DIY सौंदर्य

मस्कारा लावताना होतोय त्रास, तर खास सोप्या हॅक्स

Dipali Naphade  |  Sep 18, 2020
मस्कारा लावताना होतोय त्रास, तर खास सोप्या हॅक्स

डोळे सुंदर दिसण्यासाठी काजळ, मस्कारा या सगळ्या मेकअपचा आपण वापर करत असतो. मस्काऱ्याशिवाय तर मेकअप अपूर्णच वाटतो. पण बऱ्याचदा महिलांना मस्कारा कसा वापरायचा याची माहिती नसते. मस्कारा लावण्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. भारतात सर्वोत्कृष्ट मस्कारा उत्पादने चांगली आहेत जी तुम्ही आपल्या नेत्र मेकअपसाठी वापरू शकता. तुम्हालाही आकर्षक आणि उठावदार डोळे दाखवायचे असतील तर तुम्हाला 5 मस्कारा मेकअप हॅक्स माहीत असायलाच हवेत. याचा वापर करून तुम्हीही तुमचे डोळे अधिक सुंदर आणि आकर्षक करू शकता. डोळ्यांना फिनिशिंग लुक देण्यासाठी आपण मस्कारा वापरतो. जाणून घ्या सोपे मस्कारा मेकअप हॅक्स.

ब्रश नियमित करा स्वच्छ

Shutterstock

मस्कारा वॉन्ड दर दोन आठवड्यांनी स्वच्छ करणे आवश्यक आहे. ज्यामुळे ब्रशवर मस्कारा साचून राहात नाही. तसंच मस्कारा लावणं सुरू करण्याआधी ब्रशला जास्त मस्कारा लागला नाही याचा अंदाज घ्या. बऱ्याचदा ब्रश स्वच्छ केला जात नाही. याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचे आहे.

गरम करा

मस्कारा बाटलीमध्ये जमून राहणार नाही यासाठी काळजी घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही अगदी हलकीशी वाफ देऊन मस्कारा गरम करा अथवा आपल्या स्वतःच्या हातावर मस्काराची बाटली रोल करा. तुमच्या शरीराच्या गरमीनेही मस्कारा सुटतो. त्यामुळे तुम्हाला वेगळे काही करायची गरज भासत नाही. मात्र कधीही मस्कारा जमेपर्यंत तसाच ठेऊ नका. नेहमी मस्कारा लावण्याआधी तुम्ही असं केल्यास, पापण्यांना मस्कारा अगदी सहजतेने लागेल.

बजेटमध्ये बसतील असे 10 बेस्ट मेकअप ब्रश किट्स (Best Makeup Brush Kits In Marathi)

योग्य निवड करा

Shutterstock

मस्कारा कसा निवडावा हेदेखील तितकंच गरजेचे आहे. वॉटरप्रूफ मस्कारा हा नेहमी योग्य आहे. मस्काराची निवड करताना तुम्ही नेहमी वॉटरप्रूफ मस्कारा निवडा. त्यामुळे हा डोळ्यांवर पसरत नाही. ज्यांच्या पापण्या कमी असतात, त्यांना व्हॉल्युमिंग मस्काराची गरज असते. लहान पापण्यांना कर्लिंग करण्यासाठी योग्य आकाराचा ब्रश असणारा मस्कारा तुम्ही निवडा. आपल्या पापण्या कशा आहेत ते आपण मस्कारा लावण्यापूर्वी जाणून घ्यायला हवं. तुम्ही यासाठी MyGlamm च्या मस्काराची निवड करू शकता.

मेकअप करताना टाळा ‘या’ चुका नाहीतर दिसाल वयस्कर

ट्रिक आणि ट्रीट

डोळे सुंदर बनविण्यासाठी तुम्ही या 3 पद्धतीने मस्कारा लावा. सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या पापण्यांना मस्काराचा सिंग कोट लावा. त्यानंतर मेकअप ब्रशवर बेबी पावडर घ्या आणि पहिल्यांदा दिलेल्या कोटवर हलक्या ब्रशने पावडर लावा. ही पावडर तुमच्या डोळ्यांच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या. तिसरी पायरी म्हणजे त्यावर पुन्हा एकदा मस्कारा लावा. यामुळे तुमच्या पापण्या घनदाट दिसतील. तसंच तुम्हाला जर तुमच्या पापण्यांना कर्ल द्यायचा असेल तर तुम्ही कर्लिंग ब्रश असणारा मस्कारा वापरा. अन्यथा तुम्हाला मस्कारा लावताना त्रास होईल. 

आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रिक्स

योग्य पद्धतीने वापरा

मस्कारा सुकण्यासाठी आणि सेट होण्यासाठी जरा वेळ द्या. मस्कारा जर पापण्यांना जास्त लागला असेल तर तुम्ही आयलॅश कोम्बचा वापर करू शकता. यामुळे योग्य कोट लागतो. त्यामुळे अशाच मस्काऱ्याची निवड करा जेणेकरून तुमच्या पापण्या दिसतील. तसंच एका गोष्टीची काळजी घ्या की, आपला मस्कारा दर 3 ते 6 महिन्यांनी बदलत राहा. डोळ्यांना कोणत्याही तऱ्हेचे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी सदर काळजी घ्यावी.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य