DIY सौंदर्य

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं

Dipali Naphade  |  Mar 24, 2021
उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेषतः चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत कठीण होते. उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग येणं ही तर अगदी कॉमन गोष्ट आहे. या हंगामात त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते. तर उन्हाळ्यात केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्यास, चेहऱ्यावर अधिक त्रासदायक परिणाम पाहायला मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात आपली त्वचा चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट उटण्याचा वापर करू शकता. चंदन आणि गुलाबाच्या फुलाच्या उटण्यामुळे तुम्ही तुमची त्वचा उन्हाळ्यात अधिक चांगली ठेऊ शकता. चंदन आणि गुलाबाच्या फुलाचे उटणे वापरून तुम्ही तुमची त्वचा अधिक चांगली ठेऊ शकता. चेहऱ्यावरील डाग, मुरूमं आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. पण हे नक्की कसे तयार करायचे आणि कसे वापरायचे याची माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. याचा तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे वापर करून घ्या.

त्वचेच्या संसर्गापासून हवी आहे सुटका, तर वापरा घरगुती उटणे
 

उटणे बनविण्याची पद्धत

Shutterstock

हे उटणे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. हे कसे बनवायचे याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीन उटणे तयार करा आणि त्याचा वापर करा. याचा तुम्हाला चेहऱ्यासाठी अधिक उपयोग होतो.  

साहित्य 

कृती 

उटणे लावण्याचे फायदे, कसे तयार कराल घरच्या घरी (Benefits Of Ubtan In Marathi)

उटणे लावण्याचे फायदे

Freepik.com

 

उटण्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर कोणत्याही स्वरुपाचा त्रास होत नाही. कारण हे उटणे अत्यंत नैसर्गिक पदार्थांपासून तयार करण्यात येते. चंदन आणि गुलाबपाणी यो दोन्ही गोष्टी शरीरातील उष्णता शोषून घेतात त्यामुळे उन्हाळ्यात त्रास होत नाही. उटण्याच्या वापराने त्वचेतील घाण निघून जाते. उटण्यामध्ये औषधीय अँटिऑक्सिडंट्स असल्याने चेहऱ्यावर ब्लीचप्रमाणे काम करते. उटणे लावल्याने सनटॅन निघून जाते आणि त्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसते. गुलाबपाण्याचा वापर केल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेवर अधिक तजेलदारपणा दिसून येतो. बदामाच्या तेलामध्ये आणि लिंबाच्या रसामध्ये त्वचेला पोषण देणारी तत्व असतात. त्यामुळे विटामिन सी त्वचेत आतपर्यंत जाऊन चेहऱ्याला अधिक आकर्षक बनविण्याचे काम करते. तसंच चेहऱ्यावरील प्रदूषण, माती आणि घाण काढण्याचे काम करते. तसंच उटण्यातील चंदन आणि गुलाबपाण्यामुळे त्वचेतील उष्णता शोषली जाते आणि चेहऱ्यावर येणारी मुरूमं आणि पुळ्या नष्ट होण्यासाठीही याचा उपयोग होतो.बऱ्याचदा प्रदूषण आणि माती, धूळ यामुळे चेहरा अधिक खराब होतो. त्यावेळी चंदन आणि गुलाबपाण्याचा उपयोग करून घेता येतो. दुधाची साय चेहरा अधिक मुलायम ठेवण्यास मदत करते. तर या उटण्याचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा नक्कीच करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्वचा अधिक चांगली ठेवण्यासाठी तुम्ही नक्की याचा वापर करा.  

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

Ubtan Benefits & Recipe in English

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

 

Read More From DIY सौंदर्य