Party

स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी

Trupti Paradkar  |  Feb 16, 2021
स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी

व्हाईट आणि ब्लॅक शर्ट, व्हाईट टॉप, व्हाईट साडी अथवा व्हाईट कुर्ता हे कपडे तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये आणि कधीही वापरता येतात. त्यामुळे या रंगाचे सर्व प्रकारचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवे. शिवाय व्हाईट शर्ट हा असा एक प्रकार आहे जो तुम्ही कॅज्युअल अथवा फॉर्मल दोन्ही लुक्ससाठी वापरू शकता. एवढंच नाही तर एका व्हाईट शर्टने तुम्ही निरनिराळ्या प्रकारे तुमचा लुक करू शकता. यासाठीच जाणून घ्या उन्हाळा असो वा हिवाळा, पार्टी असो वा मिटिंग व्हाईट शर्टने नेमकी कशी फॅशन करावी. 

व्हाईट शर्ट आणि स्कर्ट

व्हाईट शर्ट तुम्ही फक्त जीन्स अथवा  कॅज्युअल पॅंटवर नाही तर एखाद्या स्कर्टसोबतही कॅरी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला  पार्टी लुक, मिटिंग लुक अथवा पिकनिक लुकही करता येऊ शकतो. उन्हाळ्यात जर तुम्हाला जीन्स अथवा टाईट पॅंट घालणं सोयीचं वाटत नसेल तर व्हाईट शर्ट स्कर्टसोबत कॅरी करून तुम्ही तुमचा ऑफिसचा फॉर्मल लुक तयार करू शकता. शिवाय व्हाईट रंग तुमच्या जवळील कोणत्याही रंगाच्या स्कर्टसोब सहज मॅच होईल. पार्टी वेअरसाठी तुम्ही या लुकसोबत थोडी ज्वैलरी आणि हायहिल्स घालू शकता.

instagram

शॉर्ट वनपीस

जर तुमच्याकडे एखादा लॉंग व्हाईट शर्ट असेल तर तो तुम्ही वनपीस अथवा शॉर्ट ड्रेस प्रमाणे कॅरी करू शकता. फिटिंगसाठी तुम्ही कंबर अथवा पोटाजवळ एखादा बेल्ट त्यावर लावू शकता. दिवसा हॅट आणि गॉगल आणि रात्री हायहिल्स घालून तुम्ही तुमचे डे अथवा नाईट लुक कम्प्लीट करू शकता. कलरफुल बेल्ट अथवा स्कार्फमुळे तुमच्या ड्रेसची रंगसंगती अगदी खुलून दिसेल.

instagram

श्रग अथवा जॅकेटप्रमाणे

व्हाईट शर्ट कशावरही मॅच होतो त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही तो एखाद्या वेगळ्या रंगाच्या टॉप, टीशर्ट अथवा वनपीसवर एखाद्या श्रग अखवा जॅकेटप्रमाणे घेऊ शकता. ज्यामुळे थंडीत ओव्हर क्लोदिंगमुळे तुम्हााला थंडी वाजणार नाही आणि शिवाय तुम्ही सर्वात हटके आणि स्टायलिशही  दिसाल.  जरी तुम्ही उन्हाळ्यात अशी स्टाईल केली तरी व्हाईट शर्ट जर कॉटनचा असेल तर तुम्हाला गरम  होणार नाही. 

instagram

ऑफशोल्डर टॉप –

व्हाईट शर्ट तुम्हाला निरनिराळ्या प्रकारे स्टाईल करता येतात. तुम्ही ऑफ शोल्डर टॉपप्रमाणे वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमचे शोल्डर ट्रेंडी स्टाईलप्रमाणे कॅरी करायचे आहेत. उन्हाळ्यात अशी स्टाईल कुल आणि हटके दिसू शकते. शर्टाची वरची दोन बटणं उघडून शर्ट मागे खेचला की तुमचा ऑफ शोल्डर टॉप रेडी होतो. ट्यूब फिटिंगच्या व्हाईट इनरमुळे तुम्हाला आरामदायक वाटू शकतं. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या व्हाईट शर्टवर एखादा कॉन्ट्रास्ट रंगाचा ट्युब टॉपही कॅरी करू शकता. ज्यामुळे एक वेगळ्या स्टाईलचा नवा लुक तुम्हाला  मिळू शकतो. सध्या अशी फॅशन तरूणाईमध्ये इन आहे. तेव्हा तुमच्या वयोमानानुसार आणि आवडीनुसार यापैकी कोणतीही स्टाईल तुम्ही निवडू शकता.  

instagram

आम्ही शेअर केलेल्या या फॅशन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि यापैकी कोणती स्टाईल तुम्ही कॅरी करता हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)

पेन्सिल स्कर्टने दिसा सडपातळ, फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट

Read More From Party