DIY सौंदर्य

सॅलिसिलिक अॅसिडच्या मदतीने घालवा पिंपल्सचे डाग

Leenal Gawade  |  Mar 22, 2021
सॅलिसिलिक अॅसिडच्या मदतीने घालवा पिंपल्सचे डाग

त्वचेवर पिंपल्सचे डाग असलेले कोणालाही आवडत नाही. हे डाग घालवण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करतो. धरगुती उपायांपासून ते वेगवेगळ्या ट्रिटमेंटस करत त्वचा पूर्ववत करण्यासाठी आपण धडपडतो. स्वच्छ आणि नितळ त्वचा मिळवणे हे आता फारसे कठीण राहिलेले नाही. तुम्ही थोडीशी काळजी घेत स्वच्छ आणि नितळ त्वचा मिळवू शकता. हल्ली बाजारात इतके प्रॉडक्ट मिळतात की, त्या चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्याचा दावा करतात. या या क्रिममध्ये नेमके असते तरी काय ज्यामुळे हे डाग जातात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक अॅसिड (salicylic acid) हा शब्द बऱ्याचदा कानावर पडला असेल. हे सॅलिसिलिक अॅसिड नेमके काय काम करते. चेहऱ्यावरील डाग नेमके कसे घालवते आणि त्वचेसाठी ते कसे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊया.

केस आणि उत्तम त्वचेसाठी आहारात समावेश करा या नैसर्गिक प्रोटीन्सचा

सॅलिसिलिक अॅसिड म्हणजे काय?

Instagram

सॅलिसिलिक अॅसिड हे हायड्रॉक्सी (Hydroxy Acid) अॅसिड असून पिंपल्स कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील अॅक्ने कमी करण्याचे काम हे अॅसिड करते. त्यामुळे याचा वापर हा अनेक ब्युटी ट्रिटमेंट्स आणि प्रॉडक्टमध्ये याचा वापर करण्यात येतो. सॅलिसिलिक अॅसिडच्या वापराने त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

अॅस्पिरिनच्या वापरामुळे खरंच होतात का पिंपल्स कमी

सॅलिसिलिक अॅसिड आणि पिंपल्सचे डाग

Instagram

प्रवासात पिंपल्स येण्याची १० कारणे

असा करा सॅलिसिलिक अॅसिडचा वापर

पूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सॅलिसिलिक अॅसिड मिळत नव्हते. पण आता हे अॅसिड अगदी सहज मिळते. अगदी कोणालाही मिळेल अशा स्वरुपात ते उपलब्ध झालेले आहे. पण तरीही त्यामध्ये वेगवेगळे पर्सेंटेंज मिळतात. जे त्वचेनुसार निवडायचे असतात.  जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारुन मगच त्याचा वापर करायला घ्या.
1.  अगदी एक ते दोन ड्रॉप सॅलिसिलिक अॅसिड घेऊन ते संपूर्ण चेहऱ्याला लावा. जर तुम्हाला जळजळ वाटली तर काढून टाका. 

2. सॅलिसिलिक अॅसिड आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच लावा. कारण याचा सतत वापर केला तर त्याचा परिणाम दिसून येत नाही.

Read More From DIY सौंदर्य