Diet

डाएट करणाऱ्यांसाठी ऑनलाईन चमचमीत आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

Leenal Gawade  |  Oct 14, 2020
डाएट करणाऱ्यांसाठी ऑनलाईन चमचमीत आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

चमचमीत पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पोट समाधानाने भरलेलं असेल तर अनेकांचा दिवस चांगला जातो. हे झालं डाएट सोडून सगळं काही खाणाऱ्यांविषयी. पण ज्यांना हेल्दी राहायचं, वजन नियंत्रणात ठेवायचं आहे. अशांना त्यांचे जेवण चमचमीत करुन चालत नाहीत. तर त्यांना उकडलेलं, कमी मसालेदार आणि सपक जेवणाचा आनंदच घ्यावा लागतो. पण आता असे राहिलेले नाही. खूप जणांनी हेल्दी राहण्याचा वसा घेतल्यामुळेच अनेक फुड स्टॉल त्यांच्याकडे असलेल्या हेल्दी पर्यायांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळेच हल्ली ऑनलाईनसुद्धा तुम्हाला चमचमीत आणि हेल्दी मेजवानी मिळू लागल्या आहेत. पिझ्झा, नान, बर्गर, चिकन तंदुरी असे मस्त पदार्थ आता कमीत कमी कॅलरीज आणि फॅट्समध्ये मिळू लागते आहेत. तुम्हा अद्याप हा पर्याय ट्राय केला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील तुमचे आवडीचे पदार्थ तेही हेल्दी

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

स्विगी ( Swiggy)

घरबसल्या जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर अनेक जणं स्विगीचा पर्याय स्विकारतात. आता स्विगीनेही लोकांची मनं ओळखली आहेत. अनेकांना कमी कॅलरीज आणि हेल्दी असे जेवण हवे असल्यामुळे त्यांनी हेल्दी हा नवा पर्याय त्यामध्ये आणला आहे. तुम्ही किटो किंवा अशा कोणत्याही प्रकारचे डाएट करत असाल तर तुम्हाला आवडीनुसार यामध्ये पदार्थ मिळतात. 

स्विगी अॅप सुरु केल्यानंतर सगळ्यात वरच्या भागात तुम्हाला Health Hub असा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या परीसरात मिळणाऱ्या हेल्दी पदार्थांची यादी यामध्ये येते. तुम्ही हॉटेल निवडल्यानंतर प्रत्येक पदार्थापुढे तुम्हाला कॅलरीजचा पर्यायही दिसतो. ज्यामध्ये तुम्ही किती कॅलरीज खात आहात याचा हिशोब ठेवता येतो. शाकाहारी, मांसाहारी अशा वेगवेगळ्या पर्यायामध्ये तुम्ही निवड करु शकता. 

बजेट: किंमतीचा विचार  केला तर या गोष्टी तुमच्या रोजच्या मिल्सच्या तुलनेत सारख्याच किंमतीच्या आहेत. त्यामुळे तुमचे विशेष पैसे खर्च होत नाही. पण काही वीगन मिल्स हे तुलनेने महाग आहेत. कारण ते ऑफलाईनही महागच मिळतात. 

येथे द्या भेट : https://www.swiggy.com/restaurants

55 मिनिटे खाण्याचा डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन आहे तरी काय?

फुड दर्जी ( Food darzee)

दर्जी अर्थात टेलर आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या मापाप्रमाणे आपल्याला कपडे शिवून देतो. फुड दर्जी हा असाच एक ब्रँड आहे.जो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवण पुरवतो. पण असे करताना तुमच्या आरोग्याची यामध्ये विशेष काळजी घेतली जाते. तुम्ही करत असलेल्या डाएटचा, वजनाचा आणि कॅलरीजचा विचार करुन तुम्हाला किटोजनिक पदार्थ पुरवले जातात. याची खासियत अशी की, तुम्हाला तुमचे कोणतेही चमचमीत पदार्थ यामध्ये टाळावे लागत नाही. तुम्ही अगदी पिझ्झा, पास्तापासून ते अगदी बिर्याणी, केक असे सगळे पदार्थ चाखू शकता. कारण हे सगळे पदार्थ तुमच्या कॅलरीजचे गणित करुन तयार केलेले असते.  त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त त्याचा आस्वाद घेऊ शकता. 

बजेट: फुड दर्जी तुम्हाला थोडे मदाग वाटेल. पण तुम्ही त्यांच्याकडून महिन्याचे पॅकेज असे देखील करुन घेऊ शकता. पण त्यांच्या टेस्टमध्ये तुम्हाला काहीच कॉम्प्रोमाईज करावे लागत नाही. 

येथे द्या भेट : https://fooddarzee.com/

आता डाएट करा तेही तुमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ खाऊन आणि द्या तृप्तीचा ढेकर

डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

Read More From Diet