीप नेक ब्लाऊजची फॅशन करायची असेल तर तुम्ही याच्या काही स्टायलिंग टिप्स आमच्याकडून घेऊन नक्कीच हा ट्रेंड फॉलो करू शकता. डीप ब्लाऊज घालण्यासाठी तुम्ही नक्कीच सेलिब्रिटीकडून प्रेरणा घेऊ शकता. तुम्ही काही खास कार्यक्रमांना अशा स्वरूपाचे डीप नेक ब्लाऊज घालून स्वतःला अधिक ग्लॅमरस लुक नक्कीच देऊ शकता. कशा प्रकारे तुम्ही हे कॅरी करावं आणि नक्की कसे डीप नेक ब्लाऊज घालावते याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. 

डीप व्ही नेक ब्लाऊज

व्ही नेक ब्लाऊजची फॅशन कधीही जुनी होत नाही. सध्या अनेक अशा साड्या आहेत ज्यासाठी तुम्ही डीप व्ही नेक ब्लाऊजचा ट्रेंड फॉलो करू शकता. मुळात डीप व्ही नेक ब्लाऊज (Deep V Neck Blouse) ची फॅशन कॅरी करणं अत्यंत सोपं आहे. तुम्हाला ही फॅशन करायची आहे पण तरीही तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही नेकलाईनजवळ तुमच्या साडीचा अथवा लेहंग्याचा पदर अटॅच करू शकता. 

ब्लाऊज तुम्ही तुमच्या नेहमीच्या ओळखीच्या टेलरकडून अथवा बुटिकमधूनच शिऊन घ्या. जेणेकरून तुम्हाला नक्की काय हवं आहे ते तुम्ही व्यवस्थित मोजून आणि मापून घालू शकता. ब्लाऊज तयार करताना बुटीक डिझाईनरला आपल्या स्किन टोनला मॅच करणाऱ्या रंगाचे फॅब्रिक निवडायला सांगा. 

तुम्हीदेखील अगदी सहजतेने डीप व्ही नेक ब्लाऊज घालू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही पुढच्या बाजूने दुपट्टा अथवा पदराने व्यवस्थित कव्हर करा आणि फॉल स्टाईलमध्ये दुप्पटा कॅरी करू शकता. यामध्ये सई मांजरेकरप्रमाणे तुम्ही तुमची स्टाईल करू शकता. 

ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक

डीप ओव्हल शेप ब्लाऊज

आपला नेहमीचा ब्लाऊज इतका ग्लॅमरसही दिसू शकतो हे तुम्ही अमृताच्या फोटोकडे पाहून नक्कीच ठरवू शकता. डीप ओव्हल शेप अथवा राऊंड शेप ब्लाऊज तुमच्या कोणत्याही साडीवर अधिक ग्लॅमरस दिसतो. हा ब्लाऊज तुम्हाला अधिक ग्लॅमरस लुक देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे पुढून आणि मागून दोन्ही बाजूने हा ब्लाऊज डीप असायला हवा. तरच याचा लुक अधिक खुलून दिसतो. 

ही डीप नेक ब्लाऊज स्टाईल करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागत नाही. तसंच या साडीवर अधिक भरजरी दागिने घालण्यापेक्षा तुम्ही अगदी सरळ साधी फॅशन केली तर हे नक्कीच उठावदार दिसते. जर लेहंगा आणि चोली असेल तर तुम्ही यावर हेव्ही आणि लेअर्ड दागिने घालू शकता. या स्टाईलमुळे तुम्ही नक्कीच आकर्षक दिसता आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन होऊ शकता. मात्र योग्य स्टाईल कॅरी करून मगच याचा वापर करावा. 

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

डीप नेक ब्लाऊज विथ स्टायलिश कट

सई ताम्हणकरचा हा लुक तुम्हालादेखील करावासा वाटत असेल तर तुम्ही नक्की हा लुक कोणत्याही कार्यक्रमामध्ये कॅरी करू शकता. डीप नेक ब्लाऊज असला तरीही याचा नेकलाईन आकार वेगळा आहे. तुम्ही अशा तऱ्हेचा वेगळ्या आकाराचा ब्लाऊज तुमच्या बुटीक डिझाईनरकडून शिऊन घेऊ शकता. 

या स्टाईलचा ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही तुमचा दुपट्टा अतिशय स्टायलिश पद्धतीने वापरायला हवा. नेकलाईन फ्लॉन्ट करण्यासाठी दुपट्टा तुम्ही एका खांद्यावर घ्यावा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटण्यासाठी तुम्ही डिझाईनर कॅप्स आणि पेअरअप करूनही अशा स्टाईलचा ब्लाऊज वापरू शकता. 

तुम्हालाही अशा पद्धतीचे डीप नेक ब्लाऊज घालायचे असतील तर या स्टाईलिंग टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या बुटीक डिझाईनकरकडून तुम्ही शिऊन घेऊ शकता. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन