xSEO

Dohale Jevan Message And Wishes In Marathi | तुमच्या प्रियजनांसाठी डोहाळे जेवण शुभेच्छा

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 5, 2022
dohale-jevan-wishes

डोहाळे जेवण (Dohale Jevan) अर्थात बेबी शॉवर (Baby Shower) हा गरोदरपणातील एक महत्त्वाचा सोहळा आहे. तसेच डोहाळे जेवणाची माहिती आणि विधी (Dohale Jevan Information In Marathi) हे देखील महत्वाचे आहे. डोहाळे जेवणासाठी सजावट, डोहाळे जेवणासाठी नक्की काय काय करायचं याचे आपण प्लॅनिंग करत असतो. घरात येणाऱ्या लहानशा या बाळासाठी होणारी आई, बाबा, आजी – आजोबा आणि घरातील सगळेच उत्साही असतात. डोहाळे जेवणाला एक वेगळीच मजा असते. डोहाळे जेवणात घेतले जाणारे उखाणे, तसंच मुलगा होणार की मुलगी होणार याचा रंगणारा खेळ ही मजा प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत असते. गरोदर असणाऱ्या महिलेला तिच्या त्रासापासून जरा मुक्तता मिळावी आणि तिचे लाड पुरवावे याच हेतूसाठी डोहाळे जेवण करण्यात येते. अशा डोहाळे जेवणासाठी तुम्ही तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा. डोहाळे जेवण शुभेच्छा (Dohale Jevan Message In Marathi, Dohale Jevan Wishes In Marathi, Dohale Jevan Shubhechha) खास तुमच्यासाठी. आपल्याकडे डोहाळे जेवणाआधी चोरओटी देखील भरली जाते.

Dohale Jevan Message In Marathi | डोहाळे जेवण शुभेच्छा

Dohale Jevan Message In Marathi
Instagram – डोहाळे जेवण शुभेच्छा

डोहाळे जेवण शुभेच्छा द्यायच्या म्हणजे नक्की काय लिहायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? डोहाळे जेवणाला गिफ्ट काय द्यायचं हा पण प्रश्न असतो. आपल्याला आनंद तर व्यक्त करायचा असतो पण तरीही शब्दात मांडता येत नाही. असं असेल तर तुम्ही डोहाळे जेवण शुभेच्छा देण्यासाठी या लेखाचा आणि शुभेच्छांचा नक्की आधार घेऊ शकता. 

1. तुझं आयुष्य आता पहिल्यासारखं जरी नाही राहीलं, तर चांगल्यासाठी हे बदल होत आहेत. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डोहाळे जेवण आहे तुझ्यासाठी खास आणि आहेत आमच्याही शुभेच्छा

2. आयुष्यातील सर्वात मोठं सुख आता तुझ्या आयुष्यात येणार आहे. या आनंदासाठी तू तयार राहा 

3. तुझ्या बाळासाठी आयुष्यात फक्त प्रेम, सुख, आनंद आणि समाधान मिळो याच शुभेच्छा या डोहाळे जेवणाला खास तुझ्यासाठी

4. लहान बाळांचे हसणे, त्यांचे आपले असणे आणि त्यांचा निरागस सहवास लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे, तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी डोहाळे जेवणाला खास आशीर्वाद आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!

5. बाळाच्या जन्मानंतर तू आहेस तशीच नक्कीच राहणार नाहीस. पुढच्या आयुष्यातील आनंद हा बाळासह येणार आहे, त्यामुळे या नव्या आयुष्यासाठी तयार राहा. डोहाळे जेवण शुभेच्छा!

6. आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे लहान बाळ. आयुष्यभराचा आहे हा आशीर्वाद, डोहाळे जेवण शुभेच्छा!

7. संस्मरणीय आणि जादुई असं जग आता लवकरच तुझ्यासमोर येणार आहे. पुढच्या वाटचालीस या डोहाळे जेवणाला तुला शुभेच्छा

8. तुझ्या होणाऱ्या बाळाला अत्यंत सुदृढ आयुष्य मिळो हाच आशीर्वाद आणि तुला डोहाळे जेवण शुभेच्छा!

9. लहान बाळाच्या येण्याने संपूर्ण आयुष्य बदलून जातं. तुम्हा दोघांचेही अभिनंदन आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!

10. आता या नंतरचा वेळ इतका पटापट जाईल. देव तुला आणि तुझ्या बाळाला उदंड आयुष्य देवो! डोहाळे जेवण शुभेच्छा!

वाचा – विनोदी डोहाळे जेवण उखाणे

Funny Dohale Jevan Wishes In Marathi | विनोदी डोहाळे जेवण शुभेच्छा

Instagram

विनोद आयुष्यात असणं कायम महत्त्वाचं असतं. त्यामुळे डोहाळे जेवण शुभेच्छादेखील विनोदी असायलाच हव्यात ना? अशाच काही विनोदी डोहाळे जेवण शुभेच्छा!

1. ट्विंकल ट्विंकल लिटि्ल स्टार, तुझ्या बाळाची आता अजून वाट पाहू शकत नाही यार…डोहाळे जेवण शुभेच्छा!

2. तुला बाळ होणार याचा मला जास्त आनंद आहे, कारण आता तुझे कपडे मला घालायला मिळतील आणि यापेक्षा अधिक मोठं सुख बहिणीसाठी कोणतं असू शकतं – डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

3. येणारे बाळ तुझ्यासाठी असंख्य सुख तर घेऊन येईलच पण आता झोप कशी उडते तेदेखील तुला कळेल

4. आई होणं हे सर्वात खतरनाक काम आहे..कळेलच तुला आता लवकर…घाबरू नकोस…पण याचा प्रत्येक क्षण जग

5. बाकी कोणाचीही तुझ्यावर ओकण्याची अथवा तुला मारायची हिंमत होणार नाही….पण आता असं कोणीतरी येणार आहे, जे तुझी शिस्त बिघडवणार आहे…तयार राहा  

6. सर्कशीमध्ये तुझं स्वागत आहे, आता रोज नवा खेळ! डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

7. लवकरच तुझी शांतता भंग होणार आहे, यापेक्षा अधिक वेगळा आनंद भाऊ म्हणून मला काय मिळणार..मी खूपच मजेत आहे कारण आता तुला कळेल त्रास म्हणजे काय असतो. पण यातही एक प्रकारचा आनंद आहे हे विसरू नकोस

8. शांतता म्हणजे नक्की काय असते हे अजून दोन महिने अनुभवून घे…कारण यानंतर तुझा फक्त आणि फक्त शांतताभंग होणार आहे….पण अर्थातच चांगल्या दृष्टीने…यातही वेगळे सुख आहे

9. तू सध्या किती खात आहेस यावर आता कोणीच काही बोलणार नाहीये. मस्तपैकी आनंद घे आणि भरपूर खा…डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

10. तुझ्यासाठी सर्वच आता वेगळं जग निर्माण होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण आता तू वेगळी राहणार नाहीस हे पण लक्षात घे…तुझ्या वाटणीला सगळं येणारं प्रेमदेखील आता आम्ही त्या लहानग्या बाळालाच देणार आहोत. त्यामुळे शेअरिंगसाठी तयार राहा! डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

वाचा – नवजात बाळाच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश

Dohale Jevan Sms In Marathi | डोहाळे जेवण संदेश

Dohale Jevan Message In Marathi

डोहाळे जेवणाचे संदेश तुम्हाला तुमच्या प्रियजनांना द्यायचे असतील तर आम्ही नक्कीच तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. तुमच्या बहिणीला अथवा वहिनाला, मैत्रिणीला डोहाळे जेवणासाठी तुम्हीही पाठवा 

1. आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई होणं. हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

2. बाळासह तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. हे क्षण अगदी मनापासून जगून घे. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

3. ही वेळ आहे अगदी खास, जपून ठेव प्रत्येक क्षण आणि बाळाचा श्वास. खास आहेत हे सगळे अनुभव. सोहळाही आहे अप्रतिम. तुला आणि तुझ्या येणाऱ्या बाळाला खूप खूप शुभेच्छा!

4. आयुष्यातील सर्वात मोठा खजिना म्हणजे घरात लहानग्याचे आगमन. लवकरच घरात हा आनंद येणार आहे आणि तुमचे घर नव्याने आनंदाने भरून जाणार आहे. हाच आनंद कायम बाळाच्या आगमनाने टिकून राहो आणि बाळाला सुदृढ आयुष्य मिळो

5. प्रत्येक बाळ हे वेगळा अनुभव देते आणि आईसाठीही हा असतो वेगळा अनुभव. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने आमच्या शुभेच्छांचा स्वीकार कर!

6. प्रत्येक स्त्री ही या क्षणासाठी आसुसलेली असते. हा क्षण आणि ही वेळ परत परत येत नसते. डोहाळे जेवण शुभेच्छा!

7. आयुष्यतील सर्वात मोठ्या साहसाला सुरूवात झाली आहे आणि डोहाळे जेवण हा त्यातलाच एक भाग आहे असं म्हणायला हवं. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा!

8. तुझ्या नव्या चमत्कारासाठी खूप खूप शुभेच्छा! मस्तपैकी तुझे डोहाळे जेवण व्हावे आणि आनंद मिळावा याच सदिच्छा

9. आयुष्यात ज्या गोष्टी मिळतात त्यापैकी सर्वात जास्त बहुमूल्य गोष्ट मिळत असेल तर ती म्हणजे आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा! 

10. पुढे येणाऱ्या जादुई आणि संस्मरणीय दिवसांसाठी खूप खूप शुभेच्छा!

Dohale Jevan Shubhechha | ओटी भरणे कोट्स

Baby Shower Quotes In Marathi

Baby Shower, ओट भरणी, डोहाळे जेवण, गोदभराई (Godh Bharai) हे सर्व शब्द आपल्या परिचयाचे आहेत. ओटी भरणे म्हणजे सातव्या महिन्यातील आपल्याकडील सोहळा मानला जातो. असेच काही ओट भरणे कोट्स (Baby Shower Quotes).

1. बाळाला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. हे दोन महिने आता कसे पटापटा जातील याचीच वाट पाहत आहोत. तुला आणि बाळाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!

2. आता कुटुंबाला पूर्णत्व येईल. डोहाळे जेवण शुभेच्छा!

3. बाळाचं आयुष्यात असणं हे कोणत्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. हाच अनुभव तुम्हाला लवकरच तुमच्या आयुष्यात मिळेल. तुमच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!

4. तुम्ही विचार करता त्याहीपेक्षा अधिक बाळांचे वागणे आणि जन्माला आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी करणे मजेशीर असते. लवकरच तुम्हाला हा अनुभव येईल. डोहाळे जेवण शुभेच्छा!

5. स्वर्ग म्हणजे नक्की काय हे बाळाच्या जन्मानंतर कळतं. बाळाचा जन्म होण्याचा तो क्षण आहे अप्रतिम. आता लवकरच येईल तुला हा अनुभव. डोहाळे जेवण शुभेच्छा!

6. आयुष्यात आई – वडील होण्याचा सर्वात वेगळा अनुभव म्हणजे तुम्ही स्वतः कधीच स्वतःला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तुमचं बाळ हेच तुमचं सर्वस्व होतात. डोहाळे जेवण शुभेच्छा!

7. मुलगी असो वा मुलगा. कोणीही घेऊन येणार तो आनंदच. डोहाळे जेवण शुभेच्छा!

8. कोणीतरी आपलं, आपल्या रक्ताचं, आपल्या अगदी जवळचं आणि आपल्या शरीरातून येणारं असं…एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळीच भावना. डोहाळे जेवण शुभेच्छा!

9. बाळ होणं म्हणजे पुन्हा एकदा नव्याने स्वतःच्याही प्रेमात पडणं. सर्वस्व पणाला लावणं, एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं. डोहाळे जेवण शुभेच्छा!

10. जगातील कोणतंही सुख यापेक्षा मोठं असू शकत नाही आणि त्याची तुलनाही होऊ शकत नाही. डोहाळे जेवण शुभेच्छा!

तुम्हीही तुमच्या जवळच्या व्यक्तींना अथवा प्रिजयनांना ओटी भरणे कोट्स, डोहाळे जेवण शुभेच्छा पाठवायचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की आमचा लेख वाचा आणि शुभेच्छा पाठवा.

Read More From xSEO