xSEO

Dohale Jevan Information In Marathi | डोहाळे जेवण संपूर्ण माहिती

Dipali Naphade  |  Jan 13, 2022
Dohale Jevan Information In Marathi

लग्न झाल्यानंतर वेध लागतात ते गरोदरपणाचे. लग्नाला एक – दोन वर्ष होऊन गेली की, आता ‘गुड न्यूज कधी?’ अशा प्रश्नांना सुरूवात होते. एकदा गरोदरपणाची लक्षणे दिसायला लागली की, घरामध्ये आनंदाला पारावर उरत नाही. काही महिलांना गरोदर होण्यासाठी उपाय करायचे असतील तर तेदेखील वेळेवर केले जातात.  गरोदरपणामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. अगदी पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत गरोदरपणात योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळा प्रवास आहे. पण यामध्येही गरोदर असणाऱ्या महिलेची काळजी घेण्यासह तिच्या आनंदाचा सोहळाही केला जातो आणि हा सोहळा म्हणजे डोहाळे जेवण. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा द्यायला आपण अनेक कार्यक्रमांना जातो. पण डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय आणि डोहाळे जेवणाची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

Dohale Jevan Information In Marathi | डोहाळे जेवणाची संपूर्ण माहिती

Dohale Jevan Information In Marathi

डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. डोहाळे लागतात म्हणजे नक्की काय होतं? तर महिलेच्या गर्भात साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. या बाळाच्या काही इच्छा असतात, त्यानुसार होणाऱ्या आईला खावेसे वाटते. त्यालाच डोहाळे लागणे असे म्हटले जाते. साधारण सातव्या महिन्यात बाळाची वाढ ही पूर्ण झालेली असते आणि त्यावेळी बाळाला अधिक अन्नपुरवठा लागतो. त्यामुळेच महिलेसाठी डोहाळे जेवण आयोजित करण्यात येते आणि बाळाचे चोचले अर्थात महिलेचे डोहाळे यावेळी पुरविण्यात येतात. 

तर दुसरा भाग म्हणजे, पहिले तीन महिने झाले की, चोरओटी भरण्यात येते आणि त्यानंतर सातव्या महिन्यात परंपरा आणि रीतीनुसार सर्वांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो त्याला ओटीभरणे अथवा डोहाळे जेवण असे म्हटले जाते. 

डोहाळे जेवण करण्याचे वैज्ञानिक कारण (Scientific Reason of Dohale Jevan In Marathi) 

डोहाळे जेवण करण्याचा कालावधी हा सातव्या महिन्यात असतो. यानंतर प्रत्येक महिलेला संपूर्ण विश्रांतीची गरज असते. पूर्वी महिलांना आराम मिळत नसे. त्यामुळे सातव्या महिन्यात त्यांच्या माहेरी पाठविण्याची प्रथा होती. आताही ही प्रथा पाळली जाते. त्याशिवाय पूर्वी महिलांना हवे तितके खायला मिळत नसे. त्यामुळे त्यांचे डोहाळे पुरविण्याची आणि त्यांना हवं नको ते पाहण्याची ही प्रथा होती. याशिवाय सातव्या महिन्यात अनेक बालकांच्या जीवाला धोका असे. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हा विधी करण्यात येत असे. काही ठिकाणी यावेळी विशेष पूजाअर्चाही केली जाते. तसंच ही संपूर्ण प्रक्रिया ही बाळाच्या आरोग्यासाठी करण्यात येते. तर या विधीनंतर गर्भवती महिलेला आपल्या माहेरी पाठवण्यात येते जेणेकरून तिच्या शरीराला विश्रांती मिळून आई आणि बाळ या दोघांचेही आरोग्य उत्तम राहील. 

Dohale Jevan Vidhi In Marathi | डोहाळे जेवणाचा विधी

Dohale Jevan Vidhi In Marathi

डोहाळे जेवणाचा विधी नक्की काय असतो. साधारणतः आपल्याला डोहाळे जेवणाला केलेली सजावट आणि फुलांच्या बाणाने सजलेली महिला अथवा चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला याबाबत माहिती असते. पण नक्की हा काय विधी असतो जाणून घेऊया. 

सातव्या महिन्यात महिलेल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण. काही ठिकाणी सकाळच्या वेळी अथवा काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम करण्यात येतो. यासाठी कोणताही मुहूर्त काढण्याची गरज भासत नाही. पण सातवा महिना संपण्याचा आत हा डोहाळे जेवण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते. बाळ जन्माला येण्याआधी सातव्या महिन्यात सौभाग्यवती महिला या सदर महिलेची ओटी भरतात. हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि पाच फळे ही ओटी महिलेची सासू भरते आणि त्यानंतर अन्य जमलेल्या महिला गर्भवती महिलेची ओटी भरतात. 

यानंतर डोहाळे जेवणामध्ये महिलेला आवडत असणारे अनेक पदार्थ, पंचपक्वान्न करण्यात येते. गोड, आंबट, तिखट पदार्थांची यावेळी रेलचेल असते. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात केवळ गर्भवती महिलेच्या आवडीचे पदार्थतच असतात. तिच्या आवडीची अधिक काळजी घेतली जाते. कारण पहिल्या महिन्यापासून काही महिलांना उलटी होण्याचा अथवा मळमळ होण्याचाही त्रास असतो. ज्यामुळे जेवण जात नाही. यानंतर दोन वाट्यांमध्ये बर्फी आणि पेढा लपवून ठेवण्यात येतो. यामध्ये न पाहता गर्भवती महिलेने निवड करायची असते. पूर्वपरंपरागत चालत आलेल्या या खेळात खूपच मजा येते. डोहाळे जेवणाच्या वेळी उखाणे घेत ही मजा घेतली जाते. बर्फी आल्यास, मुलगी होणार आणि पेढा आल्यास, मुलगा होणार असा अंदाज बांधला जातो. 

Dohale Jevan Oti Saman | डोहाळे जेवणात ओटीमध्ये काय असावे सामान

Dohale Jevan Oti Saman

सध्याच्या पिढीला सहसा ओटी भरणे अथवा ओटी भरताना त्यामध्ये काय काय सामान असावे याबाबत माहिती नसते. डोहाळे जेवणासाठी जाताना नक्की ओटीमध्ये काय काय घेऊन जावे याबाबत – 

Types Of Dohale Jevan Oti | डोहाळे जेवणाचे आधुनिक विविध प्रकार

Types of Dohale Jevan Oti

डोहाळे जेवण हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. आपल्या आवडीनुसार आणि आपल्या पारंपरिक पद्धती जपत डोहाळे जेवणाचे प्रकार हल्ली आपण पाहतो. त्यापैकी काही प्रकार जाणून घ्या. 

सध्या डोहाळे जेवणाला एक इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही यापैकी ओटी भरण्याची पद्धती निवडून ओटीभरण्याचा कार्यक्रम करू शकता. यामध्ये गर्भवती महिलेच्या वडीप्रमाणे गिफ्ट्सची देवाणघेवाणही करण्यात येते. 

Special Menus For Dohale Jevan | डोहाळे जेवणासाठी सेट करा खास मेन्यू

Special Menus For Dohale Jevan – Instagram

डोहाळे जेवणासाठी जर तुम्हाला खास महाराष्ट्रीयन मेन्यू सेट करायचा असेल तर तुम्ही हे पर्याय नक्की निवडू शकता

वेलकम ड्रिंक 

जेवण्यासाठी खास बेत 

पंचपक्वान्नांचा मेन्यू 

यापैकी कोणताही मेन्यू निवडून तुम्ही सेट करू शकता. यापेक्षा अन्य तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे जेवण हवे असेल तरीही तुम्ही ते निवडू शकता. मात्र सहसा महाराष्ट्रीयन डोहाळे जेवणासाठी हा मेन्यू उत्तम पर्याय आहे. (हल्ली पंजाबी, बंगाली, दाक्षिणात्य आणि चायनीज पदार्थांचाही समावेश करण्यात येतो)

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. डोहाळे जेवणाचा कोणता विशिष्ट मुहूर्त काढावा लागतो का?
डोहाळे जेवणाचा लग्न अथवा मुंजीप्रमाणे मुहूर्त काढावा लागत नाही. मात्र सातवा महिना लागल्यापासून ते आठवा महिना लागण्याच्या आत तुम्ही कधीही चांगला दिवस पाहू डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करू शकता. 

2. डोहाळे जेवणासाठी काही विशिष्ट वेगळे विधी असतात का? भटजी बोलवावे लागतात का?
काही जणांना हा नेहमी प्रश्न असतो की या कार्यक्रमाला भटजींची आवश्यकता लागते का? अजिबातच नाही. घरच्या महिलांच्या उपस्थितीत हा ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. यासाठी भटजीची गरज नाही.  

3. डोहाळे जेवण साध्या पद्धतीने केले तर चालते का?
डोहाळे जेवण कसे करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांना केवळ जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे त्यांनी त्याप्रमाणे करावे. ज्यांना हा एक सोहळा म्हणून सर्वांकडून लाड पुरवून घेण्याची इच्छा असेल त्यांनी हा कार्यक्रम मोठा करावा. मात्र यासाठी कोणतेही बंधन नक्कीच नाही. 

Read More From xSEO