फॅशन

अशी करा फॅशन खांदे दिसतील बारीक आणि सुडौल

Trupti Paradkar  |  Mar 25, 2021
अशी करा फॅशन खांदे दिसतील बारीक आणि सुडौल

सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असू शकते.  मात्र तुमचा स्वतःकडे पाहण्याचा आत्मविश्वास कसा आहे आणि  तुमचा स्टाईलिंग सेंस कसा आहे हेच यावर तुम्ही आकर्षक दिसणार की नाही ते ठरतं. कारण प्रत्येकीचा बॉडी टाईप हा नेहमी वेगळाच असतो. जर तुम्ही तुमच्या बॉडीटाईपनुसार ड्रेस निवडले तर तुम्ही कोणत्याही बॉडीशेपमध्ये बारीक आणि सुंदर दिसू शकता. काही जणींचे खांदे खूपच मोठे ,रूंद अथवा जाड असतात. पण जर तुम्ही काही सोप्या स्टायलिंग टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच सुडौल दिसू शकता. यासाठी खांदे बारीक दिसण्यासाठी फॉलो करा या फॅशन टिप्स

स्ट्रेटपेक्षा घेरवाले ड्रेस घाला –

जर तुमचे खांदे मोठे असतील तर तुम्हाला तुमच्या खांद्यावरून लोकांचं दुर्लक्ष होईल असे कपडे निवडायला हवेत. जसं की जर स्ट्रेट फिंटिंग चे ड्रेस, स्कर्ट अथवा टाईट जीन्स घातली तर तुमचे खांद्यावर पटकन जाणार कारण शरीराचा खांद्याकडचा भाग मोठा असल्यामुळे तो पटकन दिसतो. पण जर तुम्ही घेरवाले ड्रेस अथवा लूज फिटिंगच्या पॅंट घातल्या तर तुमचा बॉडीशेप एकसमान दिसेल. यामुळे लोकांचं लक्ष आधी तुमच्या ड्रेसच्या खालच्या भागाकडे अथवा पॅंटकडे जाईल. ज्यामुळे तुमच्या खांद्याकडे फार लक्ष केंद्रित होणार नाही.

instagram

रंगाची निवड करताना –

खांदे लपवण्यासाठी तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता हे खूप महत्त्वाचे आहे. हलक्या रंगापेक्षा गडद रंगामध्ये तुम्ही जास्त बारीक वाटता. त्यामुळे खांदे बारीक दिसण्यासाठी जर तुम्ही डार्क रंगाचे टॉप अथवा ड्रेस घातले तर तुमचा खांद्याकडचा कंबरेपेक्षा बारीक वाटू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला टॉपकडचा रंग डार्क आणि बॉटमकडील कपडे हलक्या रंगाचे घालावे लागतील.

फुगलेल्या स्लीव्जची फॅशन टाळा –

खांद्याकडचा भाग बारीक दिसावा असं वाटत असेल तर रफल अथवा पफ स्टाईल स्लीव्जची फॅशन मुळीच करू नका. कारण या स्लीव्जमुळे लोकांचं लक्ष तुमच्या हात आणि खांद्याकडे जास्त जाईल. शिवाय या फॅशनमुळे तुम्ही जरा जास्तच जाड वाटू शकता. त्यापेक्षा बॉडीहगिंग स्लीव्जची फॅशन करा ज्यामुळे तुम्ही बारीक आणि सुडौल दिसाल. 

instagram

शोल्डर पॅड असलेले टॉप अथवा जॅकेट घालू नका –

बऱ्याचदा बारीक लोकांना जाड लुक देण्यासाठी अशा प्रकारचे कपडे तयार केले जातात. ज्यामध्ये टॉप अथवा जॅकेटच्या खांद्याच्या आतील भागाला शोल्डर पॅड लावलेले असतात. पण जर तुमचे खांदे मुळातच जाड असतील तर असे कपडे घातल्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. त्यामुळे अशा स्टाईलपासून दूर राहणेच तुमच्यासाठी योग्य ठरेल.

केस मोकळे सोडा –

खांदे बारीक दिसण्यासाठी हा उपाय अगदी परफेक्ट आहे. मात्र त्यासाठी तुमचे केस कमीत कमी खांद्यापर्यंत उंचीचे असायला हवे. केसांना व्हॉल्युम देणारी हेअरस्टाईल करून जर तु्म्ही केस मोकळे सोडले तर तुमचे खांदे आपोआप झाकले जातील. चेहरा आणि खांद्याकडचा आकार शेपमध्ये दिसण्यासाठी केस मोकळे सोडण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

आम्ही शेअर केलेल्या या फॅशन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये  जरूर सांगा

फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

सीक्वेन कॅरी करताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या

उन्हाळ्यात ट्रेंडी आणि कूल दिसण्यासाठी ट्राय करा या फॅशन टिप्स

पोट असेल मोठं तर अशी करा साडी आणि लेहंग्याची स्टाईल, दिसाल बारीक

Read More From फॅशन