DIY फॅशन

साडी सुटण्याची असेल भीती, तर लक्षात ठेवा या सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Apr 1, 2022
easy-saree-draping-tips-in-marathi

साडी नेसल्यानंतर प्रत्येक स्त्री सुंदर दिसते. असं म्हणतात की, साडी नेसल्यानंतर तुम्ही स्टायलिश आणि पारंपरिक असा दोन्ही लुक उठून दिसतो. साडी भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आजकाल केवळ समारंभांमध्येच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही साडी नेसण्याचे प्रस्थ वाढले आहे. काही महिला इतक्या सुंदर पद्धतीने साड्या नेसतात की, पाहातच राहावेसे वाटते. पण काही महिलांना साडी नेसण्याचा अनुभव अधिक नसतो आणि साडी नेसल्यावर ती सुटेल अशीही त्यांना भीती वाटत असते. त्यामुळे साडी सांभाळताना ती सुटेल की काय असे विचार सतत डोक्यात असल्यामुळे साडी नेसण्याचा आत्मविश्वास अनेक महिलांमध्ये आढळून येत नाही. पण साडी नेसण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळेच साडी सुटण्याची भीती राहाते. त्यामुळे ही भीती घालवायची असेल तर तुम्हाला काही टिप्स जाणून घ्यायला हव्यात.  हे खरं आहे की, साडी नेसण्याची एक पद्धत असते. साडी कशी नेसावी, साडीच्या पदरापासून ते साडीच्या निऱ्यांपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने साडी नेसायला हवी हे माहीत असायला हवे. जाणून घ्या या सोप्या टिप्स.  

योग्य पेटीकोटही आहे गरजेचा 

तुम्हाला माहीत आहे का? पेटीकोट हा साडीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पेटीकोटमुळे साडीमध्ये किती फरक दिसून येतो असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडतो. पण पेटीकोट केवळ साडीच्या खालच्या भागाला योग्य आकार देत नाही तर साडी तुम्हाला योग्य दिसेल यासाठीही पेटीकोटचा उपयोग होतो. तुम्ही सिल्कच्या साड्यांसह जर सॅटिनचा पेटीकोट घातला तर साडी नीट नेसली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही साडीनुसार पेटीकोट निवडणे गरजेचे आहे. कॉटन आणि हँडलूम साड्यांसह कॉटनचेच पेटीकोट घालावेत. जॉर्जेट आणि शिफॉन साड्यांसह तुम्ही सॅटिनचे पेटीकोट निवडा. नेट साडी अथवा लेसच्या साड्या असतील तर त्यासह तुम्ही एम्ब्रोयडरीवाला आणि सिल्कचा पेटीकोट निवडू शकता. पेटीकोट घालताना सहसा चुका करू नका. 

साडी नेसण्यापूर्वी करा इस्त्री

साड्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. पण तुम्ही साडी नेसण्यापूर्वी साडी प्रेस करून अर्थात इस्त्री करूनच तुम्ही नेसायला हवी. साडी नेसण्यापूर्वी तुम्ही एक दिवस आधी किमान इस्त्री करा आणि हँगरवर लटकवून ठेवा. साडी नेसतानाही तुम्ही त्या साडीची इस्त्री खराब होणार नाही याची काळजी घ्या. साडीला इस्त्री केली असेल तर ती नेसणे अधिक सोपे होते आणि सांभाळणेही. तसंच तुमच्या साडीच्या निऱ्या आणि साडीच्या पदराच्या प्लीट्स हा योग्य पद्धतीने काढता येतो. 

साडी नेसण्यापूर्वी घाला फुटवेअर 

सर्वात महत्त्वाचा आणि कॉमन नियम तुम्ही लक्षात ठेवला तर साडी नेसणे अधिक सोपे होईल. हा नियम म्हणजे साडी नेसण्यापूर्वी तुम्ही फुटवेअर घालणे गरजेचे आहे. तुम्ही जर साडी नेसताना हिल्स घालणार असाल तर साडीच्या निऱ्या काढणे तुमच्यासाठी सोपे होते आणि साडी नेसणे तुमच्यासाठी अधिक सोपे होते. जेव्हा तुम्ही हिल्स घालता तेव्हा साडी नेसण्याचा अंदाज येतो आणि साडी किती उंचावर नेसायला हवी याचाही अंदाज येतो. साडीची लेव्हल योग्य राखली जाते आणि तुम्हाला साडी सुटेल ही भीती राहात नाही. तसंच तुम्हाला चालण्याफिरण्याचाही त्रास होत नाही. 

योग्य पद्धतीने नेसा साडी 

साडी ही नेहमी कमरेच्या भोवती चारही बाजूने आणि व्यवस्थित उंचीवर नेसायला हवी. आपल्या बेंबीच्या खाली प्लीट्स बनविण्यापूर्वी तुम्ही निश्चित करा साडी क्रिजच्या एकदम व्यवस्थित लेव्हलला असायला हवी. साडी व्यवस्थित दिसावी यासाठी तुम्ही ती व्यवस्थित सेट करणेही गरजेचे आहे. तुमचे पोट मोठे असेल अथवा कंबर मोठी असेल तर साडी तुम्ही बेंबीच्या वर थोडी नेसायला हवी. तुमचे पोट फ्लॅट असेल तर तुम्ही साडी बेंबीच्या खालीही नेसू शकता. केवळ लक्षात ठेवा की, साडी सुटण्याची भीती असेल तर तुम्ही बेंबीच्या अधिक खाली नेसू नका. 

प्लीट्स काढताना लक्षात ठेवा 

प्लीट्स काढणे एक कला आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने प्लीट्स काढले नाहीत तर नक्कीच साडी सुटू शकते. प्लीट्स तुमच्या लुकला अधिक आकर्षकता देतो. त्यामुळे घाईघाईट प्लीट्स काढू नका. तुमच्या साडीच्या निऱ्या जितक्या अधिक आणि पातळ असतील तितकी साडी अधिक सुंदर दिसेल. 

पदर सेट करा

तुम्ही साडीचा पदर अगदी लहान काढला तर साडीची शोभा निघून जाते. साडीच्या पदराची लांबी तुम्ही व्यवस्थित काढायला हवी. तसंच तुम्ही साडीच्या पदराने साडीचा ब्लाऊज कव्हर करू नये. नेट, जॉर्जेट अथवा शिफॉन साडी नेसताना तुम्ही लक्षात ठेवा की, साडीचा पदर तुम्ही कधीही पिन अप करू नये. कारण या साड्यांवर प्लीट्स काढणे खराब दिसते. 

पिन लावायला विसरू नका 

तुम्ही नियमित साडी नेसत असाल तर तुम्हाला पिन अप करणे नक्कीच व्यवस्थित येत असेल. पण साडी नेसायची असेल तर पिन लावताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तसंच साडीवर जास्त पिन्स लाऊ नका. जेणेकरून साडी फाटण्याची भीती असते. यामुळे साडी खराबही होऊ शकते. 1 सेफ्टी पिन तुम्ही प्लीट्सवर लावा, 1 सेफ्टी पिन तुम्ही खांद्याच्या पदरावर लावा आणि 1 सेफ्टी पिन तुम्ही कंबरेवर लावा. साडी व्यवस्थित राहण्यासाठी इतक्या पिन्सचा वापर करणे योग्य आहेत. 

साडीच्या फॉलकडे लक्ष द्या

साडीच्या फॉलकडे पाहणंही अत्यंत गरजेचे आहे. साडीचा फॉल हा साधारणतः 5 इंच जाडा आणि 3 मीटर लांब असतो. नव्या साडीला फॉल हा लावलाच जातो. जेणेकरून साडी नेसणे सोपे होते. फॉल हा साडीचा इनर ड्रेप आणि प्लीट्स कव्हर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. साडीला अधिक स्टिफ बनविण्यासाठी आणि प्लीट्स बनविण्यासाठी सोपे जाते.  

साडी नेसल्यावर नेहमी आत्मविश्वासाने राहा

ज्या महिला कमी वेळा साड्या नेसतात, त्यांचे लक्ष सतत साडीकडे असते. त्यांना साडी सुटण्याची भीती असते. त्यामुळे साडी नेसल्यावर इतर कोणत्याही गोष्टीकडे त्या महिला लक्ष देऊ शकत नाहीत. जेव्हा तुम्ही साडी नीट नेसली आहे तेव्हा साडीला सतत हात लाऊ नका. अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही साडी कॅरी करा. जेणेकरून तुम्हाला साडी सुटण्याची भीती राहणार नाही. सतत निऱ्यांना हात लावल्याने आणि साडी अॅडजस्ट केल्याने साडी सैलसर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या बाबी लक्षात घ्या. 

या टिप्सचा वापर केल्यास, तुम्हाला साडी सुटण्याचा त्रास नक्कीच होणार नाही. तसंच तुम्ही नेहमी आत्मविश्वासाने साडी नेसा तुम्ही अधिक सुंदर दिसाल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन