DIY सौंदर्य

लहान वयात सुरकुत्या आल्या असतील तर करा सोपे उपाय

Dipali Naphade  |  Sep 25, 2020
लहान वयात सुरकुत्या आल्या असतील तर करा सोपे उपाय

जास्त वेळ उन्हात राहणे, हार्मोनल बदल, गर्भनिरोधक गोळ्या, उच्च रक्तदाब आणि मानसिक त्रास, गरोदरपणा, मासिक पाळी, आनुवंशिक कार, विटामिन बी12 ची कमतरता, चेहरा रगडून पुसणे, चेहऱ्यावर आलेल्या मुरूमांना फोडणे, स्वस्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे, हेअरडायची अलर्जी अशा एक ना अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर लहान वयातच सुरकुत्या येतात. असं होणं कोणालाही आवडणार नाही हे मात्र तितकंच खरं. मग अशावेळी नक्की काय उपचार करायचे? बाहेर जाऊन पार्लरमधून महाग ट्रीटमेंट या प्रत्येकाला परवडणाऱ्या नसतात. सुरकुत्या हे खरं तर वय वाढण्याचे संकेत आहेत. पण सध्याची बदलती जीवनशैली आणि केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर आणि प्रदूषण यामुळे हे लहान वयातच जाणवू लागले आहे. त्यासाठी आपण नक्कीच सोपे उपाय शोधत असतो. असेच काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

वयस्कर दिसत असाल, तर सोडा ‘या’ सवयी

रोज वापरा टॉमेटोचा रस

Shutterstock

टॉमेटो हा चेहऱ्यावरील साचलेली माती आणि धूळ कमी करून चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतो. तुम्हाला सुरकुत्यांपासून सुटका हवी असेल तर रोज दोन चमचे टॉमेटोच्या रसामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक ताजातवाना आणि चमकदार दिसेल.

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय (Anti-Aging Home Remedies In Marathi)

मलई आणि हळद

Shutterstock

मलई चेहऱ्याला अधिक मुलायमपणा देते आणि हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक असते. त्यामुळे या दोघांचं मिश्रण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायला आणि कमी वयातच सुरकुत्या दिसू नयेत यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही 2 चमचे मलाई घ्या आणि त्यात अगदी चिमूटभर हळद घालून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लाऊन 15 मिनिट्स तसंच राहू द्या. तुम्ही हा प्रयोग नियमित केल्यास, तुम्हाला सुरकुत्या कमी झाल्याचे दिसून येईल. 

कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

मध, दही आणि लिंबाचा रस

Shutterstock

मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि लिंबाच्या रसातील विटामिन सी हे आपल्या चेहऱ्याला अधिक ताजेतवाने ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास अधिक फायदेशीर ठरतात. यासाठी अर्धा चमचा मध घ्या आणि त्यात थोडंसं दही आणि काही थेंब लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील ब्राऊन पॅच हलका होतो. 

अंडे, टॉमेटो आणि लिंबाचा रस

Shutterstock

अंड्याचा आतील भाग एक चमचा घ्या आणि त्यामध्ये टॉमटो आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि काही मिनिट्सनंतर तुम्ही चेहरा धुवा. तुम्ही हा प्रयोग नियमित केल्यास, चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत मिळते. 

सुरकुत्या जाण्यासाठी सोपे उपाय

सुरकुत्या जाण्यासाठी अगदी पटकन करता येण्याजोगे काही उपाय आहेत. तुम्ही त्याचा वापर करून सुरकुत्या घालवू शकता. 

त्वचा सॅनिटाईझ ठेवण्यासाठी तुम्ही नियमित MyGlamm च्या वाईपआऊटचाही वापर करून घेऊ शकता. 

कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य